फोटो सौजन्य: गुगल
माथेरान/संतोष पेरणे: माथेरानमध्ये पावसाळी सहलीसाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात पसंती देतात. इथला निसर्ग अनुभवण्यासाठी आणि सुट्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची कायमच या ठिकाणी गर्दी असते. मात्र आता या आनंदाला गालबोट लागलं आहे.
माथेरान येथील शार्लोट लेक या ठिकाणी पाण्यात उतरून पोहण्याचा आनंद घेणाऱ्या तिघा पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला आहे.दहा जणांचा ग्रुप माथेरान येथे पर्यटनासाठी आल्यानंतर शार्लोट लेक मध्ये उतरले आणि तेथील पाण्याचा अंदाज न आल्याने तिघांचा बुडून मृत्यू झाला आहे.सध्या तपास कार्य सुरू असून एका पर्यटकांचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे.माथेरानच्या शार्लोट तलावाला भेट द्यायला पर्यटकांची कायमच पसंती असते. पर्यटकांची माथेरानला इतक्या मोठ्या प्रमाणात पसंती मिळत असूनही शार्लोट तलावाजवळ सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कोणत्याही संरक्षण यंत्रणा तैनात का नाही ? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.
नवी मुंबई येथील काही तरुणांचा ग्रुप पर्यटनासाठी माथेरान येथे आला होता. रविवारी दुपारी माथेरान मधील शार्लोट लेक परिसरात गेल्यानंतर त्या ग्रुप मधील काही तरुण लेक मधील पाण्यात उतरले आणि त्यांना त्या तलावातील पाण्याचा अंदाज आला नाही.त्यामुळे त्या तलावात सुमित चव्हाण,आर्यन खोब्रागडे,फिरोज शेख या साधारण 16- 19 वयोगटातील तरुण होते.पर्यटक पाण्यात बुडाले असल्याची माहिती मिळताच माथेरान पोलिस आणि सह्याद्री आपदा मित्र हे शार्लोट लेक येथे धावून गेले.मात्र संध्याकाळ होत आल्याने पाण्यात उतरुन शोध घेणाऱ्या आपदा तरुणांना अडचणी येऊ लागल्या.मात्र अंधार पडेपर्यंत एका तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले होते.