
Pune Tribal Students Protest
पुणे : पुण्यातून मोठी बातमी समोर येत असून पुण्यातील मांजरी येथे मागील 17 दिवसांपासून सुरू असलेले आदिवासी विद्यार्थ्यांचे उपोषण अखेर मागे घेण्यात आले आहे. मागील 17 दिवसांपासून आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या या आंदोलनाची अखेर सांगता झाली असून मंत्री अशोक उईके यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यानी उपोषण मागे घेतले आहे. दीर्घकाळ सुरू असलेल्या उपोषणामुळे प्रशासन आणि सरकारचे या आंदोलनाकडे लक्ष वेधले गेले होते.
आदिवासी विद्यार्थ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी मांजरी येथे आमरण उपोषण सुरू केले होते. मागण्यांवर ठोस निर्णय घेण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत होती. आंदोलनाच्या काळात सरकारच्या प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांशी चर्चा केली होती. त्यानंतर आता विद्यार्थ्यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
मंत्री अशोक उईके यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी आपले उपोषण मागे घेतले. यावेळी विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत सरकारकडून सकारात्मक भूमिका घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे गेल्या 17 दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला अखेर तात्पुरता विराम मिळाला आहे.
मात्र, आंदोलन मागे घेत असतानाच विद्यार्थ्यांनी सरकारला स्पष्ट इशारा दिला आहे. आपल्या मागण्यांची पूर्तता झाली नाही तर पुन्हा उपोषणाचे हत्यार उपसण्यात येईल, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे.