Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 21 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune FDA Action : पुण्यातील कॅम्प परिसरात FDAची कारवाई! आठ हॉटेलांचे परवाने तातडीने निलंबित

पुण्यातील कॅम्प आणि एम. जी. रोड परिसरातील २० हॉटेल्स व रेस्टॉरंटची FDA कडून तपासणी करण्यात आली. अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन आढळल्याने आठ हॉटेल्सचे परवाने तातडीने निलंबित करण्यात आले.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 21, 2026 | 06:41 PM
Pune FDA Action 8 hotel licence cancel

Pune FDA Action 8 hotel licence cancel

Follow Us
Follow Us:
  • पुण्यातील आठ हॉटेलांचे परवाने तातडीने निलंबित
  • कॅम्प, एम. जी. रोड परिसरातील २० हॉटेल्सची तपासणी
  • अस्वच्छता, कीटकांचा प्रादुर्भाव आणि कृत्रिम रंगांचा वापर उघड
FDA Pune Action : पुणे  : सुनयना सोनवणे : पुणे शहरामध्ये सध्या अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आणि महापालिकेतून अतिक्रमण विरोधात जोरदार कारवाई सुरू आहे. शहरातील सर्व प्रमुख खाऊगल्ली अन् हॉटेल्सवर कारवाई केली जात आहे. यामध्ये लोकप्रिय हॉटेल्सचा देखील समावेश आहे. याचबरोबर कॅम्प परिसरामध्ये धडक कारवाई करण्यात आली असून यावेळी २० हॉटेल्सची तपासणी करण्यात आली असून आठ हॉटेल्सचे परवाने रद्द करण्यात आले.

हॉटेलमधील स्वच्छतेचे नियम धाब्यावर बसवून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) तपासणीतून समोर आले आहे. शहरातील कॅम्प आणि एम. जी. रोड परिसरातील २० हॉटेल्स व रेस्टॉरंटची तपासणी केली असता, आठ आस्थापनांमध्ये अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन आढळले. त्यामुळे या आठही हॉटेल्सचे परवाने तातडीने निलंबित करण्यात आले आहेत.

पुण्यातील कोणकोणत्या हॉटेल्सवर FDA ची कारवाई

‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत शुक्रवारी ( ता.२०) ही तपासणी मोहीम राबविण्यात आली. यामध्ये पुणे स्टेशन परिसरातील मेट्रो रेस्टॉरंट आणि शिवाय कॉर्नर, ईस्ट स्ट्रीटवरील सहाना व्हेज रेस्टॉरंट, कॅम्पमधील ग्रँड दिल्ली दरबार, राजे चायनीज फास्ट फूड अँड ज्यूस बार, एम. जी. रोडवरील द बर्गर बार्न कॅफे, ससाणेनगरमधील महादेव फूड्स आणि कोंढवा खुर्द येथील फिरोज केटरर्स यांच्यावर कारवाई करण्यात आली.

Nitesh Rane Press Confernce : टिपू सुलतान जयंतीवरून नितेश राणे आक्रमक; म्हणाले, हे खपवून घेतले जाणार नाही…’

या आस्थापनांच्या स्वयंपाकघरांमध्ये अत्यंत अस्वच्छता आणि मोठ्या प्रमाणात कीटकांचा प्रादुर्भाव आढळला. सात हॉटेल्समध्ये कृत्रिम रंगांचा वापर होत असल्याचेही निदर्शनास आले. मेट्रो रेस्टॉरंटमध्ये कृत्रिम रंगांसह अतिरिक्त प्रमाणात एमएसजीचा वापर होत असल्याचे आढळले. त्यामुळे प्रशासनाने तातडीने परवाने निलंबित केले.

Pune FDA News : हेल्थ सप्लिमेंट्सवर आता FDA ची करडी नजर; पुणे विभागातील पाच आस्थापनांवर छापे, ३०.५७ लाखांचा साठा जप्त

सह आयुक्त (अन्न) श्रीकांत करकळे यांच्या नेतृत्वाखाली सहायक आयुक्त नारायण सरकटे यांच्या पथकाने ही कारवाई केली. अन्न सुरक्षा अधिकारी सतीश हाके, प्रिया राजगोळकर, दीपाली घोडके आणि पूजा बागडे यांचा पथकात समावेश होता. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांची गय केली जाणार नाही. स्वच्छता आणि अन्न साठवणुकीच्या नियमांचे पालन न केल्यास परवाने निलंबित किंवा रद्द केले जातील, असा इशारा करकळे यांनी दिला.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पुण्यातील किती हॉटेल्सचे परवाने निलंबित करण्यात आले?

    Ans: अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन आढळल्याने पुण्यातील आठ हॉटेल्सचे परवाने तातडीने निलंबित करण्यात आले.

  • Que: FDA च्या तपासणीत हॉटेल्समध्ये काय आढळले?

    Ans: हॉटेल्सच्या स्वयंपाकघरांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आणि कीटकांचा प्रादुर्भाव आढळला. सात हॉटेल्समध्ये कृत्रिम रंगांचा वापर होत असल्याचेही समोर आले. मेट्रो रेस्टॉरंटमध्ये अतिरिक्त प्रमाणात एमएसजीचा वापर आढळला.

  • Que: पुण्यातील हॉटेल्सची FDA तपासणी का करण्यात आली?

    Ans: ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत ग्राहकांना सुरक्षित आणि स्वच्छ अन्न मिळावे, यासाठी कॅम्प आणि एम. जी. रोड परिसरातील हॉटेल्स व रेस्टॉरंटची तपासणी करण्यात आली.

Web Title: Pune fda tukaram mundhe action eight hotels licenses suspended pune news nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2026 | 06:41 PM

Topics:  

  • pune news
  • Tukaram Munde

संबंधित बातम्या

धक्कादायक ! UPSC क्लासेसच्या तक्रारी मागे घेण्यासाठी 10 लाखांची खंडणी; पुण्यातील विद्यार्थ्याविरुद्ध गुन्हा दाखल
1

धक्कादायक ! UPSC क्लासेसच्या तक्रारी मागे घेण्यासाठी 10 लाखांची खंडणी; पुण्यातील विद्यार्थ्याविरुद्ध गुन्हा दाखल

अतिक्रमण रोखण्यात अपयशी ठरणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करा; नगरसेवक रवींद्र साळेगावकरांचे आयुक्तांना पत्र
2

अतिक्रमण रोखण्यात अपयशी ठरणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करा; नगरसेवक रवींद्र साळेगावकरांचे आयुक्तांना पत्र

Pune FDA News : हेल्थ सप्लिमेंट्सवर आता FDA ची करडी नजर; पुणे विभागातील पाच आस्थापनांवर छापे, ३०.५७ लाखांचा साठा जप्त
3

Pune FDA News : हेल्थ सप्लिमेंट्सवर आता FDA ची करडी नजर; पुणे विभागातील पाच आस्थापनांवर छापे, ३०.५७ लाखांचा साठा जप्त

पुण्यात खाद्यपदार्थ विक्रेत्यांना FDAचा दणका! सात महिन्यांत २६.३३ कोटींचे अन्नपदार्थ जप्त; ४०५ जणांना अटक
4

पुण्यात खाद्यपदार्थ विक्रेत्यांना FDAचा दणका! सात महिन्यांत २६.३३ कोटींचे अन्नपदार्थ जप्त; ४०५ जणांना अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.