Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 26 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News: कर्जतमध्ये प्रवृत्ती, विकृती विरुद्ध परिवर्तन, सुनील तटकरे यांची माहिती

कर्जत परिवर्तन आघाडीने मिळवलेला विजय हा अजितदादा आणि कर्जत तालुक्यातील जनतेला समर्पित केल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 11, 2026 | 07:11 PM
कर्जतमध्ये प्रवृत्ती, विकृती विरुद्ध परिवर्तन, सुनील तटकरे यांची माहिती

कर्जतमध्ये प्रवृत्ती, विकृती विरुद्ध परिवर्तन, सुनील तटकरे यांची माहिती

Follow Us
Follow Us:

कर्जत : कर्जतमध्ये जनतेने हे परिवर्तन केले असून प्रवृत्ती आणि विकृती विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस तसेच शिवसेना ठाकरे गट यांच्या पाठीशी राहिली आहे. त्यामुळे कर्जत परिवर्तन आघाडीने मिळवलेला विजय हा अजितदादा आणि कर्जत तालुक्यातील जनतेला समर्पित केल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले.कर्जत मध्ये गटविकास अधिकारी यांना प्रशासकीय कामकाज करताना कोणतीही मांजर आडवी गेली तर आमच्या सभापती उप सभापती सर्व बघून घेतील असा विश्वास यावेळी तटकरे यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी यावेळी अभूतपूर्व यश दिल्याने या ठिकाणी आवर्जून उपस्थित असून जनतेचे प्रेम मिळाले आहे ते यापुढेही मिळत राहणार असा विश्वास व्यक्त केला.अजितदादा यांनी विकासाची दृष्टी आमच्यात निर्माण करून ठेवली असून आजचा विजय अजितदादा आणि कर्जतचे जनतेला समर्पित करीत आहे.जिल्ह्यामध्ये होणारे राजकारण आपण अनुभवत असून सुधाकर घारे यांनी अध्यक्ष पदाच्या काळात पक्षाला चांगले यश मिळवून दिले आहे हे देखील महत्वाचे आहे. नगरपरिषद मध्ये परिवर्तनाची चाहूल असून प्रवृती आणि विकृतीच्या विरोधात लढा घ्यायचा असतो.मात्र आम्ही लढतो ते संविधानाच्या अधिकारात लढत असून छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू फुले यांच्या विचाराने आम्ही कार्य करीत आहोत.

आज जिल्हा परिषदेत सिंहाचा वाटा 34 वर्षांनी घेतला असून 1992 नंतर अशी लाट कर्जत मध्ये दिसून येत आहे.सर्वांनी एक होण्याची दाखवलेली जिद्द यामुळे सहा शून्य यासाठी तुमच्यापुढे नतमस्तक आहे. कर्जत तालुक्यातील परिवर्तन आघाडीचे कार्यकर्ते हे प्रवृत्तीच्या विरुद्ध उभा राहिला असून कितीही आमिष आली तरी कार्यकर्ते ठाम होते.त्यामुळे कार्यकर्त्यांचे कौतुक आणि आभार मानणे महत्वाचे असून लोकाभिमुख प्रशासन चालविण्यासाठी कार्यकर्त्यांनी सभापती उप सभापती यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.

गेली 35 वर्षे रोहा पंचायत समिती मध्ये सभापती पदाच्या निवडणुकीला उपस्थित असायची मात्र यावेळी रोहा येथे शुभेच्छा देऊन कर्जत पंचायत समिती मध्ये आलो असल्याचे सुनील तटकरे यांनी सांगितले. उद्याची सर्वांना काळजी आहे पण चिंता करू नका आपण निश्चिंत राहा अशी सूचक विधान सुनील तटकरे यांनी यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने स्पष्ट केले.राज्याचे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा केली असल्याचे देखील यावेळी गटविकास अधिकारी यांना प्रशासकीय कामकाज करताना कोणती मांजर आडवी गेली तर आमच्या पदाधिकारी भगिनी आणि अन्य सदस्य हे तुमच्यासमोर येणाऱ्या अडचणी दूर होतील असा टोला देखील तटकरे यांनी कोणाचेही नाव न घेता मारला.यावेळी शेकापचे विलास थोरवे,अशोक भोपतराव,माधव कोळंबे यांनी विचार मांडले.

Government Scheme: आता महिला शेतकऱ्यांसाठी विशेष विधेयक मांडणार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे वक्तव्य

राष्ट्रवादीला प्रथमच बहुमत…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना 1998 मध्ये झाली पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एकदाही सत्ता आली नव्हती. मात्र पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पहिल्यांदा सत्तेवर आली आहे.मधल्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अडीच वर्षासाठी सभापती मिळाले होते,पण त्यावेळी पाच पाच असे बलाबल झाले होते,त्यावेळी चिठ्ठीवर सुवर्णा बांगारे या सभापती झाल्या होत्या.

कर्जत मध्ये सभापती उप सभापती दोन्ही पदे एकाच जिल्हा परिषद गटात

कर्जत पंचायत समिती मध्ये बहुमत असलेल्या कर्जत परिवर्तन आघाडी कडून सभापती आणि उप सभापती अशी दोन्ही पदे एकाच जिल्हा परिषद गटातील सदस्यांना देण्यात आली.सभापती बनलेल्या नमिता सुधाकर घारे या मोठे वेणगाव जिल्हा परिषद गटातील बीड बुद्रुक पंचायत समिती गणामधून निवडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार म्हणून निवडून आल्या आहेत.तर उप सभापती बनलेल्या चित्रा जगदीश ठाकरे या मोठे वेणगाव गणामधून शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार म्हणून निवडून आल्या आहेत. चित्रा ठाकरे यांनी कर्जत चे आमदार महेंद्र थोरवे यांच्या सुनबाई आणि युवासेना उत्तर रायगड जिल्हा युवा अधिकारी प्रसाद थोरवे यांच्या पत्नी यांचा पराभव करून विजय मिळविल्याने त्यांना पहिल्याच प्रयत्नात सभापती पदाची संधी मिळाली असल्याचे बोलले जात आहे.

मात्र कर्जत पंचायत समितीचे सभापती आणि उप सभापती ही दोन्ही पदे प्रामुख्याने वासरे खोंडा या मोठे वेणगाव जिल्हा परिषद गटाला मिळाली आहेत.कर्जत परिवर्तन आघाडी कडून नागरिकांचा मागास प्रवर्ग खुला गटासाठी असलेले सभापती पद हे महिला सदस्याला दिले आहे,तर उप सभापती पद देखील महिला सदस्याला दिले आहे.कर्जत परिवर्तन आघाडी मध्ये सभापती पद राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला तर उप सभापती ही पद शिवसेना ठाकरे गटाला मिळाले आहे.ठाकरे गटाचे जे चार उमेदवार विजयी झाले आहेत ते सर्व महिला उमेदवार आहेत.त्यामुळे चित्रा ठाकरे यांना संधी मिळाली असून उप सभापती ठाकरे यांचे पती जगदीश ठाकरे हे शिवसेना ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांचे जवळचे समजले जातात.

कर्जत मध्ये महायुती नाही..

राज्यात महायुती म्हणूनच सभापती उप सभापती पदावर विराजमान करण्याचा निर्णय महायुतीने घेतला आहे.मात्र कर्जत पंचायत समिती मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपली गट नोंदणी कर्जत परिवर्तन आघाडी म्हणून केली आहे.तर याच कर्जत परिवर्तन आघाडी मध्ये निवडणूक लढवणाऱ्या शिवसेना ठाकरे पक्षाची गट नोंदणी देखील कर्जत परिवर्तन आघाडी मध्ये सामील आहे.मात्र राज्यात महायुती सर्व ठिकाणी करण्याचे धोरण जाहीर झाल्यानंतर देखील कर्जत पंचायत समिती मध्ये सभापती आणि उप सभापती निवडणुकीत कर्जत परिवर्तन आघाडीचे उमेदवार यांचे निवड झाल्याने येथे महायुती नसल्याचे स्पष्ट झाले आहे.महायुती मधील शिवसेना शिंदे गटाचा एकमेव सदस्य असून एक सदस्य शेतकरी कामगार पक्षाचा आहे.

Thane News: वाहनचालकांनो लक्ष द्या! कल्याण-शिळ रोडवर वाहतुकीचे निर्बंध, मेट्रो-१२ कामामुळे ‘या’ वेळेत रस्ता बंद

Web Title: Information about tendencies in credit change against distortion sunil tatkare karjat news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2026 | 07:11 PM

Topics:  

  • Karjat
  • maharashtra
  • sunil tatkare

संबंधित बातम्या

ग्रामीण महाराष्ट्रातील ‘घुगुळ’ची प्री-वेडिंग परंपरा! कुलदेवतेला लग्नाला बोलावण्याची अनोखी प्रथा!
1

ग्रामीण महाराष्ट्रातील ‘घुगुळ’ची प्री-वेडिंग परंपरा! कुलदेवतेला लग्नाला बोलावण्याची अनोखी प्रथा!

डोक्यावर पाण्याची कळशी आणि रुखवताच्या टोपल्या! ग्रामीण महाराष्ट्रातील ‘बडाम नाचवण्याची’ ही अनोखी परंपरा तुम्हाला माहित आहे का?
2

डोक्यावर पाण्याची कळशी आणि रुखवताच्या टोपल्या! ग्रामीण महाराष्ट्रातील ‘बडाम नाचवण्याची’ ही अनोखी परंपरा तुम्हाला माहित आहे का?

महसुलात अव्वल पुण्याला अधिकाऱ्यांचा दुष्काळ! जिल्ह्यात 27 पैकी 21 दुय्यम निबंधक पदे रिक्त
3

महसुलात अव्वल पुण्याला अधिकाऱ्यांचा दुष्काळ! जिल्ह्यात 27 पैकी 21 दुय्यम निबंधक पदे रिक्त

Maharashtra Epstein Files : दिग्दर्शक स्वरूप सावंत यांच्या ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’चा फर्स्ट लूक प्रदर्शित
4

Maharashtra Epstein Files : दिग्दर्शक स्वरूप सावंत यांच्या ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’चा फर्स्ट लूक प्रदर्शित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.