Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 17 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एफसी रोडवरील अतिक्रमणावरून भाजप नगरसेवक आक्रमक; महापालिका सभागृहातच आंदोलन

पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरील (एफसी रोड) पदपथांवर वारंवार होणाऱ्या अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून भाजपच्याच नगरसेवकांनी पुणे महापालिकेच्या सभागृहात आंदोलन केले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 17, 2026 | 01:53 PM
एफसी रोडवरील अतिक्रमणावरून भाजप नगरसेवक आक्रमक; महापालिका सभागृहातच आंदोलन

एफसी रोडवरील अतिक्रमणावरून भाजप नगरसेवक आक्रमक; महापालिका सभागृहातच आंदोलन

Follow Us
Follow Us:
  • एफसी रोडवरील अतिक्रमणाचा मुद्दा चांगलाच तापला
  • भाजपच्याच नगरसेवकांचे सभागृहात आंदोलन
  • आयुक्तांचे आठवडाभरात कारवाईचे आश्वासन
पुणे : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरील (एफसी रोड) पदपथांवर वारंवार होणाऱ्या अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून भाजपच्याच नगरसेवकांनी पुणे महापालिकेच्या सभागृहात आंदोलन केले आहे. नागरिकांकडून सातत्याने तक्रारी करूनही अतिक्रमणाचा प्रश्न सुटत नसल्याबद्दल नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांना होणारा त्रास, वाहतुकीची कोंडी आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

 

नगरसेवक सुनील पांडे, रवींद्र साळेगावकर, निवेदिता एकबोटे आणि पूजा जागडे यांनी एफसी रोडवरील परिस्थितीचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. या परिसरातील पदपथांवर अनधिकृत विक्रेते आणि व्यावसायिकांकडून वारंवार अतिक्रमण केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. कारवाई केल्यानंतर काही दिवसांतच पुन्हा त्याच ठिकाणी अतिक्रमण होत असल्याने महापालिकेच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.

दरम्यान, एफसी रोड परिसरात महिलांच्या परवानगीशिवाय त्यांचे व्हिडिओ काढले जात असल्याच्या तक्रारीही नगरसेवकांनी मांडल्या. त्यामुळे केवळ अतिक्रमणाचा प्रश्न न राहता नागरिकांच्या, विशेषतः महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दाही गंभीर बनला असल्याचे त्यांनी सांगितले. काही महापालिका अधिकारी विक्रेत्यांकडून हप्ते घेत असल्याचा गंभीर आरोपही नगरसेवकांनी केला. तसेच कारवाईदरम्यान जप्त केलेला माल दंड न आकारता पुन्हा संबंधित विक्रेत्यांना परत दिला जात असल्याचेही त्यांनी सभागृहात सांगितले. त्यामुळे अतिक्रमणाविरोधातील कारवाई प्रभावी होत नसल्याचा आरोप करण्यात आला.

हे सुद्धा वाचा : लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात; 20 हजार रुपये स्वीकारताना रंगेहात पकडले

भाजपचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनीही या प्रकरणात तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. एफसी रोडवरील अतिक्रमण कायमस्वरूपी हटविण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली. दरम्यान, महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी अतिक्रमणाविरोधात आठवडाभरात कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. त्यामुळे आता प्रशासनाकडून प्रत्यक्षात कोणती कारवाई केली जाते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा : पुणे शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याच्या हालचाली सुरु; प्रशासनाच्या निर्णयाकडे पुणेकरांचे लक्ष

💡

Frequently Asked Questions

  • Que: एफसी रोडवरील अतिक्रमणाचा मुद्दा कोणी उपस्थित केला?

    Ans: भाजपचे नगरसेवक सुनील पांडे, रवींद्र साळेगावकर, निवेदिता एकबोटे आणि पूजा जागडे यांनी पुणे महापालिकेच्या सभागृहात एफसी रोडवरील अतिक्रमणाचा मुद्दा उपस्थित केला.

  • Que: नगरसेवकांनी महापालिका अधिकाऱ्यांवर कोणते आरोप केले?

    Ans: काही अधिकारी विक्रेत्यांकडून हप्ते घेत असल्याचा आणि जप्त केलेला माल दंड न आकारता पुन्हा विक्रेत्यांना परत दिला जात असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला.

  • Que: एफसी रोडवरील अतिक्रमणावर कारवाई कधी होणार?

    Ans: महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी वारंवार होणारे अतिक्रमण रोखण्यासाठी आठवडाभरात कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.

Web Title: Bjp corporators have taken an aggressive stance regarding encroachments on fc roa nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2026 | 01:53 PM

Topics:  

  • BJP
  • Pune mahapalika
  • pune news

संबंधित बातम्या

पुणे शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याच्या हालचाली सुरु; प्रशासनाच्या निर्णयाकडे पुणेकरांचे लक्ष
1

पुणे शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याच्या हालचाली सुरु; प्रशासनाच्या निर्णयाकडे पुणेकरांचे लक्ष

Pune MSEB: वीजबिल भरायला पुणेकरांची टाळाटाळ? तब्बल ‘इतक्या’ कोटींची थकबाकी
2

Pune MSEB: वीजबिल भरायला पुणेकरांची टाळाटाळ? तब्बल ‘इतक्या’ कोटींची थकबाकी

Pune Weather: हुडहुडी भरणार! कारण पुण्यात गारठा वाढणार; स्वेटर घालूनच फिरा; पुढील काही दिवसांत…
3

Pune Weather: हुडहुडी भरणार! कारण पुण्यात गारठा वाढणार; स्वेटर घालूनच फिरा; पुढील काही दिवसांत…

दिवाळी झाली तरी Pune Railway Station वरून गर्दी हटेना! 13 दिवसांत 22 लाख प्रवासी तर पुणे विभागाने…
4

दिवाळी झाली तरी Pune Railway Station वरून गर्दी हटेना! 13 दिवसांत 22 लाख प्रवासी तर पुणे विभागाने…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.