Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gramodayam Yojana : ग्रामीण तरुणांनो आता स्वतःचा बिझनेस सुरू करा! ‘ग्रामोदयम’ योजने अंतर्गत ट्रेनिंगसोबत बँक लोनचीही सोय

नाबार्ड आणि एनएसडीसीच्या या महत्त्वाच्या 'ग्रामोदयम' ग्रामीण उद्योजकता विकास होत आहे. कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ यांच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे. ग्रामीण उद्योजकतेसाठी सक्षम आणि सशक्त परिसंस्था उभारण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 13, 2026 | 07:34 PM
(फोटो सौजन्य: chatgpt)

(फोटो सौजन्य: chatgpt)

Follow Us
Follow Us:
  • ग्रामीण तरुणांनो आता स्वतःचा बिझनेस सुरू करा!
  • ग्रामोदयम’ योजने अंतर्गत ट्रेनिंगसोबत बँक लोनचीही सोय
ग्रामीण समृद्धीला चालना देणे हे नेहमीच नाबार्डच्या ध्येयदृष्टीचे आणि विकासात्मक दायित्वाचे केंद्रबिंदू राहिले आहे. नाबार्डच्या ४५ व्या स्थापना दिनानिमित्त, ग्रामीण भारतातील उद्योजकीय क्षमतेला नवी दिशा देण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या परिवर्तनशील ‘ग्रामोदयम’ उद्योजकता विकास कार्यक्रमाचे उद्घाटन नाबार्डचे अध्यक्ष डॉ. शाजी के. व्ही. यांच्या हस्ते करण्यात आले. हा उपक्रम कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय (एमएसडीई) यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (एनएसडीसी) यांच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे. ग्रामीण उद्योजकतेसाठी सक्षम आणि सशक्त परिसंस्था उभारण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या कार्यक्रमाची अंमलबजावणी इन्स्टिट्यूट फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट (आयआयडी) यांच्या माध्यमातून केली जाणार आहे.

Retail Inflation Update: सर्वसामान्यांचे बजेट बिघडलं! जून महिन्यात महागाई 4.38 टक्क्यांवर; आले-टोमॅटोचे भाव कडाडले

‘ग्रामोदयम’ हा ग्रामीण भारतातील युवकांना समर्पित विशेष उपक्रम आहे. या कार्यक्रमाचा उद्देश होतकरू उद्योजकांची ओळख पटविणे, त्यांना मार्गदर्शन करणे, आवश्यक प्रशिक्षण देणे आणि त्यांना सक्षम बनविणे हा आहे. या अंतर्गत त्यांना उद्योगाच्या गरजांनुसार कौशल्ये, उद्योजकतेशी संबंधित क्षमता तसेच आवश्यक सहाय्य यंत्रणांची उपलब्धता करून दिली जाईल. युवा नवोन्मेषकांना त्यांच्या कल्पनांचे व्यवहार्य उद्योगांमध्ये रूपांतर करण्यास सक्षम करून ‘ग्रामोदयम’ चे उद्दिष्ट स्थानिक संधींचे शाश्वत आर्थिक विकास आणि रोजगारनिर्मितीच्या प्रभावी माध्यमांमध्ये रूपांतर करणे हे आहे.

हा कार्यक्रम डिजिटल-फर्स्ट हायब्रिड अंमलबजावणी मॉडेलवर आधारित असून, देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये त्याची समान पोहोच सुनिश्चित करण्याचा उद्देश आहे. डिजिटल प्लॅटफॉर्म, सोशल मीडिया सहभाग, समुदाय संपर्क तसेच तळागाळातील जनजागृती मोहिमांच्या माध्यमातून इच्छुक उद्योजकांची नोंदणी केली जाईल आणि त्यांना उद्योजकतेच्या सुबद्ध प्रवासासाठी आवश्यक मार्गदर्शन दिले जाईल. या प्रवासामध्ये सायकोमेट्रिक मूल्यमापन, समुपदेशन, उद्योजकता विकास प्रशिक्षण, उद्योग/व्यवसाय-विशिष्ट प्रशिक्षण, मार्गदर्शन (मेंटॉरशिप) तसेच उद्योग स्थापनासाठी आवश्यक सहाय्याचा समावेश असेल. यामुळे सहभागी उद्योजकांना कल्पनेच्या संकल्पनेपासून (आयडिएशन) ते यशस्वी उद्योग उभारणीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर सर्वसमावेशक मार्गदर्शन आणि सहाय्य मिळेल.

पारंपरिक कौशल्य विकासाच्या पुढे जात ‘ग्रामोदयम’ हा कार्यक्रम सर्वसमावेशक सहाय्य व्यवस्था उपलब्ध करून देतो. यामध्ये व्यावसायिक संधींची ओळख, व्यवसाय आराखडा तयार करणे, उद्योग व्यवस्थापन प्रशिक्षण, कर्जसुविधा, बाजारपेठेशी जोडणी, मार्गदर्शन (मेंटॉरशिप) तसेच उद्योग स्थापन झाल्यानंतरही सातत्यपूर्ण मार्गदर्शन व सहाय्य (हँडहोल्डिंग) यांचा समावेश आहे. हा कार्यक्रम केवळ स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्यापुरता मर्यादित नसून, शाश्वत उद्योग विकासाच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती आणि समुदाय विकासाला चालना देण्यासाठीही तयार करण्यात आला आहे. अशा प्रकारे, हा कार्यक्रम सर्वसमावेशक आणि सक्षम ग्रामीण आर्थिक विकासाला गती देण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देईल.

कार्यक्रमांतर्गत नोंदणी झालेल्या सर्व लाभार्थ्यांचे एनएसडीसीच्या माध्यमातून ई-केवायसी (e-KYC) पडताळणी करण्यात येईल. त्यामुळे लाभार्थ्यांच्या सहभागामध्ये पारदर्शकता आणि प्रामाणिकता सुनिश्चित केली जाईल.प्रायोगिक (पायलट) टप्प्यात *‘ग्रामोदयम’*चा उद्देश विस्तारक्षम (स्केलेबल) आणि टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणाऱ्या अंमलबजावणी यंत्रणेद्वारे तीन वर्षांच्या कालावधीत सुमारे ४,००० ग्रामीण उद्योजक घडविणे आणि त्यांना आवश्यक सहाय्य उपलब्ध करून देणे हा आहे.

‘ग्रामोदयम’ची एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे त्याची सर्वसमावेशक कर्जसुविधा (एंड-टू-एंड क्रेडिट फॅसिलिटेशन) व्यवस्था. कार्यक्रमातील सहभागीांना बँक कर्जासाठी उपयुक्त सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि सहाय्य दिले जाईल. तसेच, त्यांना नाबार्ड समर्थित प्रादेशिक ग्रामीण बँका (आरआरबी) तसेच इतर वित्तीय संस्थांकडून कर्जसहाय्य मिळविण्यासाठी आवश्यक संपर्क आणि सहकार्य उपलब्ध करून दिले जाईल.याशिवाय, या कार्यक्रमांतर्गत डिजिटल कर्ज अर्ज करण्यासाठी सहाय्य तसेच संबंधित शासकीय योजना आणि प्रोत्साहनांविषयी मार्गदर्शनही दिले जाईल. यामुळे औपचारिक वित्तीय सेवांपर्यंतची पोहोच अधिक सुलभ होईल आणि नवीन उद्योग उभारणीतील आर्थिक अडथळे कमी करण्यास मदत मिळेल.

कार्यक्रमाच्या अंमलबजावणीची रचना एनएसडीसीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मशी एकात्मिक केली जाईल, ज्यामुळे लाभार्थ्यांच्या प्रगतीवर रिअल-टाइम देखरेख आणि मागोवा (ट्रॅकिंग) घेणे शक्य होईल. लाभार्थ्यांची निवड व सहभागीकरण (मोबिलायझेशन), प्रशिक्षण, उद्योगाची स्थापना आणि त्यानंतरच्या विकासापर्यंत प्रत्येक टप्प्यावर ही देखरेख केली जाईल.कार्यक्रमाच्या परिणामकारकतेचे मूल्यांकन करण्यासाठी एक सर्वसमावेशक इम्पॅक्ट असेसमेंट फ्रेमवर्क विकसित करण्यात आले आहे. या अंतर्गत प्रमुख कार्यप्रदर्शन निर्देशकांचे (Key Performance Indicators – KPI) नियमितपणे निरीक्षण केले जाईल. यामध्ये लाभार्थ्यांचे सहभागीकरण, लैंगिक समावेशकता, प्रशिक्षण पूर्णत्वाचा दर, प्रमाणपत्रांचे निष्कर्ष, जीएसटी आणि उद्यम (UDYAM) नोंदणी, उद्योगांचे कार्यान्वयन तसेच पडताळणी केलेल्या व्यावसायिक नोंदींच्या आधारे सरासरी विक्री कामगिरीचे मूल्यांकन यांचा समावेश असेल.

‘ग्रामोदयम’च्या माध्यमातून नाबार्ड आणि एनएसडीसी यांनी उद्योजकतेवर आधारित ग्रामीण परिवर्तनाला चालना देण्याची आपली वचनबद्धता पुन्हा अधोरेखित केली आहे. कौशल्य विकास, मार्गदर्शन (मेंटॉरशिप), डिजिटल नवोपक्रम, वित्तीय सेवांपर्यंतची पोहोच आणि बाजारपेठेशी जोडणी यांचा समन्वय साधत हा कार्यक्रम ग्रामीण उद्योजकांची नवी पिढी घडविण्याचा प्रयत्न करेल. ही पिढी सर्वसमावेशक विकासाला गती देईल, स्थानिक अर्थव्यवस्था अधिक सक्षम करेल आणि भारताच्या समृद्धी व आत्मनिर्भरतेच्या प्रवासात मोलाचे योगदान देईल. हा उपक्रम माननीय पंतप्रधानांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘विकसित भारत २०४७’ या संकल्पनेला साकार करण्याच्या दिशेनेही महत्त्वपूर्ण योगदान देईल.

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कापूस लागवडीसाठी सरकारकडून मिळणार तब्बल ‘इतकी’ मदत; जाणून घ्या कोण करु शकतं अर्ज?

Web Title: Nabard and nsdc launch gramodayam rural entrepreneurship program see details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 07:34 PM

Topics:  

  • Business News
  • e-KYC
  • gram panchayat
  • Marathi News

संबंधित बातम्या

FIFA World Cup 2026: कन्फर्म सॅलरी तर फक्त ट्रेलर! जाहिराती, हॉटेल्स अन्…अब्जाधीश फुटबॉल स्टार्सच्या कमाईचा काय फॉर्म्युला?
1

FIFA World Cup 2026: कन्फर्म सॅलरी तर फक्त ट्रेलर! जाहिराती, हॉटेल्स अन्…अब्जाधीश फुटबॉल स्टार्सच्या कमाईचा काय फॉर्म्युला?

Tata Motors चा मोठा धमाका! ‘कौशल्य’ उपक्रमातून 23000 तरुणांना ट्रेनिंग; 5000 पेक्षा जास्त जणांना मिळाली रोजगाराची संधी
2

Tata Motors चा मोठा धमाका! ‘कौशल्य’ उपक्रमातून 23000 तरुणांना ट्रेनिंग; 5000 पेक्षा जास्त जणांना मिळाली रोजगाराची संधी

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कापूस लागवडीसाठी सरकारकडून मिळणार तब्बल ‘इतकी’ मदत; जाणून घ्या कोण करु शकतं अर्ज?
3

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कापूस लागवडीसाठी सरकारकडून मिळणार तब्बल ‘इतकी’ मदत; जाणून घ्या कोण करु शकतं अर्ज?

काय सांगताय? ATM मोठ्या संख्येने बंद होणार, मग कॅश कशी काढायची? बँकांचा ‘हा’ नवीन मास्टरप्लॅन, जाणून घ्या
4

काय सांगताय? ATM मोठ्या संख्येने बंद होणार, मग कॅश कशी काढायची? बँकांचा ‘हा’ नवीन मास्टरप्लॅन, जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.