Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 23 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यातील नाट्यगृहांचा चेहरामोहरा बदलणार! महापालिकेकडून दुरुस्तीची कामे; नेहरू भवन ‘या’ तारखेपर्यंत बंद

पुणे महापालिकेच्या नाट्यगृहांमधील सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी सांस्कृतिक विभागाने देखभाल-दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत. कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात मोठ्या प्रमाणावर दुरुस्तीची कामे करण्याचे नियोजन आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 23, 2026 | 04:18 PM
पुण्यातील नाट्यगृहांचा चेहरामोहरा बदलणार! महापालिकेकडून दुरुस्तीची कामे; नेहरू भवन ‘या’ तारखेपर्यंत बंद

पुण्यातील नाट्यगृहांचा चेहरामोहरा बदलणार! महापालिकेकडून दुरुस्तीची कामे; नेहरू भवन ‘या’ तारखेपर्यंत बंद

Follow Us
Follow Us:
  • पुण्यातील नाट्यगृहांची देखभाल-दुरुस्ती होणार
  • महापालिकेकडून नाट्यगृहांच्या नूतनीकरणाची कामे हाती
  • दुरुस्तीमुळे नेहरू भवन नाट्यगृह बंद राहणार
पुणे : पुणे महापालिकेच्या नाट्यगृहांमधील सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी सांस्कृतिक विभागाने देखभाल-दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत. घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन १ नोव्हेंबरपासून दुरुस्तीच्या कामांसाठी बंद ठेवण्यात आले असून, १० नोव्हेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. नेहरू भवनात सभागृहातील खुर्च्यांची दुरुस्ती, वातानुकूलन यंत्रणेची देखभाल तसेच छताची गळती रोखण्यासाठी वॉटरप्रूफिंगची कामे केली जात आहेत. त्याचबरोबर बालगंधर्व रंगमंदिरातील स्वच्छतागृहांचे नूतनीकरण सुरू आहे. औंध येथील पंडित भीमसेन जोशी कलामंदिरातही आवश्यक त्या दुरुस्तीची कामे करण्यात आली आहेत. कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात मोठ्या प्रमाणावर दुरुस्तीची कामे करण्याचे नियोजन आहे.

 

नाट्यगृहांमधील विविध सुविधांबाबत कलाकारांकडून सातत्याने तक्रारी केल्या जात आहेत. त्याचा परिणाम कलाकारांसह प्रेक्षकांनाही सहन करावा लागतो. त्यामुळे नाट्यगृहांमधील सुविधांची नियमित देखभाल आणि आवश्यकतेनुसार वेळेत दुरुस्ती करण्याची गरज व्यक्त होत होती. या पार्श्वभूमीवर महापालिकेने दुरुस्तीच्या कामांना सुरुवात केली आहे. सध्या सुरू असलेल्या कामांमुळे नाट्यगृहांच्या सुविधांमध्ये कितपत सुधारणा होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

१० नोव्हेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचे नियोजन

पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवनातील दुरुस्तीच्या कामांसाठी सभागृह १ नोव्हेंबरपासून बंद ठेवण्यात आले आहे. खुर्च्या आणि वातानुकूलन यंत्रणेची दुरुस्ती, तसेच इतर आवश्यक कामे येथे केली जात आहेत. ही कामे १० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे या कालावधीत सभागृहात नाट्यप्रयोग किंवा अन्य कार्यक्रम घेता येणार नाहीत.

महापालिकेच्या नाट्यगृह विभागाचे मुख्य व्यवस्थापक राजेश कामठे म्हणाले, “काही नाट्यगृहांमध्ये सध्या देखभाल-दुरुस्तीची कामे सुरू आहेत. पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवनातील दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. आगामी काळात अन्य नाट्यगृहांमध्येही आवश्यकतेनुसार कामे केली जातील. कलाकारांना योग्य सुविधा उपलब्ध करून देण्याला प्राधान्य दिले जात आहे.”

कार्यक्रम सुरू ठेवून बालगंधर्वमध्ये नूतनीकरण

बालगंधर्व रंगमंदिरातील स्वच्छतागृहांच्या अस्वच्छतेबाबत कलाकारांकडून अनेक दिवसांपासून तक्रारी करण्यात येत होत्या. त्याची दखल घेत स्वच्छतागृहांच्या नूतनीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. या कामासाठी संपूर्ण नाट्यगृह बंद ठेवण्यात आलेले नाही. नाट्यप्रयोग आणि अन्य कार्यक्रम सुरू ठेवूनच नूतनीकरणाचे काम केले जात आहे.

हे सुद्धा वाचा : एकनाथ शिंदेंविरोधात भाजपकडून षडयंत्र, रामदास कदमांच्या वक्तव्याने महाराष्ट्रात राजकीय भूकंप

यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात मोठी दुरुस्ती

कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील खुर्च्या, ध्वनिव्यवस्था, रंगमंच आणि व्हीआयपी कक्षाशी संबंधित दुरुस्तीची कामे प्रस्तावित आहेत. या कामांसाठी सुमारे दोन महिन्यांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे दुरुस्तीची कामे कधी सुरू करायची, कोणत्या कामांना प्राधान्य द्यायचे आणि त्याचा नाट्यप्रयोग व अन्य कार्यक्रमांवर किती परिणाम होईल, याबाबत चर्चा करून निर्णय घेतला जाणार असल्याचे कामठे यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा : चिमुरडीवरील अत्याचारप्रकरणी न्यायालयाचा कठोर निर्णय; आरोपीला सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

💡

Frequently Asked Questions

  • Que: पुण्यातील नाट्यगृहांमध्ये कोणती कामे होणार आहेत?

    Ans: महापालिकेकडून नाट्यगृहांमध्ये देखभाल आणि दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत.

  • Que: कोणते नाट्यगृह बंद राहणार आहे?

    Ans: पुण्यातील नेहरू भवन नाट्यगृह दुरुस्तीच्या कामांमुळे बंद राहणार आहे.

  • Que: नेहरू भवन नाट्यगृह किती तारखेपर्यंत बंद राहणार आहे?

    Ans: नेहरू भवन बंद राहण्याची नेमकी तारीख दिलेल्या माहितीत नमूद केलेली नाही.

Web Title: Work has begun to improve the facilities at the pune municipal corporations theatres nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2026 | 04:18 PM

Topics:  

  • Marathi Theatre
  • Pune mahapalika
  • pune news

संबंधित बातम्या

Cricket: सिद्ध राठोडचा तडाखा अन्…; आर्यन्स क्रिकेटने 333 रन्सने चारली आदिनाथ अकादमीला धूळ
1

Cricket: सिद्ध राठोडचा तडाखा अन्…; आर्यन्स क्रिकेटने 333 रन्सने चारली आदिनाथ अकादमीला धूळ

नक्की आपण खातोय काय? Pune शहरात ९ हजार किलो पनीर, ४४० किलो खवा अन्…; FDA ची धडक कारवाई
2

नक्की आपण खातोय काय? Pune शहरात ९ हजार किलो पनीर, ४४० किलो खवा अन्…; FDA ची धडक कारवाई

Supriya Sule Alligations on BJP: भाजपकडून पैसे वाटपासाठी ‘स्पायकॅम’ पेनचा वापर!; सुप्रिया सुळेंचा सनसनाटी आरोप
3

Supriya Sule Alligations on BJP: भाजपकडून पैसे वाटपासाठी ‘स्पायकॅम’ पेनचा वापर!; सुप्रिया सुळेंचा सनसनाटी आरोप

Baramati Crime: मतदानाच्या पूर्वसंध्येला बारामती पोलिसांची धडक; गावठी पिस्तूल, तीन काडतुसे अन् कार जप्त!
4

Baramati Crime: मतदानाच्या पूर्वसंध्येला बारामती पोलिसांची धडक; गावठी पिस्तूल, तीन काडतुसे अन् कार जप्त!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.