
Daund Taluka News, Roty Javal Ritual, Rotmalnath Temple Controversy,
Daund News: दौंड तालुक्यातील रोटी येथील ग्रामदैवत श्री रोटमलनाथ मंदिरात होत असलेल्या पारंपरिक जावळ विधी कार्यक्रमाच्या संदर्भात राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी केलेल्या वक्तव्याचा आणि दिलेल्या कारवाई करण्याच्या आदेशाचा दौंड तालुक्यातील शितोळे – देशमुख महिला आक्रमक झाल्या आहेत. रोटी येथील पार पडलेल्या निषेध सभेत चाकणकर यांनी माफी मागावी; अन्यथा त्यांना द्यायला खेचू, असा इशारा यावेळी बोलताना दिला.
दौंड तालुक्यातील रोटी येथील श्री रोटमलनाथ मंदिरात पडणाऱ्या पारंपरिक जावळ विधीत महिलांना जबरदस्तीने मुंडन करून विद्रूप केले जाते. या प्रकरणाची चौकशी करून सात दिवसात कारवाईचा अहवाल सादर करण्याचे आदेश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पुणे जिल्हाधिकारी यांना नुकतेच दिले होते. महिला आयोगाचे अध्यक्ष चाकणकर यांनी घेतलेल्या भूमिकेचा तीव्र पडसाद दौंड तालुक्यातील रोटी येथे उमटले.तर मागील दोन दिवसांपासून सोशल मीडियावर चाकणकर यांचा निषेध करणाऱ्या पोस्ट वायरल झाले आहेत. रविवारी दि ( २८) रोटी येथील रोटमलनाथ मंदिर जवळ तालुक्यातील शितोळे- देशमुख परिवाराच्यावतीने निषेध सभा पार पडली. या निषेध सभेत शितोळे घराण्यातील अनेक मान्यवरांनी जावळ विधी परंपरा काय आहे आणि ते कधीपासून रूढ आहे याचाही ऐतिहासिक दाखले देत रूपाली चाकणकर यांचा समाचार घेतला.
Battle Of Galwan Cast Fees: सलमानचे मानधन सैराटच्या Box Office कलेक्शनहुनही जास्त! इतर
यावेळी रोटमलनाथ मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी सचिन शितोळे म्हणाले की, ८०० वर्षांपूर्वीचे मंदिर आहे. रोटमलनाथ मंदिरात जावळचा प्रथा कायम स्वरूपाची आहे. रोटी गावातील ५०० वर्षापासून जावळ इतिहास आहे. मुलाचे जावळ, आईचे मुंडण करण्याची प्रथा आहे. घरात पहिला मुलगा होईल त्यावेळी मंदिरात मामाच्या मांडीवर बसून जावळ होत आहे.यावेळी मुलाची आई ही बट किंवा मुंडण केले जाते. ही परंपरा अनेक वर्षाची आहे.
तर कुरकुंभच्या महिला पोलिस पाटील रेश्मा शितोळे म्हणाल्या की, जावळ काढण्याची पद्धत आम्हाला अभिमान आहे. आमचावर कुटुंबात कोणतीही जबरदस्ती केली जात नाही. आमची अनेक वर्षापासून ची परंपरा आहे. माझे १० वर्षापूर्वी जावळ झाले आहे. मी स्वइच्छेने हा निर्णय घेतला होता. कुटुंबातील कोणीही दबाव आणला नाही. रुपाली चाकणकर यांना देखील आम्ही एका जावळाच्या कार्यक्रमात आमंत्रण देणार आहे . आणि स्वतः येऊन पहावे. असे आवाहन त्यांनी केले. तसेच डॉ.पुजा शितोळे यांनी सांगितले मी स्वतः डॉक्टर असून मी स्व इच्छेने व सह संमतीने जावळ अर्पण केले आहे. तिरुपती बालाजी देखील केस दान करीत असतात मग त्याठिकाणी का आक्षेप घेतला जात नाही? तसेच शकुंतला शितोळे, दौंड पंचायत समितीचे माजी सभापती आशा शितोळे,तेजस्विनी शितोळे, सुभद्रा शितोळे, ॲड संतोष शितोळे, वसंत साळुंके, नितीन दोरगे, राजवर्धन जगताप,मनोज फरतडे, साहेबराव वाबळे, अंकिता गरुड यांनी आपले मत नोंदवत चाकणकर यांचा निषेध नोंदवला.
यावेळी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या वैशाली नागवडे यांनी चाकणकर रोटी येथे गावाला एक संस्कृती व परंपरा आहे. ते जोपासण्याचे काम हे रोटी गाव करीत आहे. प्रत्येक क्षेत्रात शितोळे घराण्याची महिला काम करीत आहे. शितोळे परिवारात महिलांवर कुठलीही जबरदस्ती केली जात नाही.त्यामुळे शितोळे देशमुख यांची बदनामी करणाऱ्या रुपाली चाकणकर यांनी याचा जाब द्यावा, तर राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार रमेश थोरात यांनी या घटनेचा निषेध नोंदवला.