
सार्थक पाटीलची अष्टपैलू कामगिरी
लोणी काळभोर येथील क्रिकप्लस येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत प्रथम फलंदाजी करताना आर्यन्स क्रिकेट अकादमी संघाने ५० षटकात ९ बाद ४१९ धावा केल्या. यात सिद्ध राठोडने ७७ चेंडूत १३ चौकार व ३ षटकारासह ९५ धावा केल्या. त्याला राजवीर होलेने ५५ चेंडूत ६ षटकाराच्या मदतीने ५३ धावा काढून साथ दिली. या जोडीने चौथ्या विकेटसाठी ८१ चेंडूत १२१ धावांची भागीदारी करून संघाच्या डावाला आकार दिला. त्यानंतर वरद सागर ४१, रितेश मुंडे नाबाद ३८, केविन नाझरेथ २६, सोहम चव्हाण १८, राजवीर देशमुख १६ यांनी धावा काढून संघाला ४१९ धावांचे लक्ष्य उभे करून दिले.
Cricket: युवा क्रिकेटपटूंचा धमाका! ‘पुना वेस्टर्न क्लब करंडक’मध्ये दोन संघांची विजयी सलामी
प्रत्युत्तरात आदिनाथ क्रिकेट अकादमीचा डाव २१.२ षटकात सर्वबाद ८६धावा वर संपुष्टात आला. यात सक्षम लड्डाने एकाबाजूने लढताना सर्वाधिक ४० धावा केल्या. आर्यन्स संघाकडून प्रीतम पवार(३-१०), वीर कोळेकर(३-६), सोहम चव्हाण(१-५) यांनी सुरेख गोलंदाजी करून संघाला ३३३ धावांनी मोठा विजय मिळवून दिला. सामनावीर सिद्ध राठोड ठरला.
निकाल: साखळी फेरी
आर्यन्स क्रिकेट अकादमी: ५० षटकात ९बाद ४१९ धावा. सिद्ध राठोड ९५, राजवीर होले ५३, वरद सागर ४१, रितेश मुंडे नाबाद ३८, केविन नाझरेथ २६, सोहम चव्हाण १८, राजवीर देशमुख १६, दिविशा सोळंकी १-२६, लक्ष्य पुनमीया १-२२, वि.वि.आदिनाथ क्रिकेट अकादमी: २१.२ षटकात सर्वबाद ८६धावा. सक्षम लड्डा ४०, प्रीतम पवार ३-१०, वीर कोळेकर ३-६, सोहम चव्हाण १-५. सामनावीर – सिद्ध राठोड.
DSP Cup 2026: सार्थक पाटीलची अष्टपैलू कामगिरी; पुणे Cricket क्लबचा ‘या’ संघावर थरारक विजय
सार्थक पाटीलची अष्टपैलू कामगिरी
डीएसपी स्पोर्ट्स अँड इव्हेंटस यांच्या वतीने आयोजित पहिल्या डीएसपी करंडक १४ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत अंतिम फेरीत सार्थक पाटील याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर पुणे क्रिकेट क्लब संघाने सार्क क्रिकेट अकादमी संघाचा ४ गडी राखून पराभव करत विजेतेपद संपादन केले.
Ans: युनिटी करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत सिद्ध राठोडने ७७ चेंडूत १३ चौकार व ३ षटकारासह ९५ धावा केल्या.
Ans: युनिटी करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत आर्यन्स क्रिकेटने आदिनाथ अकादमीचा पराभव केला आहे.