सौजन्य फोटो - AI Gemini
पिंपरी-चिंचवड शहरात फटाके फोडताना वेगवेगळ्या भागांत भीषण दुर्घटना घडल्या. अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध भागांत तब्बल २५ फ्लॅट आणि घरांना फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे आग लागली. याशिवाय मोकळी मैदाने, वाळलेले गवत आणि कचऱ्याच्या ठिकाणी आग लागण्याच्या २५ घटना घडल्या. तसेच फ्लेक्स, सोसायट्यांचे कंपाउंड आणि मोबाईल टॉवरला आग लागण्याच्या ५ घटनांची नोंद झाली. एकाच रात्री ५० ठिकाणी आगीचे कॉल आल्याने अग्निशमन दलाच्या गाड्यांची धावपळ उडाली. जवानांनी कौशल्याने आगीवर तातडीने नियंत्रण मिळवल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
फटाक्यांमुळे लागलेल्या आगीच्या घटनांमध्ये पुणे शहरातही २४ वेगवेगळ्या ठिकाणी आगी लागल्याची नोंद झाली आहे. दुसरीकडे गोंदिया जिल्ह्यातील सडक-अर्जुनी येथे फटाक्याची ठिणगी उडाल्याने एका चायनीज सेंटरला भीषण आग लागली, ज्यामध्ये दुकानातील साहित्य जळून खाक झाले व परिसरात खळबळ उडाली.
लक्ष्मीपूजनाच्या रात्री भिवंडी, बीड, रायगड, नाशिक आणि धुळे या जिल्ह्यांमध्येही आगीच्या अनेक दुर्घटना समोर आल्या आहेत. फटाक्यांच्या निष्काळजी वापरामुळे अनेक ठिकाणी दुकाने, घरे, गोदामे आणि गॅरेज आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या सर्व घटनांमध्ये दुकानदारांचे आणि नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून सुदैवाने अग्निशमन दलाच्या वेळेवरील कामगिरीमुळे जीवितहानी टळली आहे.
Ans: पिंपरी-चिंचवड शहरात फटाक्यांमुळे जवळपास २५ फ्लॅट आणि घरांना आग लागल्याची नोंद झाली.
Ans: पुणे शहरात लक्ष्मीपूजनाच्या रात्री आगीच्या २४ घटनांची नोंद झाली.
Ans: भिवंडी, बीड, नाशिक, रायगड, धुळे आणि गोंदिया (सडक-अर्जुनी) येथे आगीच्या दुर्घटना घडल्या.






