Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 17 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सरकारी शाळेत ७ वर्षे दांडी मारून स्वतःची संस्था चालवली! छ. संभाजीनगरमधील ‘या’ शिक्षकाच्या पराक्रमावर सीईओंची मोठी कारवाई

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती बैठकीत ७ वर्षे गैरहजर असलेल्या शिक्षकाला पाठीशी घातल्याप्रकरणी सीईओ मिन्नू पी.एम. यांनी केंद्रप्रमुखाचे वेतन कापण्याचे व बीईओ यांना नोटीस देण्याचे आदेश दिले आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 17, 2026 | 02:16 PM
! छ. संभाजीनगरमधील 'या' शिक्षकाच्या पराक्रमावर सीईओंची मोठी कारवाई (Photo Credit- AI)

! छ. संभाजीनगरमधील 'या' शिक्षकाच्या पराक्रमावर सीईओंची मोठी कारवाई (Photo Credit- AI)

Follow Us
Follow Us:
  • सरकारी शाळेत ७ वर्षे दांडी मारून स्वतःची संस्था चालवली!
  • छ. संभाजीनगरमधील ‘या’ शिक्षकाच्या पराक्रमावर सीईओंची मोठी कारवाई
  • वाचा सविस्तर बातमी!
छत्रपती संभाजीनगर: सन २०१९ सालापासून कन्नड तालुक्यातील पांगरा झेडपी शाळेतील शिक्षक सलग गैरहजर आहे. तरीही त्याला पाठीशी घालण्यात येत असल्यामुळे संबंधित केंद्रप्रमुखांचे वेतन कापण्यात यावे आणि गटशिक्षणाधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश सीईओ मिन्नू पी.एम. यांनी गुरुवारी (१६) स्थायी समितीच्या बैठकीत दिले. शुक्रवारी (१७) संबंधित शिक्षकाने जिल्हा परिषदेत हजर होण्याचे आदेशही सीईओ यांनी बैठकीत दिले आहेत. जि.प. अध्यक्ष अविनाश गलांडे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी जिल्हा परिषदेच्या वेरूळ सभागृहात ही बैठक झाली.

जि.प. सदस्या दीपाली राजपूत यांनी सदरील प्रकार सभागृहाच्या निदर्शनास आणून दिला. त्या म्हणाल्या, पांगरा जि.प. शाळेतील शिक्षक भगवान बोराडे हे शाळेत सतत गैरहजर असतात. ते अर्जीत रजेवर असल्याचे सांगण्यात येते. विशेष म्हणजे त्यांच्या स्वतःच्या शैक्षणिक संस्था असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांनी, या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. मात्र सीईओ यांनी, चौकशीची गरज नसल्याचे सांगून केंद्रप्रमुखांचे वेतन कापण्याचे आणि कन्नड पं.स.च्या गटशिक्षणाधिकारी मो. सबाहन नईमोद्दीन यांना कारणे दाखवा नोटीस बजावून शुक्रवारी जिल्हा परिषदेत बोलाविण्याचे आदेश सीईओ मिन्नू यांनी दिले.

शाळा, अंगणवाड्यांच्या स्वच्छतागृहांची दुर्दशा झालेली आहे. देभेगावअंतर्गत येणाऱ्या केसापूर येथील शाळा, अंगणवाड्यांच्या आवारातील स्वच्छतागृहात साप निघाल्याचे राजपूत यांनी निदर्शनास आणून दिले. परिसरात बिबटेही येतात, असे त्या म्हणाल्या. तेव्हा ग्रामपंचायतींनी तातडीने आपल्या निधीतून दुरुस्ती करण्याचे निदेर्श सीईओ यांनी दिले. कन्नड तालुक्यातील अंबा उपळा येथे शिक्षकांचे समायोजन कधी करणार, असा प्रश्न शिवसेना सदस्य मनोज गायके यांनी उपस्थित केला.

CSMC Property Survey: मालमत्तांचे सर्वेक्षण आता खासगी एजन्सी करणार! मनपाचा हिरवा कंदील; पण ‘या’ नगरसेवकांचा तीव्र विरोध

शिक्षकांचे तात्काळ समायोजन करा

शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांनी शिक्षकांची पदे रिक्त जागा यांबाबत माहिती दिली आणि ८ दिवसांत समायोजन करण्यात येईल, असे सांगितले. जि.प. प्रशालेला वर्ग-२ चा मुख्याध्यापक नसल्यामुळे नियोजन बिघडत चाललेले आहे. यामुळे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे उपाध्यक्ष जितेंद्र जैस्वाल यांनी निदर्शनास आणून दिले. सावखेडा, गंगा येथे
शिक्षक नसल्याचे पंकज ठोंबरे म्हणाले, शिक्षका नसल्यामुळे शालेय व्यवस्थापन समिती शिक्षणप्रेमी नागरिक लोकवर्गणी करून मुलांना शिक्षण मिळावे यासाठी खाजगी शिक्षकांच नेमणूक करीत असल्याचे शिवसेनेचे सदस्ट संजय निकम म्हणाले. तसेच शाळाबाह कामासाठी शिक्षक घेऊ नका, अशी मागणीह निकम यांनी केली.

गटनेत्याला स्वतंत्र दालन द्या

जिपच्या प्रशासकीय इमारतीच्या मंजुरीपासून सर्व प्रकारचा निधी उपलब्ध करून देणार्या शिवसेना उबाठा गटनेत्याला व सदस्यांना बसण्यासाठी स्वतंत्र दालन का दिले जात नाही. एका पक्षाला एक न्याय आणि दुसर्याला सापत्न वागणूक का? असा सवाल शिवसेनेचे जि.प. सदस्य मनोज गायके यांनी उपस्थित केला. आतापर्यंत याबाबत मागणी केलेली असतानाही जाणूनबुजून दालन दिले जात नाही, असा आरोपही त्यांनी केला. अध्यक्ष अविनाश गलांडे व बांधकाम सभापती सचिन गरड यानी स्वतंत्र दालनाची व्यवस्था केली जाईल, असे सांगितले.

मुख्यमंत्र्यांचा मजीप्रा अधिकाऱ्यांना थेट दम! छत्रपती संभाजीनगरच्या पाणी योजनेत दिरंगाई खपवून घेणार नाही; फडणवीसांचा कडक इशारा

Web Title: Zp ceo minnu orders action against officers for shielding absent teacher marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 02:16 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Education Department
  • Teacher Job
  • Zilla Parishad

संबंधित बातम्या

ऐन पावसाळ्यात मराठवाडा तहानलेलाच! १८२ गावे अन् ११७ वाड्यांना ३०३ टँकरचा आसरा; तर ‘या’ जिल्ह्यातच सर्वाधिक टँकर सुरू
1

ऐन पावसाळ्यात मराठवाडा तहानलेलाच! १८२ गावे अन् ११७ वाड्यांना ३०३ टँकरचा आसरा; तर ‘या’ जिल्ह्यातच सर्वाधिक टँकर सुरू

मोठी बातमी ! MPSC परीक्षा ऑफलाईनच होणार; पुढच्या वर्षीपासून घेतली जाणार ऑनलाईन परीक्षा
2

मोठी बातमी ! MPSC परीक्षा ऑफलाईनच होणार; पुढच्या वर्षीपासून घेतली जाणार ऑनलाईन परीक्षा

CSMC Property Survey: मालमत्तांचे सर्वेक्षण आता खासगी एजन्सी करणार! मनपाचा हिरवा कंदील; पण ‘या’ नगरसेवकांचा तीव्र विरोध
3

CSMC Property Survey: मालमत्तांचे सर्वेक्षण आता खासगी एजन्सी करणार! मनपाचा हिरवा कंदील; पण ‘या’ नगरसेवकांचा तीव्र विरोध

मुख्यमंत्र्यांचा मजीप्रा अधिकाऱ्यांना थेट दम! छत्रपती संभाजीनगरच्या पाणी योजनेत दिरंगाई खपवून घेणार नाही; फडणवीसांचा कडक इशारा
4

मुख्यमंत्र्यांचा मजीप्रा अधिकाऱ्यांना थेट दम! छत्रपती संभाजीनगरच्या पाणी योजनेत दिरंगाई खपवून घेणार नाही; फडणवीसांचा कडक इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.