ठाणे/ स्नेहा जाधव,काकडे : ठाणे महानगरपालिकेला स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणीपुरवठा अत्यावश्यक दुरुस्तीच्या कामामुळे गुरूवार 19 जून रोजी सकाळी 9.00 वाजल्यापासून रात्री 9.00 वाजेपर्यंत आणि शुक्रवार 20 जून रोजी सकाळी 9.00 वाजल्यापासून रात्री 9.00 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद रहाणार आहे. या काळात ठाण्याच्या काही भागात 12 तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
ठाणे महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा योजनेचे व्यवस्थापन करुन टप्प्याटप्प्याने ठाणे शहरात एक वेळ पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. त्यानुसार, घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवार नगर, कोठारी कम्पाउंड, आझाद नगर, डोंगरीपाडा, वाघवीळ, आनंद नगर, कासारवडवली, ओवळा इत्यादी ठिकाणाचा पाणी पुरवठा गुरुवार 19 जून रोजी सकाळी 9.00 वाजल्यापासून रात्री 9.00 वाजेपर्यंत आणि शुक्रवार 20 जून रोजी सकाळी 9.00 वाजल्यापासून रात्री 9.00 वाजेपर्यंत बंद राहील. तसंच, समता नगर, ऋतु पार्क, सिध्देश्वर, ईटरनिटी, जॉन्सन, जेल, साकेत, उथळसर, रेतीबंदर, कळवा व मुंब्रा येथील काही भाग येथे सकाळी 9.00 वाजल्यापासून रात्री 9.00 वाजेपर्यंत आणि शुक्रवार 20 जून रोजी सकाळी 9.00 वाजल्यापासून रात्री 9.00 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहील. अशा रीतीने टप्याटप्याने एक वेळ पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.
दरम्यान, पाणीपुरवठा पूर्व पदावर येईपर्यंत पुढील 1ते 2 दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करुन ठेवावा. तसेच, पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन ठाणे महानगरपालिकेने केले आहे.