Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

MSRTC Tourism: आता कमी बजेटमध्ये पाहता येणार सुंदर जागा? पर्यटन स्थळांसाठी एसटीसोबत खासगी बसेस होणार उपलब्ध

आता प्रवाशांना धार्मिक स्थळांना भेटी देता याव्यात यासाठी खाजगी टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांनी एसटी सोबत संयुक्तपणे सहली आयोजित करण्यात येणार आहे, असे आवाहन परिवहन मंत्र्यांनी दिली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 16, 2025 | 04:11 PM
आता कमी बजेटमध्ये पाहता येणार सुंदर जागा? पर्यटन स्थळांसाठी एसटीसोबत खासगी बसेस होणार उपलब्ध (फोटो सौजन्य-X)

आता कमी बजेटमध्ये पाहता येणार सुंदर जागा? पर्यटन स्थळांसाठी एसटीसोबत खासगी बसेस होणार उपलब्ध (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: सर्वसामान्य प्रवाशांना धार्मिक स्थळांना भेटी देता याव्यात यासाठी खाजगी टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांनी एसटी सोबत संयुक्तपणे सहली आयोजित करण्यात येणार आहे. जेणेकरून सर्वसामान्य प्रवाशांना कमी खर्चात निवास आणि भोजन व्यवस्थेसह धार्मिक पर्यटनाचा आनंद लुटता येईल. या योजनेत राज्यातील सर्व टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले. या अनुषंगाने एसटी महामंडळाच्या मुख्यालयात बोलावलेल्या बैठकीमध्ये बोलत होते.

 पाणी जपून वापरा! तब्बल दोन दिवस शहारतील ‘या’ भागात पाणीपुरठा बंद

यासंदर्भात प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, राज्यातील गोर- गरीब जनतेला धार्मिक पर्यटनाचा आनंद लुटता यावा यासाठी खाजगी टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांनी एसटी महामंडळाच्या माध्यमातून कमी गर्दीच्या दिवसात सहलीचे आयोजन करावे. यासाठी पंढरपूरच्या धर्तीवर तिर्थक्षेत्राच्या ठिकाणी भाविक पर्यटकांना स्वच्छतागृह व निवास व्यवस्था (जिथे उपलब्ध असेल तिथे) निःशुल्क उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच कमी गर्दीच्या हंगामामध्ये विशेषतः सुट्ट्यांच्या दिवशी एसटीला प्रवासी भारमान कमी असते. त्यामुळे उत्पन्न कमी मिळते. अशावेळी एसटीने खाजगी टूर्स अँड ट्रॅव्हल्स च्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेसाठी धार्मिक पर्यटन स्थळी सहली आयोजित केल्यास त्यातून एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढेल, तसेच सर्वसामान्य प्रवाशांना किफायतशीर दरात पर्यटनचा आनंद लुटता येईल.

त्या अनुषंगाने खाजगी टूर्स आणि ट्रॅव्हल्स कंपन्यांनी एसटी महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने कमी गर्दीच्या दिवशी पर्यटकांच्या मागणीनुसार अष्टविनायक दर्शन , तुळजापूर- पंढरपूर -अक्कलकोट दर्शन, ज्योतिर्लिंग दर्शन, त्रंबकेश्वर -नाशिक दर्शन अशा धार्मिक सहलींचे आयोजन करावे. या उपक्रमाची सुरुवात येत्या श्रावण महिन्यापासून करण्यात यावी अशा सूचना मंत्री सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिल्या आहेत.

आषाढी यात्रेच्या सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक पंढरपुरात येत असतात. राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुरक्षित व सुखकर व्हावा यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून यात्रा काळात ५ हजार २०० विशेष बस सोडण्याचे नियोजन केले असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

Matheran News : पावसाळी सहलीला जाताय मग ही बातमी वाचा; सहलीला आलेल्या तिघांचा तलावात बुडून मृत्यू

Web Title: Private tours and travel companies should join with st so that people can enjoy religious tourism

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2025 | 04:11 PM

Topics:  

  • msrtc
  • pratap sarnaik
  • st bus

संबंधित बातम्या

ST Employees Salary: एसटी कर्मचाऱ्यांना बाप्पा पावणार, या महिन्याचा पगार आधीच मिळण्याची शक्यता
1

ST Employees Salary: एसटी कर्मचाऱ्यांना बाप्पा पावणार, या महिन्याचा पगार आधीच मिळण्याची शक्यता

Pratap Sarnaik : प्रवाशांची आर्थिक लुट करणाऱ्या ॲप आधारित टॅक्सी संस्थांवर होणार कडक कारवाई
2

Pratap Sarnaik : प्रवाशांची आर्थिक लुट करणाऱ्या ॲप आधारित टॅक्सी संस्थांवर होणार कडक कारवाई

गडचिरोलीत एसटी बसचे चाक रूतले; अरुंद रस्त्याचा बसला फटका
3

गडचिरोलीत एसटी बसचे चाक रूतले; अरुंद रस्त्याचा बसला फटका

एसटीच्या आर्थिक संकटात वाढ; दरवाढीनंतर उत्पन्नात घट, पाच दिवसांत ‘इतक्या’ कोटींचे नुकसान
4

एसटीच्या आर्थिक संकटात वाढ; दरवाढीनंतर उत्पन्नात घट, पाच दिवसांत ‘इतक्या’ कोटींचे नुकसान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.