Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात अभ्यासिकांसाठी नियंत्रण नियमावली हाेणार; नेमकं काय करणार उपाययाेजना?

पुणे शहरातील अनधिकृत अभ्यासिका आणि पेईंग गेस्ट यासाठी महापालिका नियंत्रण नियमावली करणार आहे. परीक्षेसाठी येणारे विद्यार्थी आणि व्यावसायिकांमुळे स्थानिकांना हाेणाऱ्या त्रासामुळे महापालिकेने हे पाऊल उचलले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 06, 2025 | 12:09 PM
पुण्यात अभ्यासिकांसाठी नियंत्रण नियमावली हाेणार; नेमकं काय करणार उपाययाेजना?

पुण्यात अभ्यासिकांसाठी नियंत्रण नियमावली हाेणार; नेमकं काय करणार उपाययाेजना?

Follow Us
Close
Follow Us:
  • विद्यार्थी आणि व्यावसायिकांमुळे स्थानिकांना त्रास
  • पुण्यात अभ्यासिकांसाठी नियंत्रण नियमावली हाेणार
  • नेमकं काय करणार उपाययाेजना?
पुणे : पुणे शहरातील अनधिकृत अभ्यासिका आणि पेईंग गेस्ट यासाठी महापालिका नियंत्रण नियमावली करणार आहे. परीक्षेसाठी येणारे विद्यार्थी आणि व्यावसायिकांमुळे स्थानिकांना हाेणाऱ्या त्रासामुळे महापालिकेने हे पाऊल उचलले आहे. सर्वेक्षण करणे, पथारी, हातगाडी व्यावसाियकांवर कारवाई करणे, मिळकत कर विभाग आणि बांधकाम विभागामार्फतही कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुण्यात राज्यभरातून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थी शहरात राहत आहेत. स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी अनेक क्लासेस तसेच अभ्यासिकांची संख्या शहरात वाढत आहे. त्यामुळे अनधिकृत पथारी, स्टाॅलधारक व्यावसायिकायांची संख्या वाढून अतिक्रमणात भर पडली आहे. याचा त्रास स्थानिक पुणेकरांना हाेऊ लागला आहे. यासंदर्भात आलेल्या तक्रारींची दखल घेत पृथ्वीराज बी पी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत अनधिकृत अभ्यासिका आणि पेईंग गेस्ट यांच्यासाठी नियंत्रण नियमावली करण्याचे ठरले. तसेच इतर काही निर्णय घेण्यात आले.

या बैठकीस अतिक्रमण/अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाचे प्रमुख सोमनाथ बनकर, परिमंडळ क्र. ०५ उपायुक्त निखील मोरे, कसबा-विश्रामबागवाडा सहाय्यक आयुक्त प्रदिप आव्हाड, कार्यकारी अभियंता सुरेंद्र कर्पे, मुख्य सुरक्षा अधिकारी रमेश शेलार, कर आकारणी व कर संकलन विभागाचे अधिकारी, राष्ट्रवादी क्रॉंग्रेस पक्षाचे प्रतिनिधी राहुल देखणे आदी उपस्थित होते. बैठकीत स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांमुळे होणाऱ्या त्रासाबाबत चर्चा झाली.

शहरात साडे सातशेहून अधिक अभ्यासिका उभारण्यात आल्या आहेत. नवी पेठेतील अभ्यासिकेला आग लागल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा समोर आला होता. त्यावर महापालिकने शहरातील अभ्यासिकांचे सर्वेक्षण केले होते. त्याचा अहवाल तात्कालीन महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांना सादर करण्यात आला होता. तसेच अग्नीशमन दलाकडूनही अभ्यासिंकाचे फायर ऑडिट पूर्ण केले जाणार होते. मात्र यावर पुढे कार्यवाही करण्यास प्रशासनाने उदासीनता दाखविली.

पुणे शहरातील मुख्य भागात, पेठांमध्ये विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल मोठ्या प्रमाणात उभारण्यात आले आहेत. तसेच खानावळी, हॉटेल व्यावसायिकांचे जाळे मोठ्या प्रमाणात विस्तारलले आहे. तर ठिकठिकाणी खाऊ गल्ल्या उभारण्यात आल्या आहेत. त्यामुळे रस्त्यांवर गर्दी मोठ्या प्रमाणात असते. याचा त्रास अनेक वर्षांपासून स्थानिक नागरिकांना सहन करावा लागत आहे. महापालिकेला कर भरुन देखील सुविधा मिळत नाहीत. तसेच बाहेरुन आलेल्यांचा त्रास का सहन करावा, अशा तक्रारी महापालिकेकडे आल्या आहेत. यासंदर्भात कारवाई करण्यासाठी पुढील १० ते १५ दिवसात पोलिस अधिकारी यांच्यासोबत संयुक्त बैठकीचे नियोजन करण्यात येणार आहे. याबाबतची आढावा बैठक पुन्हा १७ डिसेंबर रोजी घेतली जाणार आहे.

काय करणार उपाययाेजना?

  • पार्किंगमधील अनधिकृत अभ्यासिकांवर ७ दिवसांमध्ये कारवाई करण्यात येणार असून, हे काम बांधकाम विकास विभाग करणार आहे.
  • अभ्यासिका, पेंईंग गेस्ट यांच्याबाबत नियंत्रण नियमावली तयार करण्यात येणार आहे.
  • अनधिकृत अभ्यासिका, पेंईंग गेस्ट यांचे सर्वेक्षण बांधकाम विकास विभागाकडून केले जाणार आहे.
  • अभ्यासिका जवळील अनधिकृत पथारी तसेच हातगाड्या यांच्यावर रात्रीच्या वेळी कारवाई केली जाणार.
  • कर आकारणी व कर संकलन विभागाकडील पेठ निरीक्षक यांचेमार्फत अभ्यासिका, पेंईंग गेस्ट यांचे सर्वेक्षण करणे.
महापालिकेने गेल्या वर्षी केलेल्या सर्वेक्षणात अभ्यासिकांमध्ये आगविरोधी यंत्रणांचा अभाव असल्याचे निदर्शनास आले होते. दरम्यान, शहरात अभ्यासिका ७५० पेक्षा जास्त असल्याचे सांगितले होते. प्रत्यक्षात मात्र दोन हजारहून अधिक अभ्यासिका आहेत. पुण्यात सुमारे अडीच ते तीन लाख विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. त्यामुळे पुणे शहराच्या पायाभूत सुविधांवर तणाव येत असल्याची चर्चा केली जात आहे. शहरात पेंईंग गेस्ट, हॉस्टेल याबाबतची पाहणी कर आकारणी विभागाकडून केली जाणार आहे. त्यानुसार कर आकारणी केली जाणार आहे. असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

Web Title: Pune municipal corporation to make regulations for study center in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 06, 2025 | 12:09 PM

Topics:  

  • maharashtra
  • Pune mahapalika
  • pune news

संबंधित बातम्या

महाराष्ट्र आणि जमर्नीतील ‘या’ राज्यामध्ये करार! परदेशात शिक्षण घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी
1

महाराष्ट्र आणि जमर्नीतील ‘या’ राज्यामध्ये करार! परदेशात शिक्षण घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी

पुण्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळासंदर्भात घडामोडींना वेग; सोमवारी महत्त्वपूर्ण बैठक
2

पुण्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळासंदर्भात घडामोडींना वेग; सोमवारी महत्त्वपूर्ण बैठक

IMD Weather Update : हुडहुडी! ऐन थंडीत पावसाचा कहर, ‘या’ तीन दिवसात अतिमुसळधार पावसाचा इशारा
3

IMD Weather Update : हुडहुडी! ऐन थंडीत पावसाचा कहर, ‘या’ तीन दिवसात अतिमुसळधार पावसाचा इशारा

CM Devendra Fadnavis: फडणवीस सरकारची ऐतिहासिक कामगिरी, एका महिन्यात ४५,९११ सौर पंप लावून ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये नोंद
4

CM Devendra Fadnavis: फडणवीस सरकारची ऐतिहासिक कामगिरी, एका महिन्यात ४५,९११ सौर पंप लावून ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये नोंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.