
Maharashtra News, ST Sange Tirthatan Swargate, MSRTC Pune Tour Packages
दिवाळीच्या काळात प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी एसटी महामंडळाने बसची संख्या आणि फेऱ्यांमध्ये वाढ केली होती. दिवाळीनंतर आता भाविक आणि पर्यटकांसाठी विशेष तीर्थाटन सहलींचे नियोजन करण्यात आले आहे. स्वारगेट आगारातून १२ नोव्हेंबरपासून या सहलींना सुरुवात झाली असून, कोकण दर्शनासह काही सहली यापूर्वीच पार पडल्या आहेत.
– १६ ते २१ नोव्हेंबर : उज्जैन, ओंकारेश्वर आणि इंदूर दर्शन.
– १७ आणि १८ नोव्हेंबर : कोल्हापूरची महालक्ष्मी, बाळूमामा आदमापूर दर्शन, नरसोबाची वाडी आणि खिद्रापूर
– १९ ते २२ नोव्हेंबर : पाच ज्योतिर्लिंग दर्शन. यामध्ये औंढा नागनाथ, परळी वैजनाथ, घृष्णेश्वर, त्र्यंबकेश्वर आणि भीमाशंकर
– १९ ते २२ नोव्हेंबर आणि २७ ते ३० नोव्हेंबर : बदामी-हंपी पर्यटन
– २३ ते २७ नोव्हेंबर : तुळजापूर, कोल्हापूर, माहूर आणि वणी येथील साडेतीन शक्तिपीठांचे दर्शन.
– २७ नोव्हेंबर ते १ डिसेंबर : शेगाव, माहूर आणि लोणार सरोवर
– २८ आणि २९ नोव्हेंबर : अष्टविनायक दर्शन
पुणे शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याच्या हालचाली सुरु; प्रशासनाच्या निर्णयाकडे पुणेकरांचे लक्ष
स्वारगेट आगार व्यवस्थापक प्रमोद धायतोंडे म्हणाले की, ‘एसटी संगे तीर्थाटन’ योजनेअंतर्गत महिला, मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना तिकिटात ५० टक्के सवलत मिळणार आहे. तर ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे कुटुंबासह देवदर्शन आणि पर्यटनाचा आनंद घेण्याची संधी प्रवाशांना मिळणार आहे. धार्मिक स्थळांसोबतच ऐतिहासिक आणि निसर्गरम्य पर्यटनस्थळांना भेट देण्याची संधी या योजनेतून उपलब्ध झाली आहे. अधिकाधिक नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
Ans: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) पुणे विभागातील स्वारगेट आगाराने भाविक आणि पर्यटकांसाठी ‘एसटी संगे तीर्थाटन’ ही विशेष योजना सुरू केली आहे.
Ans: नोव्हेंबर महिन्यात महाकाल दर्शन, पाच ज्योतिर्लिंग, साडेतीन शक्तिपीठे आणि अष्टविनायक अशा एकूण नऊ विशेष सहलींचे नियोजन करण्यात आले आहे.
Ans: इच्छुक भाविक आणि पर्यटकांना स्वारगेट एसटी बस स्थानकावरील आरक्षण केंद्रावर जाऊन या सहलींसाठी आगाऊ नोंदणी करता येणार आहे.