Shubman gill out on 97 Runs
न्यूझीलंडविरुद्ध वेलिंग्टन कसोटीच्या पहिल्या डावात, भारतीय कर्णधार शुभमन गिलने १४६ चेंडूंमध्ये दोन षटकार आणि नऊ चौकारांसह ९८ धावा केल्या. ९८ धावांवर बाद झाल्याने, गिलने कसोटी क्रिकेटमध्ये ९० ते ९९ धावांच्या दरम्यान बाद होणाऱ्या भारतीय कर्णधारांच्या यादीत स्थान मिळवले. या यादीत नारी कॉन्ट्रॅक्टर, मन्सूर अली खान पतौडी, कपिल देव, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड, एम.एस. धोनी आणि विराट कोहली यांसारख्या दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे.
एवढेच नाही तर, गिल कसोटी क्रिकेटमध्ये ९८ धावांवर बाद होणारा तिसरा भारतीय कर्णधार ठरला आहे. त्याच्या आधी, १९८३ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध सेंट जॉन्स कसोटीत कपिल देव ९८ धावांवर बाद झाले होते. त्यानंतर २०१० मध्ये एम.एस. धोनीने न्यूझीलंडविरुद्ध नागपूर कसोटीत ९८ धावा केल्या होत्या. आता या यादीत गिलच्या नावाची भर पडली आहे. या तिन्ही भारतीय कर्णधारांचे शतक केवळ दोन धावांनी हुकले.
भारतीय कर्णधारांच्या या यादीत अशा दोन नावांचाही समावेश आहे, जे केवळ एका धावेने शतक पूर्ण करण्यापासून वंचित राहिले. या यादीत पहिले नाव सौरव गांगुलीचे आहे. जो २००२ मध्ये इंग्लंडविरुद्ध नॉटिंगहॅम कसोटीत ९९ धावांवर बाद झाला. तर, या यादीत दुसरे नाव एम.एस. धोनीचे आहे. जो २०१२ मध्ये इंग्लंडविरुद्ध नागपूर कसोटीत ९९ धावांवर बाद झाला.
या बाबतीत माजी कर्णधार धोनी हा सर्वात कसोटी क्रिकेटमध्ये ९०, ९२, ९८ आणि ९९ धावांवर चार वेळा बाद झाला आहे. तसेच, सचिन तेंडुलकरचे या यादीत दोनदा नाव सामील झाले. सचिन १९९७ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ब्रिजटाऊन कसोटीत ९२ धावांवर आणि २००० मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वानखेडे कसोटीत ९७ धावांवर बाद झाला होता.तर, विराट कोहली २०१८ मध्ये इंग्लंडविरुद्ध नॉटिंगहॅम कसोटीत ९७ धावांवर बाद झाला.






