बीडकरांची प्रतीक्षा संपली! पुणे-बीड थेट रेल्वेचा आज शुभारंभ; ७ तासांत गाठता येणार पुणे
रेल्वे बोर्डाने बुधवारी या गाडीचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले. या सेवेमुळे पुणे ते बीडदरम्यानचा प्रवास सुमारे सात तासांत पूर्ण करता येणार आहे. दररोज रेल्वेसेवा उपलब्ध असल्याने बीडसह परिसरातील नागरिकांना पुण्याशी थेट रेल्वे जोडणी मिळणार आहे. Indian Railway
‘शिंदेंना शिवसेना आणि धनुष्यबाण देताना काय निकष होते?’ सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला सवाल
पुणे-बीड रेल्वेला १६ डबे असून, एकावेळी सुमारे दोन हजार प्रवाशांची वाहतूक करण्याची क्षमता असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे पुण्यात शिक्षण, नोकरी किंवा व्यवसायासाठी येणाऱ्या बीड व परिसरातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा हा रेल्वे मार्ग प्रवाशांसाठी महत्त्वाचा पर्याय ठरणार आहे.
पुणे-बीड रेल्वेला उरुळी, दौंड कॉर्ड लाईन, श्रीगोंदा रोड, अहिल्यानगर, नारायणडोहो, नवीन आष्टी आणि अमळनेर या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांनाही पुणे आणि बीडदरम्यानच्या थेट रेल्वेसेवेचा लाभ घेता येणार आहे.
पुणे ते बीड (गाडी क्र. ११४३३)
पुण्याहून रात्री १०.४५ वाजता सुटणार असून, दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता बीड येथे पोहोचेल.
बीड ते पुणे (गाडी क्र. ११४३४)
बीडहून रात्री ९.३० वाजता सुटणार असून, दुसऱ्या दिवशी पहाटे ५.२० वाजता पुणे येथे पोहोचेल.
Devendra Fadnavis : मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी फडणवीसांनी दिला शब्द! कृष्णाखोरे आणि
पुणे-बीड रेल्वेसेवा :
दररोज थेट रेल्वेचा पर्याय :
पुणे–बीड : गाडी क्र. ११४३३
पुण्याहून सुटणार : रात्री १०.४५
बीडला पोहोचणार : सकाळी ६.००
बीड–पुणे : गाडी क्र. ११४३४
बीडहून सुटणार : रात्री ९.३०
पुण्यात पोहोचणार : पहाटे ५.२०
महत्त्वाचे थांबे : उरुळी, दौंड कॉर्ड लाईन, श्रीगोंदा रोड, अहिल्यानगर, नारायणडोहो, नवीन आष्टी, अमळनेर.
१६ डबे | सुमारे २ हजार प्रवाशांची क्षमता | दररोज सेवा






