Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 7 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NCP Politics: रुग्णालयातील भेटीगाठींचा राजकीय सस्पेन्स! वेळ घेऊनही सुनेत्रा पवारांची भेट का टळली?

NCP Politics: शरद पवार रुग्णालयात असताना अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेलांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांच्यात तब्बल दीड तास चर्चा झाली. या चर्चेदरम्यान शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेलांना १० तारखेनंतर पुन्हा चर्चा करु, असं म्हटल्याचे वृत्त आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Nov 07, 2026 | 01:55 PM
Sharad Pawar, Sunetra Pawar, Praful Patel, Breach Candy Hospital, Maharashtra Politics

Sharad Pawar, Sunetra Pawar, Praful Patel, Breach Candy Hospital, Maharashtra Politics

Follow Us
Follow Us:
  • शरद पवारांना डिस्चार्ज
  • सुनेत्रा पवारांची भेट टळली
  • प्रफुल्ल पटेलांसोबत दीड तास खलबते
NCP Politics: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दोन दिवसांच्या उपचारांनंतर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातून परतल्यानंतर आता त्यांची प्रकृती स्थिर आहेत. मात्र, रुग्णालयात उपचार सुरू असताना झालेल्या राजकीय भेटीगाठी आणि काही नेत्यांच्या अनुपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. विशेषतः उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी तीन वेळा वेळ घेऊनही शरद पवार यांची भेट न घेतल्याची बाब चर्चेचा विषय ठरली आहे.

सुनेत्रा पवारांनी तीन वेळा वेळ घेतली, पण भेट टळली?

शरद पवार रुग्णालयात दाखल असताना अनेक राजकीय नेत्यांनी त्यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. मात्र, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी त्यांची भेट घेतली नसल्याची माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून शरद पवार यांच्या भेटीसाठी तीन वेळा वेळ मागण्यात आली होती. मात्र, अखेरपर्यंत ही भेट होऊ शकली नाही, असे बोलले जात आहे.

Farmer News : शेतकऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! सरकारकडून 2 मोठे निर्णय; तब्बल 2 लाख 60 हजार शेतकऱ्यांना होणार फायदा

सुनेत्रा पवार यांनी भेट न घेतल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. विशेष म्हणजे, शरद पवार यांचे नातू पार्थ पवार यांनीही रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र, पार्थ पवार आणि जय पवार यांनी फोनवरून आजोबांच्या प्रकृतीची विचारपूस केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

प्रफुल्ल पटेल यांच्याशी दीड तास चर्चा

शरद पवार रुग्णालयात असताना अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेलांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांच्यात तब्बल दीड तास चर्चा झाली. या चर्चेदरम्यान शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेलांना १० तारखेनंतर पुन्हा चर्चा करु, असं म्हटल्याचे वृत्त आहे. त्यामुळे या भेटीमागे नेमकी काय राजकीय चर्चा झाली, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

Raigad News: अनेक महिन्यांची प्रतीक्षा संपणार! उरणमधील खोपटा पुलाचे काम अंतिम टप्प्यात, दिवाळीत सु

पटेल यांच्याशिवाय जयंत पाटील, संजय राऊत, जितेंद्र आव्हाड, सुशीलकुमार शिंदे आणि उद्योगपती गौतम अदानी यांनीही रुग्णालयात जाऊन शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि उद्धव ठाकरे यांनी फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.

दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाच्या चर्चांना पुन्हा जोर

दरम्यान, अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलिनीकरणाबाबत केलेल्या विधानामुळे राजकीय चर्चांना पुन्हा सुरुवात झाली आहे. अजित पवार यांनी विलिनीकरणाच्या संदर्भात बैठका घेतल्या होत्या आणि त्याबाबत आपल्याला कल्पना दिली होती, असे तटकरे यांनी म्हटले होते.

तटकरे यांच्या या विधानानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आह. याच पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी शरद पवार यांची भेट न घेतल्याचेही बोलले जात आहे.

पुण्यातील उपचारांनंतर मुंबईत पुन्हा रुग्णालयात दाखल

दोन दिवसांच्या उपचारानंतर ते मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी परतले. पण सायंकाळी पुन्हा त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुन्हा मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज पुन्हा दोन दिवसांच्या उपचारांनंतर आता त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. दरम्यान, रुग्णालयातील भेटीगाठी आणि दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाबाबत सुरू झालेल्या चर्चांमुळे आगामी काळात राज्याच्या राजकारणात कोणत्या घडामोडी घडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: शरद पवार यांच्या रुग्णालयातील मुक्कामादरम्यान सुनेत्रा पवार यांच्या भेटीबाबत काय माहिती समोर आली आहे?

    Ans: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या कार्यालयाकडून तीन वेळा शरद पवार यांच्या भेटीसाठी वेळ मागण्यात आली होती, परंतु अखेरपर्यंत ही भेट होऊ शकली नाही.

  • Que: शरद पवार यांना रुग्णालयातून कधी डिस्चार्ज मिळाला आणि त्यांची प्रकृती कशी आहे?

    Ans: दोन दिवसांच्या उपचारांनंतर शरद पवार यांची प्रकृती स्थिर असल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून ते घरी परतले आहेत.

  • Que: रुग्णालयात शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्यात किती वेळ चर्चा झाली?

    Ans: अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी रुग्णालयात शरद पवार यांची भेट घेतली असून त्यांच्यात तब्बल दीड तास राजकीय विषयांवर सविस्तर चर्चा झाली.

Web Title: Sharad pawar hospital discharge sunetra pawar news as

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2026 | 01:55 PM

Topics:  

  • praful patel
  • Sharad Pawar
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

‘…तर मग आमचे पक्ष का फोडले?’; खासदार संजय राऊत यांचा सवाल
1

‘…तर मग आमचे पक्ष का फोडले?’; खासदार संजय राऊत यांचा सवाल

BDD Chawl Redevelopment : बीडीडी चाळ पुनर्विकासाला गती; घरांचा दर्जा आणि सुविधांशी तडजोड नाही – एकनाथ शिंदे
2

BDD Chawl Redevelopment : बीडीडी चाळ पुनर्विकासाला गती; घरांचा दर्जा आणि सुविधांशी तडजोड नाही – एकनाथ शिंदे

Sharad Pawar Health Update : शरद पवारांच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट! एकनाथ शिंदेंनी घेतली भेट, डिस्चार्जबाबत दिली मोठी माहिती
3

Sharad Pawar Health Update : शरद पवारांच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट! एकनाथ शिंदेंनी घेतली भेट, डिस्चार्जबाबत दिली मोठी माहिती

NCP Merger : अजितदादा असते तर राष्ट्रवादी एकत्र आली असती! सुनील तटकरेंचा मोठा गौप्यस्फोट, 12 फेब्रुवारीला काय घडणार होतं?
4

NCP Merger : अजितदादा असते तर राष्ट्रवादी एकत्र आली असती! सुनील तटकरेंचा मोठा गौप्यस्फोट, 12 फेब्रुवारीला काय घडणार होतं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.