थेरगावमध्ये रिंगरोड तर मोशीत आरक्षणांना तीव्र विरोध; आकुर्डीत DP आराखड्यावर सुनावणीचा धडाका
महापालिकेने १५ मे २०२५ रोजी प्रसिद्ध केलेल्या प्रारूप विकास आराखड्यावर नागरिकांकडून १४ जुलैपर्यंत हरकती व सूचना मागवल्या होत्या. त्यानुसार दाखल ५६ हजार ७७९ हरकर्तीवर आकुर्डी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात ३ ऑगस्टपासून सात सदस्यीय समितीमार्फत सुनावणी सुरू आहे. यामध्ये अनेक विषयांवर नागरिकांनी एकत्रित व मोठ्या प्रमाणावर हरकती नोंदवल्या आहेत.
‘राज ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत,’ अमित ठाकरेंचं गणरायाकडे साकडं, ‘मला माहितीये तो माणूस…’
थेरगाव भागातून जाणारा प्रस्तावित एचसीएमटीआर (रिंगरोड) आणि प्रशस्त रस्त्यांच्या आरक्षणाविरोधात नागरिकांनी तीव्र आक्षेप नोंदवले आहेत. या सुनावणीला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला असून सभागृह पूर्ण भरले होते. तसेच मोशी परिसरातील खासगी जागांवर टाकण्यात आलेल्या विविध आरक्षणांवरही मोठ्या संख्येने आक्षेप घेण्यात आले आहेत. समितीकडून प्रत्येक हरकतदाराचे म्हणणे सविस्तर ऐकून घेतले जात आहे.
सुनावणीची नोटीस मिळूनही गैरहजर राहिलेल्या नागरिकांना सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर पुन्हा एक संधी दिली जाणार आहे. सर्वात शेवटी शासकीय यंत्रणांनी घेतलेल्या हरकतींवर सुनावणी होईल. संपूर्ण प्रक्रिया १५ डिसेंबरपर्यंत पूर्ण करून अंतिम मान्यतेसाठी सुधारित आराखडा राज्य शासनाकडे सादर करण्यात येणार असल्याचे नगररचना विभागाने स्पष्ट केले.






