Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

16th Finance Commission: १६ व्या वित्त आयोगाच्या निधीसाठी उत्पन्नवाढ बंधनकारक

16th Finance Commission: मार्गदर्शक सूचनांनुसार ग्रामपंचायतींनी २०२५-२६ या आर्थिक वर्षातील स्वतःच्या उत्पन्नाच्या तुलनेत किमान २.५ टक्के वाढ किंवा मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत किमान १.०२५ पट वाढ (यापैकी जी अट कमी असेल ती) साध्य करणे आवश्यक आहे

  • By anuradha sagar
Updated On: Jul 17, 2026 | 05:07 PM
रेपोदर स्थिर राहणार; एसबीआय रिसर्चने प्रसिद्ध केलेल्या अहवालात महत्त्वाची माहिती समोर

रेपोदर स्थिर राहणार; एसबीआय रिसर्चने प्रसिद्ध केलेल्या अहवालात महत्त्वाची माहिती समोर

Follow Us
Follow Us:

Pune News: १६ व्या वित्त आयोगाच्या निधीसाठी पात्र ठरण्यासाठी राज्यातील ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांना आता स्वतःच्या उत्पन्नात (ओन सोर्स रेव्हेन्यू (ओएसआर)) दरवर्षी किमान २.५ टक्के वाढ करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ग्रामविकास विभागाने सन २०२६ ते २०३१ या कालावधीसाठी वित्त आयोगाच्या अनुदान वितरणासंदर्भातील निकष आणि मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून, त्यामध्ये ही अट स्पष्ट करण्यात आली आहे.

देशभरात १ एप्रिल २०२६ पासून १६ व्या केंद्रीय वित्त आयोगाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यानुसार पुढील पाच वर्षांत ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांना आयोगाचा निधी वितरित करण्यात येणार आहे. मात्र, या निधीसाठी पात्र होण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी स्वतःच्या महसुलात सातत्याने वाढ करणे आवश्यक राहणार आहे.

NCP Politics: पार्थ दादांचे राजकीय करिअर संपवण्याचा कट…! राष्ट्रवादीत लेटरबॉम्ब

मार्गदर्शक सूचनांनुसार ग्रामपंचायतींनी २०२५-२६ या आर्थिक वर्षातील स्वतःच्या उत्पन्नाच्या तुलनेत किमान २.५ टक्के वाढ किंवा मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत किमान १.०२५ पट वाढ (यापैकी जी अट कमी असेल ती) साध्य करणे आवश्यक आहे. तसेच तिसऱ्या वर्षापासून प्रति कुटुंब किमान १,२०० रुपये इतके स्वतःचे वार्षिक उत्पन्न मिळविणे अनिवार्य करण्यात आले आहे.

पंचायत समित्यांसाठी ७५ टक्के ग्रामपंचायतींची अट

पंचायत समित्यांना १६ व्या वित्त आयोगाचा निधी मिळण्यासाठी त्यांच्या कार्यक्षेत्रातील किमान ७५ टक्के ग्रामपंचायतींनी स्वतःच्या उत्पन्नवाढीची अट पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. ही अट पूर्ण न झाल्यास संबंधित पंचायत समितीला आयोगाच्या निधीपासून वंचित राहावे लागू शकते.

Moshi Garbage Depot Accident: मोशी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाखांची मदत; पहिली रक्कम खात्यात जमा

जिल्हा परिषदांनाही समान निकष

जिल्हा परिषदांसाठीही हाच निकष लागू करण्यात आला आहे. जिल्ह्यातील किमान ७५ टक्के ग्रामपंचायती आणि संबंधित पंचायत समित्यांनी उत्पन्नवाढीच्या अटींची पूर्तता केल्यासच जिल्हा परिषदेला १६ व्या वित्त आयोगाच्या निधीसाठी पात्रता मिळणार आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांसमोर स्वतःचे महसूल स्रोत वाढविण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

 

 

Web Title: Pune news 16th finance commission rules gram panchayat zilla parishad mandatory revenue growth rules

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 05:07 PM

Topics:  

  • gram panchayat
  • Zilla Parishad

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.