Pune MSEB: वीजबिल भरायला पुणेकरांची टाळाटाळ? तब्बल ‘इतक्या’ कोटींची थकबाकी
Pune MSEB: महावितरणच्या विभाग, परिमंडळ आणि मंडळनिहाय मागणी व वसुली अहवालातून ही माहिती समोर आली आहे. नोव्हेंबर २०२६ मधील १३ तारखेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, राज्यातील वीजग्राहकांकडील थकबाकी ३ हजार ३०१ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
Pune MSEB: पुणे विभागातील वीजग्राहकांकडे महावितरणची तब्बल ४३८.८ कोटी रुपयांची थकबाकी आहे. राज्यातील विभागनिहाय थकबाकीच्या आकडेवारीत पुणे विभागाचाही मोठा वाटा असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, राज्यात महावितरणची एकूण वीजबिल येणी ८ हजार २९० कोटी रुपयांवर पोहोचली असून, आतापर्यंत (Pune) केवळ १ हजार ८२७ कोटी रुपयांची वसुली झाली आहे. एकूण येणीच्या तुलनेत वसुलीचे प्रमाण अवघे २२ टक्के असल्याने महावितरणसमोर थकबाकी वसुलीचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
महावितरणच्या विभाग, परिमंडळ आणि मंडळनिहाय मागणी व वसुली अहवालातून ही माहिती समोर आली आहे. नोव्हेंबर २०२६ मधील १३ तारखेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, राज्यातील वीजग्राहकांकडील थकबाकी ३ हजार ३०१ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. मार्च २०२६ अखेरची शिल्लक थकबाकी, ऑक्टोबरअखेरची शिल्लक आणि नोव्हेंबरमधील नवीन वीजबिलांची मागणी विचारात घेता एकूण येणी ८ हजार २९० कोटी रुपये झाली आहेत.
राज्यातील विभागनिहाय थकबाकीचा विचार करता, छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वाधिक १ हजार ७१५ कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यानंतर कोकण विभागात ६०१.२ कोटी, नागपूर विभागात ५४६.५ कोटी, तर पुणे विभागात ४३८.८ कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे पुणे विभागातील थकीत वीजबिलांची वसुली करणेही महावितरणसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.
छत्रपती संभाजीनगर विभागात २ हजार ७१ कोटी रुपयांची एकूण येणी असताना आतापर्यंत केवळ १३२ कोटी रुपयांची वसुली झाली आहे. वसुलीचे प्रमाण अवघे ६.४ टक्के आहे. या विभागात १ हजार ७१५ कोटी रुपयांची थकबाकी कायम आहे. विशेषतः नांदेड झोनमध्ये १ हजार १९ कोटी रुपयांची येणी असताना केवळ ३२ कोटी रुपये वसूल झाले आहेत. परभणी परिमंडळात ६८१ कोटी रुपयांच्या येणीपैकी अवघी ६.९ कोटी रुपयांची वसुली झाली आहे.
नोव्हेंबर महिन्यात राज्यात ५ हजार २८८ कोटी रुपयांची वीजबिलांची मागणी नोंदविण्यात आली होती. त्यापैकी १ हजार ८२७ कोटी रुपये वसूल झाले आहेत. चालू महिन्याच्या मागणीच्या तुलनेत वसुलीचे प्रमाण ३४.५ टक्के आहे. एकूण येणी आणि प्रत्यक्ष वसुली यातील मोठी तफावत पाहता महावितरणला विभागनिहाय नियोजन, थकबाकीदार ग्राहकांकडे सातत्याने पाठपुरावा आणि विशेष वसुली मोहिमांवर भर द्यावा लागणार आहे.