Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aaple Sarkar Seva Kendra: पुणे जिल्ह्यात १,३७२ नवीन ‘आपले सरकार’ केंद्रांना मंजुरी; अर्ज करण्याची आज अंतिम मुदत!

Aaple Sarkar Seva Kendra: जिल्ह्यात यापूर्वी २०२२ मध्ये नवीन केंद्रांसाठी प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यानंतर सलग चार वर्षे नवीन केंद्रांना मंजुरी न मिळाल्याने स्थानिक नागरिक व लोकप्रतिनिधींकडून सातत्याने पाठपुरावा केला जात होता.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 31, 2026 | 10:05 AM
दस्तांच्या प्रमाणित प्रती 'ई-प्रमाण'वर

दस्तांच्या प्रमाणित प्रती 'ई-प्रमाण'वर

Follow Us
Follow Us:
  • पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात १,३७२ नवीन ‘आपले सरकार’ सेवा केंद्रांना मंजुरी.
  • केंद्रचालक निवडीसाठी अर्ज सादर करण्याची आज (३१ ऑगस्ट) अंतिम मुदत.
  • शासकीय दाखले, प्रमाणपत्रे आणि योजनांचा लाभ आता थेट गावातच मिळणार.
Aaple Sarkar Seva Kendra: विविध शासकीय दाखले, प्रमाणपत्रे आणि कल्याणकारी योजनांच्या लाभासाठी ग्रामीण भागातील नागरिकांना तालुक्याच्या किंवा शासकीय कार्यालयांचे खेटा मारावे लागू नयेत, यासाठी पुणे जिल्ह्यात ‘आपले सरकार सेवा केंद्रांचे मोठे जाळे उभारण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाने ग्रामीण भागात नव्याने १ हजार ३७२ केंद्रे सुरू करण्यास मंजुरी दिली असून, केंद्रचालक निवडीसाठी आज (३१ ऑगस्ट) अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आहे. (Maharashtra Government)

गेल्या काही वर्षांत ग्रामीण भागातील लोकसंख्येत मोठी वाढ झाल्याने गावागावांत शासकीय ऑनलाईन सेवांची मागणी वाढली होती. जिल्ह्यात यापूर्वी २०२२ मध्ये नवीन केंद्रांसाठी प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यानंतर सलग चार वर्षे नवीन केंद्रांना मंजुरी न मिळाल्याने स्थानिक नागरिक व लोकप्रतिनिधींकडून सातत्याने पाठपुरावा केला जात होता. याची दखल घेत राज्य शासनाने ग्रामीण भागात १ हजार ३७२ नवीन केंद्रांना हिरवा कंदील दाखवला आहे.

‘आमच्या नादात लागू नका’, मनसे नेते राजू पाटील यांचा भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब यांना थेट इशारा

शासकीय अटी शिथिल; स्थानिकांना मिळणार रोजगाराची मोठी संधी

यापूर्वी ‘आपले सरकार केंद्र मिळविण्यासाठी असलेल्या काही किचकट अटी व शर्ती शिथिल करण्यात आल्या आहेत. प्रत्येक गावात शासकीय सेवा उपलब्ध व्हाव्यात आणि स्थानिक तरुणांना स्वयंरोजगाराची संधी मिळावी, या उद्देशाने नियमावली अधिक सुलभ करण्यात आली आहे. या केंद्रांसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य ठेवण्यात आली आहे.

१०० गुणांच्या मूल्यांकनातून होणार निवड

केंद्रचालकांच्या निवडीसाठी पारदर्शक पद्धत अवलंबण्यात येणार असून १०० गुणांचे मूल्यमापन निश्चित केले आहे. यामध्ये शैक्षणिक पात्रता, संगणक व डिजिटल साक्षरता, कार्यालयासाठी उपलब्ध पायाभूत सुविधा, आर्थिक क्षमता, पूर्वानुभव, व्यवसाय आराखडा, स्थानिक उद्योजकता आणि चारित्र्य पडताळणी या निकषांवर आधारित गुणांकन केले जाईल. मुलाखतीनंतर सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या पात्र उमेदवारांना केंद्राचे वाटप केले जाईल. ग्रामीण भागातील निवड प्रक्रिया सुरळीत पार पडल्यानंतर पुणे शहरातील ‘आपले सरकार केंद्रांसाठी स्वतंत्र जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

रुग्णालयांची दर सहा महिन्यांनी सुरक्षा तपासणी! आगीचा धोका; अनेक ठिकाणी आढळल्या त्रुटी, अमरावती घटनेनंतर

निवड प्रक्रियेचे संपूर्ण वेळापत्रक

अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदतः ३१ ऑगस्ट
अर्जाची छाननी १ ते ११ सप्टेंबर
पात्र उमेदवारांच्या मुलाखतीः १५ ते २४ सप्टेंबर
प्राथमिक निवड यादी प्रसिद्धीः ५ ऑक्टोबर
हरकती व सूचना नोंदविण्याची मुदतः ५ ते ९ ऑक्टोबर
अंतिम निवड यादी: २६ ऑक्टोबर

 

Web Title: Pune district approves 1372 new aaple sarkar seva kendras last date 31 august

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2026 | 10:00 AM

Topics:  

  • Aaple Sarkar
  • Pune

संबंधित बातम्या

Shikrapur Shirur Highway Project: पुणे-शिरूर ६ पदरी महामार्गाच्या खर्चात तफावत?; दोन दिवसांत बाधित शेतकऱ्यांची मोठी बैठक
1

Shikrapur Shirur Highway Project: पुणे-शिरूर ६ पदरी महामार्गाच्या खर्चात तफावत?; दोन दिवसांत बाधित शेतकऱ्यांची मोठी बैठक

ह्युंदाईच्या पुण्यातील तळेगाव प्लांटमध्ये 11,000 कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक! 2030 पर्यंत वाढणार प्रोडक्शन
2

ह्युंदाईच्या पुण्यातील तळेगाव प्लांटमध्ये 11,000 कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक! 2030 पर्यंत वाढणार प्रोडक्शन

Masur-Banwadi Phata Road : मसूर-बनवडीफाटा रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण; आठ दिवसांत दुरुस्ती करा, शिवसेनेचा इशारा
3

Masur-Banwadi Phata Road : मसूर-बनवडीफाटा रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण; आठ दिवसांत दुरुस्ती करा, शिवसेनेचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.