दोन टोळ्यांच्या संघर्षातून आयुष कोमकरचा गोळ्या झाडून खून केल्यानंतर पसार झालेल्या बंडू आंदेकर टोळीतील सराइताला भारती विद्यापीठ पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे.
पोलिसांनी काही दिवसाखाली आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याच्यासह त्याच्या साथीदारांना अटक केली आहे. अशातच आता आणखी आंदेकर टोळीच्या अडचणी वाढल्या आहेत.
टोळी युद्धातून घडलेल्या आयुष कोमकर खूनप्रकरणात पुणे पोलिसांनी आंदेकर टोळीची पाळेमुळे खोदून काढण्यास सुरूवात केली आहे. बंडू आंदेकर व कुटूंबाची १८ कोटींची मालमत्ता निष्पन्न केली आहे.
आंदेकर टोळीवरील कारवाईचा फास पुणे पोलिसांनी आणखीनच आवळला असून, खंडणी उकळल्याप्रकरणी आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर, माजी नगरसेवक वनराजची पत्नी सोनालीसह ११ जणांविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
आंदेकर टोळीने वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आयुष कोमकरवर गोळ्या झाडून त्याचा खून केला. आयुषची आई कल्याणी कोमकर यांनी बंडू आंदेकर आणि संजीवनी कोमकर यांच्यातील वादाबाबत माहिती…
आयुषच्या खुनाप्रकरणी पोलिसांनी १३ जणांवर गुन्हा दाखल केला असून, आतापर्यंत ८ जणांना अटक केली आहे. आंदेकर टोळीवर पुणे पोलिसांनी मकोका अंतर्गत कारवाई केली आहे.
पुणे पोलिसांनी आयुष कोमकर हत्याप्रकरणात संपूर्ण आंदेकर कुटुंबावर गुन्हा दाखल केला आहे. आयुषच्या हत्येनंतर पुन्हा एकदा पुण्याच्या नाना पेठेत दहशत माजवणाऱ्या आंदेकर टोळीचा रक्तरंजित इतिहास समोर आला आहे.
ऐन गणपती बाप्पांच्या विसर्जनाच्या पूर्वसंध्येला पुणे शहरामध्ये एका टोळीने १८ वर्षीय तरुणाची हत्या केली. या हत्येनंतर पुणे पोलीस आता ॲक्शन मोडमध्ये आले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून शहरात वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला' यावरून मोठी चर्चा सुरू होती. याप्रकरणात भारती विद्यापीठ पोलिसांच्या सतर्कतेमुळे एक कट उधाळण्यात आला होता. रेकी करणाऱ्यांना चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं…
वनराज आंदेकर हत्येला वर्ष पूर्ण होताच पुन्हा "गेम" उडणार अशी हवा गुन्हेगारी वर्तुळात होती. टोळकं सज्ज होतं, शस्त्रं देखील आणली होती. पण पोलिसांच्या अचूक वॉचमुळे मध्यरात्रीचा कट फसला.
माजी नगरसेवक वनराज आंदेकर खूनप्रकरणात पुणे पोलिसांनी १७०० पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. तब्बल २१ आरोपींविरोधात भक्कम पुरावा गोळा करून हे दोषारोपपत्र दाखल केले आहे.