Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 11 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ambegaon Landslide: आंबेगावातील दरडग्रस्त ५ गावांचे पुनर्वसन करणार; दिलीप वळसे पाटलांची मोठी ग्वाही

Ambegaon Landslide Rehabilitation: प्रशासनाकडून नुकसानग्रस्त भागांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. दरडीमुळे बंद झालेले रस्ते तातडीने वाहतुकीसाठी खुले करावेत तसेच भातशेतीच्या नुकसानीचे पंचनामे जलदगतीने पूर्ण करून शेतकऱ्यांना शासनाची मदत मिळवून द्यावी,

  • By anuradha sagar
Updated On: Jul 11, 2026 | 05:30 PM
Ambegaon Landslide Rehabilitation, Dilip Walse Patil Pune

Ambegaon Landslide Rehabilitation, Dilip Walse Patil Pune

Follow Us
Follow Us:

 

Pune Rain Updates :  आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी पट्ट्यात सलग सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भीमाशंकर, आहुपे आणि पाटण खोऱ्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी डोंगरकडे कोसळून दरडी पडल्याने प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले असून, काही दुर्गम गावांचा संपर्क तुटला आहे. भातशेतीचेही मोठे नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी गृहमंत्री तथा माजी सहकारमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी अतिवृष्टीग्रस्त भागांची प्रत्यक्ष पाहणी करून ग्रामस्थांना धीर दिला.

वळसे पाटील यांनी उगलेवाडी, गोहे बुद्रुक, गोहे खुर्द, माळीण, पसारवाडी, आंबडे, पोखरी येथील बेंढारवाडी, जांभोरी तसेच काळवाडी क्रमांक १ व २ या दरडप्रवण भागांना भेट देत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. त्यांनी भूस्खलनग्रस्त ठिकाणे, कोसळलेल्या दरडी, तुटलेले रस्ते तसेच पाण्याखाली गेलेल्या भातशेतीची पाहणी करून शेतकरी व ग्रामस्थांशी संवाद साधला.

देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीत जावं, राज्याची धुरा एकनाथ शिंदेंकडे सोपवा; बच्चू कडूंचं वक्तव्य

यावेळी जिल्हा परिषद सदस्या शिला लोहकरे, ज्येष्ठ सदस्य संजय गवारी, उपसभापती ज्योती पारधी, माजी सभापती प्रकाश घोलप, माजी उपसभापती नंदकुमार सोनावले, सुभाष तळपे, तहसीलदार राहुल सारंग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता सूर्यकांत कुंभार, घोडेगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर पवार तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

प्रशासनाकडून नुकसानग्रस्त भागांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. दरडीमुळे बंद झालेले रस्ते तातडीने वाहतुकीसाठी खुले करावेत तसेच भातशेतीच्या नुकसानीचे पंचनामे जलदगतीने पूर्ण करून शेतकऱ्यांना शासनाची मदत मिळवून द्यावी, अशा सूचना वळसे पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

पाच दरडग्रस्त गावांचे कायमस्वरूपी पुनर्वसन

यावेळी बोलताना दिलीपराव वळसे पाटील म्हणाले, “आंबेगाव तालुक्यात माळीणप्रमाणे अतिधोकादायक स्थितीत असलेली पाच गावे आहेत. या गावांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाला शासन सर्वोच्च प्राधान्य देईल. नुकसानग्रस्तांना आवश्यक ती मदत तातडीने मिळावी, यासाठी प्रशासनाला स्पष्ट सूचना दिल्या आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाशी संपर्कात राहावे.”

Farmer Loan Waiver: शेतकरी कर्जमाफी का लांबली? केंद्र सरकारच्या ‘त्या’ डेटामुळे प्रक्रिया रखडली

शेतकऱ्यांकडून मदतीची अपेक्षा

अतिवृष्टीमुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाल्याचे सांगताना आदिवासी शेतकरी भागु धोंडु भोकटे म्हणाले, “यंदाच्या मुसळधार पावसाने भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी बांध फुटून भाताची रोपे वाहून गेली असून रस्तेही बंद झाले आहेत. शासनाने नुकसानभरपाई देऊन रस्ते तातडीने सुरू करावेत. त्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळेल.”अतिवृष्टीमुळे पश्चिम आदिवासी भागातील जनजीवन विस्कळीत झाले असून, प्रशासनाने युद्धपातळीवर मदतकार्य सुरू केले आहे. दरडग्रस्त भागातील नागरिकांच्या सुरक्षिततेसह शेतीच्या नुकसानीची भरपाई आणि रस्ते पूर्ववत करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात येत आहेत.

 

 

Web Title: Pune ambegaon landslide prone 5 villages rehabilitation dilip walse patil visit heavy rain damage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2026 | 05:30 PM

Topics:  

  • Landslide News
  • Pune Rain

संबंधित बातम्या

Pune News: माऊलींसाठी ‘वरुणराजा’ची विश्रांती! वारकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा; उद्यापासून तापमानात…
1

Pune News: माऊलींसाठी ‘वरुणराजा’ची विश्रांती! वारकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा; उद्यापासून तापमानात…

Maharashtra Rain Alert: घाटमाथ्यावर पावसाचे ‘रौद्ररूप’; तर पुणे शहरात…, हवामान विभागाचा अलर्ट काय?
2

Maharashtra Rain Alert: घाटमाथ्यावर पावसाचे ‘रौद्ररूप’; तर पुणे शहरात…, हवामान विभागाचा अलर्ट काय?

Jawali Landslide News: जावळी तालुक्यातील सायघरमध्ये घरावर कोसळली दरड! धनावडे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर, मोठी जीवितहानी टळली
3

Jawali Landslide News: जावळी तालुक्यातील सायघरमध्ये घरावर कोसळली दरड! धनावडे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर, मोठी जीवितहानी टळली

पुणेकरांवर भीषण संकट! Khadakwasla धरणातून मुठा नदीत तब्बल ‘इतक्या’ हजार…; पावसाचा जोर कायम
4

पुणेकरांवर भीषण संकट! Khadakwasla धरणातून मुठा नदीत तब्बल ‘इतक्या’ हजार…; पावसाचा जोर कायम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.