पुण्यातील मेडिकलवर एफडीएची कारवाई (फोटो - AI)
एफडीएच्या औषध विभागाच्या आकडेवारीनुसार, या कालावधीत उत्पादक आणि विक्री अशा दोन्ही प्रवर्गांतील आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये विक्री आस्थापनांवर सर्वाधिक कारवाई झाली. एकूण १ हजार ३०० विक्री आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ४२५ आस्थापनांना नोटिसा बजावण्यात आल्या. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ११४ आस्थापनांचे परवाने रद्द, तर ३३१ आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले. अशा एकूण ४४५ आस्थापनांवर कारवाई झाली.
दुसरीकडे, औषध उत्पादक आस्थापनांच्या ३१२ तपासण्या करण्यात आल्या. यामध्ये ७१ आस्थापनांना नोटिसा बजावण्यात आल्या. तसेच २० उत्पादकांचे परवाने रद्द, तर ३६ परवाने निलंबित करण्यात आले. उत्पादक प्रवर्गात एकूण ५६ आस्थापनांवर कारवाई करण्यात आली.
Pune FDA Action : पुण्यातील कॅम्प परिसरात FDAची कारवाई! आठ हॉटेलांचे परवाने तातडीने निलंबित
दरम्यान, राज्यभरात याच सात महिन्यांच्या कालावधीत ७ हजार ९५० तपासण्या करण्यात आल्या असून, २ हजार ६२९ नियामक कारवायांची नोंद झाली आहे. या कालावधीत राज्यस्तरावर १३१ धाडी टाकून सुमारे १७ कोटी ७३ लाख रुपये किमतीचा औषधसाठा जप्त करण्यात आला. तसेच ३७ गुन्हे दाखल करून १९ जणांना अटक करण्यात आली आहे.
पुणे विभागातील औषध विभागाची कारवाई
(१ एप्रिल ते ३१ ऑक्टोबर २०२६)
Ans: १ एप्रिल ते ३१ ऑक्टोबर २०२६ या सात महिन्यांत पुणे विभागात औषध उत्पादक आणि विक्री आस्थापनांच्या एकूण १,६१२ तपासण्या करण्यात आल्या.
Ans: एकूण ५०१ आस्थापनांवर नियामक कारवाई करण्यात आली. त्यापैकी १३४ आस्थापनांचे परवाने रद्द, तर ३६७ आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले.
Ans: राज्यभरात सात महिन्यांत १३१ धाडी टाकून सुमारे १७ कोटी ७३ लाख रुपये किमतीचा औषधसाठा जप्त करण्यात आला.






