मुंबई : माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांच्या हस्ते बुधवारी ‘भगतसिंह कोश्यारी (Bhagat singh kosyari) : अ सोल डेडिकेटेड टू द नेशन’ या डॉ. तुषार कांती बॅनर्जी (tushar kanta banrjee) लिखित पुस्तकाचे प्रकाशन राजभवन येथे करण्यात आले आहे. प्रकाशन सोहळ्याला कोविंद यांच्या पत्नी सविता कोविंद, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnvis) तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
[read_also content=”शरद पवारांच्या आव्हानाला भाजपकडून प्रतिउत्तर, ‘हे सवाल’ विचारत कोंडीत पकडण्याचा प्रयत्न https://www.navarashtra.com/maharashtra/bjp-asked-questions-to-sharad-pawar-about-patra-chwal-case-328493.html”]
दरम्यान, असनसोल येथे बंगाली भाषेचे प्राध्यापक असलेल्या डॉ. तुषार कांती बॅनर्जी यांनी लिहिलेल्या २७० पानांच्या इंग्रजी चरित्रात्मक पुस्तकामध्ये कोश्यारी यांचे लहानपण, शिक्षण, राजकीय प्रवास, संसद सदस्य म्हणून केलेले वैशिष्ट्यपूर्ण कार्य तसेच राज्यपाल म्हणून केलेले कार्य यांचे विस्तृत विवेचन करण्यात आले आहे.