Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Municipal Election 2026: बांधकामांची वाढ, पण समस्या कायम; वडगाव शेरीत पायाभूत सुविधांचा तुटवडा

रस्त्यांच्या बाबतीतही चित्र समाधानकारक नाही. छत्रपती संभाजी महाराज चौक ते सैनिकवाडी या मार्गाचे रुंदीकरण रखडले असून, जुना मुंढवा रस्त्यावरील वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 10, 2026 | 03:04 PM
Pune Municipal Election 2026: Construction is increasing, but problems persist

Pune Municipal Election 2026: Construction is increasing, but problems persist

Follow Us
Close
Follow Us:
  • पुर, कोंडी आणि अपुरी सुविधा; वडगाव शेरीतील नागरिकांची कोंडी
  • मुसळधार पावसात पूरस्थिती निर्माण होऊन पाणी थेट घरांमध्ये शिरते
  • मुसळधार पावसात पूरस्थिती निर्माण होऊन पाणी थेट घरांमध्ये शिरते
आकाश ढुमेपाटील, Kalyaninagar: वडगाव शेरी प्रभागात गेल्या दहा वर्षांत अनेक विकासकामे झाली असली, तरी पावसाळ्यातील पुरस्थिती, रस्त्यांचे अपूर्ण रुंदीकरण, डीपी रस्त्यांचा रखडलेला विकास आणि वाहतूक कोंडी या मूलभूत समस्या आजही ‘जैसे थे’ आहेत. राजे छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, क्रीडांगणे, जलतरण तलाव, कल्याणीनगर येथील नदीवरील पूल, पाणीपुरवठा सुधारणा करून टँकरमुक्ती अशा कामांमुळे प्रभागाला काही प्रमाणात दिलासा मिळाला, मात्र वाढती लोकसंख्या, अनियंत्रित वाहनसंख्या आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे नागरिकांची गैरसोय कायम आहे.

उगाव/वडगाव शेरी परिसरात मागील दशकात मोठ्या प्रमाणावर बांधकामे झाली. तरीही अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था, ड्रेनेजलाइनचे वारंवार लीकेज, दूषित पाणीपुरवठा, मोकळ्या जागांतील कचऱ्याचे ढीग आणि पावसाळ्यात रस्त्यांवर साचणारे पाणी या समस्या कमी झालेल्या नाहीत. हरीनगर-आदर्शनगर, सैनिकवाडी, उज्ज्वल गार्डन, कल्याणीनगर आदी भागांत मुसळधार पावसात पूरस्थिती निर्माण होऊन पाणी थेट घरांमध्ये शिरते, अशी नागरिकांची तक्रार आहे. उपाययोजनांचा अभाव आणि जलनिचऱ्याची अपुरी क्षमता ही यामागची प्रमुख कारणे मानली जातात.

Maharashtra Politics: “… व्यभिचार झाकण्याचा प्रयत्न?” अत्याचार प्रकरणातील आरोपी नगरसेवक अन् राऊतांची भाजपवर टीका

रस्त्यांच्या बाबतीतही चित्र समाधानकारक नाही. छत्रपती संभाजी महाराज चौक ते सैनिकवाडी या मार्गाचे रुंदीकरण रखडले असून, जुना मुंढवा रस्त्यावरील वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. काही ठिकाणी फेरीवाले, अनधिकृत पार्किंग आणि रस्त्यावरच होणारी भाजीविक्री यामुळे प्रवास अधिकच कोंडीत अडकतो. कल्याणीनगर परिसरातील मध्यरात्रीपर्यंत सुरू राहिल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.

गरजा लक्षात घेऊन कामे पूर्ण व्हावीत

माजी लोकप्रतिनिधींच्या मते, प्रभागासाठी मोठ्या प्रमाणावर निधी आणून रस्ते, उद्याने, क्रीडांगणे, पार्किंग, सांस्कृतिक हॉल आणि स्वच्छतागृहे उभारण्यात आली.

काही ठिकाणी १०० टक्के विद्युत तारा भूमिगत केल्या असून ड्रेनेजची कामेही पूर्ण झाल्याचा दावा केला जातो.
भामा आसखेड प्रकल्पातून पाणीपुरवठा सुधारल्याने प्रभाग स्पॉट

टँकरमुक्ती शक्य झाली. तरीही लोकसंख्येचा वेग आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन ड्रेनेजची क्षमता वाढवणे, नाले-नद्या स्वच्छ ठेवणे आणि पूरनियंत्रणाची ठोस यंत्रणा उभारणे आवश्यक आहे.

नागरिकांकडून अपेक्षा स्पष्ट आहेत- अत्याधुनिक रुग्णालय, पालिकेची दर्जेदार इंग्रजी शाळा, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, महिलांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाय, तसेच अॅमिनिटी स्पेसचा प्रत्यक्ष विकास. भटक्या कुत्र्यांची समस्या आणि कचरा व्यवस्थापनही आव्हानच आहे.

कामांचा लाभ टिकवण्यासाठी, प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी नियोजन, आणि सातत्यपूर्ण देखरेख गरजेची आहे.

Nagpur Crime: कारमध्ये बनवला होता खाचा, डिलिव्हरी पूर्वीच अडकले; ओडिशाचे ४ गांजा तस्कर पोलिसांच्या जाळ्यात

दरवर्षी पावसाळा आला की हरीनगर, सैनिकवाडी उज्ज्वल उपाय नको, कायमस्वरूपी पूरनियंत्रण हवे.
स्थानिक रहिवासी, हरीनगर

विकासकामे झाली असली तरी अंतर्गत रस्ते, ड्रेनेज आणि पाणीपुरवठ्याच्या समस्या आजही कायम आहेत. वाढत्या लोकसंख्येचा विचार करून नियोजन झालेले दिसत नाही.
– नागरिक, वडगाव शेरी

८८ जुना मुंढवा रस्ता आणि सैनिकवाडी परिसरातील वाहतूक कोंडीमुळे दैनंदिन प्रवास त्रासदायक झाला आहे. रस्तारुंदीकरण रखडल्याचा फटका सर्वांनाच बसतो.
– वाहनचालक, कल्याणीनगर

नव्या रचेमध्ये प्रभाग तोडले
महापालिका निवडणुकीसाठी कल्याणीनगर-वडगाव शेरी या प्रभाग क्र. ५ ची एकूण लोकसंख्या ९१ हजार ३८१ आहे. २०१७ मध्ये वडगाव शेरीतील शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला गणेशनगर भाग दोन प्रभागात तोडला होता. मात्र, आता पुन्हा नव्या रचनेमध्ये गणेशनगर, शाखीनगर, त्रिदलनगर आणि म. हौ. बोर्डचा हा भाग वडगाव शेरीमध्ये जोडला आहे.

 

Web Title: Pune municipal election 2026 construction is increasing but problems persist vadgaon sheri faces a shortage of basic infrastructure

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 10, 2026 | 03:04 PM

Topics:  

  • Municipal Corporation Election
  • PMC Election 2026
  • Pune Politics

संबंधित बातम्या

Pune News : पुणेकरांचा नाद नाही! लाडक्या बहिणींच्या पैशांचा उल्लेख करत मागितले मत; थेट केली आमदारांविरोधात तक्रार
1

Pune News : पुणेकरांचा नाद नाही! लाडक्या बहिणींच्या पैशांचा उल्लेख करत मागितले मत; थेट केली आमदारांविरोधात तक्रार

Pune Politics : “…म्हणून अजितदादांनी आंदेकरांच्या घरात पुन्हा दिली उमेदवारी; आंदेकरांच्या मुलींनी मांडल्या भावना
2

Pune Politics : “…म्हणून अजितदादांनी आंदेकरांच्या घरात पुन्हा दिली उमेदवारी; आंदेकरांच्या मुलींनी मांडल्या भावना

Maharshtra Politics: ‘बिनविरोध निवड’ ही लोकशाहीच्या विरोधी! मतदार मतदानाच्या अधिकारपासूनच वंचित 
3

Maharshtra Politics: ‘बिनविरोध निवड’ ही लोकशाहीच्या विरोधी! मतदार मतदानाच्या अधिकारपासूनच वंचित 

निवडणूक काळातही पुणे शहरात अविरत स्वच्छता; भाजप उमेदवार राघवेंद्र बाप्पु मानकर यांची माहिती
4

निवडणूक काळातही पुणे शहरात अविरत स्वच्छता; भाजप उमेदवार राघवेंद्र बाप्पु मानकर यांची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.