Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 21 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक ! UPSC क्लासेसच्या तक्रारी मागे घेण्यासाठी 10 लाखांची खंडणी; पुण्यातील विद्यार्थ्याविरुद्ध गुन्हा दाखल

महाराष्ट्रातील सारथी, बार्टी, टीआरटीआय आणि महाज्योती या शासकीय संस्थांच्या माध्यमातून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना या क्लासेसमध्ये स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण दिले जाते. याशिवाय खासगी शुल्क भरूनही विद्यार्थ्यांना शिकवणी दिली जाते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 21, 2026 | 03:06 PM
UPSC क्लासेसच्या तक्रारी मागे घेण्यासाठी 10 लाखांची खंडणी; पुण्यातील विद्यार्थ्याविरुद्ध गुन्हा

UPSC क्लासेसच्या तक्रारी मागे घेण्यासाठी 10 लाखांची खंडणी; पुण्यातील विद्यार्थ्याविरुद्ध गुन्हा

Follow Us
Follow Us:
  • यूपीएससी विद्यार्थ्याने खासगी प्रशिक्षण संस्थेकडे मागितली १० लाखांची खंडणी
  • तक्रारी मागे घेण्यासाठी व्हॉट्सॲप कॉल, मेसेजद्वारे पैशांची मागणी
  • पैसे न दिल्यास आणखी तक्रारी करण्याची धमकी; विश्रामबाग पोलिसांत गुन्हा
पुणे : विद्यार्थ्यानेच खासगी यूपीएससी प्रशिक्षण संस्थेला दहा लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. संस्थेविरुद्ध आर्थिक गुन्हे शाखेसह विविध शासकीय विभागांकडे केलेल्या तक्रारी मागे घेण्यासाठी संबंधित विद्यार्थ्याने ही रक्कम मागितल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पैसे न दिल्यास आणखी खोट्या तक्रारी करून संस्थेला त्रास देण्याची धमकीही त्याने दिली. हा विद्यार्थी यूपीएससी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असल्याची माहिती समोर आली आहे.

याप्रकरणी माऊली डुचाळ याच्याविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माऊली डुचाळ (रा. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी क्षितीज बर्वे (वय ३४, रा. भूगाव) यांनी तक्रार दिली आहे. ते नारायण पेठेतील मोदी गणपतीजवळ असलेल्या श्रीराम्स आयएएस क्लासेसमध्ये शाखाप्रमुख म्हणून काम करतात.

पोलिसांच्या माहितीनुसार, श्रीराम्स आयएएस क्लासेसचे मुख्य कार्यालय दिल्ली येथे असून पुणे आणि हैदराबाद येथे त्यांच्या शाखा आहेत. महाराष्ट्रातील सारथी, बार्टी, टीआरटीआय आणि महाज्योती या शासकीय संस्थांच्या माध्यमातून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना या क्लासेसमध्ये स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण दिले जाते. याशिवाय खासगी शुल्क भरूनही विद्यार्थ्यांना शिकवणी दिली जाते.

दरम्यान, १ ते २६ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत माऊली डुचाळ याने संस्थेचे सहसंपर्कप्रमुख आशुतोष सिंग यांच्या मोबाईलवर व्हॉट्सॲपद्वारे वारंवार मेसेज केले. संस्थेविरुद्ध आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केल्याचे सांगून त्याने संबंधित तक्रारींचे फोटोही पाठवले. सुरुवातीला संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी या मेसेजकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर डुचाळ याने आशुतोष सिंग यांना व्हॉट्सॲप कॉल केला. आपण पुण्यातील रहिवासी असून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असल्याचे त्याने सांगितले. संस्थेविरुद्ध केलेल्या तक्रारी मागे घ्यायच्या असतील, तर दहा लाख रुपये द्यावे लागतील, अशी मागणी त्याने केली. पैसे न दिल्यास तक्रारी मागे घेणार नाही, तसेच भविष्यातही वेगवेगळ्या विभागांकडे खोट्या तक्रारी करून संस्थेला त्रास देत राहीन, अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.

वारंवार संपर्क साधून पैशांची मागणी सुरूच

संस्थेमध्ये कोणताही गैरव्यवहार होत नसल्याचे आशुतोष सिंग यांनी त्याला सांगितले. मात्र, त्यानंतरही त्याने वारंवार संपर्क साधून पैशांची मागणी सुरूच ठेवली. अखेर संस्थेच्या वतीने शाखाप्रमुख क्षितीज बर्वे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी माऊली डुचाळ याच्याविरुद्ध खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक पाटील करत आहेत.

FAQ

प्रश्न १ : विद्यार्थ्याने किती रुपयांची खंडणी मागितली?
उत्तर : विद्यार्थ्याने खासगी यूपीएससी प्रशिक्षण संस्थेकडे १० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचे तक्रारीत नमूद आहे.

प्रश्न २ : खंडणी कशासाठी मागण्यात आली?
उत्तर : संस्थेविरुद्ध आर्थिक गुन्हे शाखेसह विविध शासकीय विभागांकडे केलेल्या तक्रारी मागे घेण्यासाठी ही रक्कम मागण्यात आल्याचा आरोप आहे.

प्रश्न ३ : पैसे न दिल्यास काय धमकी देण्यात आली?
उत्तर : पैसे न दिल्यास संस्थेविरुद्ध आणखी खोट्या तक्रारी करून त्रास देण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

Web Title: Extortion of 10 lakh to withdraw complaints against upsc coaching classes nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2026 | 03:06 PM

Topics:  

  • crime news
  • Extortion Case
  • pune news
  • UPSC

संबंधित बातम्या

अतिक्रमण रोखण्यात अपयशी ठरणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करा; नगरसेवक रवींद्र साळेगावकरांचे आयुक्तांना पत्र
1

अतिक्रमण रोखण्यात अपयशी ठरणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करा; नगरसेवक रवींद्र साळेगावकरांचे आयुक्तांना पत्र

आधी डोक्यात दगड घालून हत्या, नंतर मृतदेह पुलाखाली फेकला; अहिल्यानगरमध्ये खळबळ
2

आधी डोक्यात दगड घालून हत्या, नंतर मृतदेह पुलाखाली फेकला; अहिल्यानगरमध्ये खळबळ

Sangamner Crime : अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीची हत्या; पतीचा धक्कादायक बनाव उघड
3

Sangamner Crime : अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीची हत्या; पतीचा धक्कादायक बनाव उघड

Amravati Crime : अमरावतीत दरोड्याचा मोठा डाव उधळला; सात जणांना पोलिसांनी पकडले
4

Amravati Crime : अमरावतीत दरोड्याचा मोठा डाव उधळला; सात जणांना पोलिसांनी पकडले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.