Pune Hinjewadi Fire Accident Four people die of suffocation
पुणे : पुण्यामध्ये धक्कादायक घटना घडली आहे. शहरामध्ये धावत्या बसला अचानक आग लागली. यामध्ये प्रवाशांचा जळून मृत्यू झाला आहे. पिंपरी चिंचवडच्या हिंजवडी भागामध्ये सदर घटना घडली आहे. या घटनेमध्ये सहा जण गंभीर जखमी असून चार जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. याचे फोटो देखील समोर आले असून यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
पुण्यातील हिंजवडी फेज 1 च्या रस्त्यावर ही घटना घडली. होमा प्रिंटिंग प्रेस ची बस तमन्ना सर्कल वरून रेजवान च्या दिशेने जात होती. मात्र चालत्या बसला अचानक आग लागली. बसला समोरून आग लागल्याने चालकाने त्याचा जीव वाचवण्यासाठी उडी घेतली. यावेळी बसमध्ये 15 जण होते. सकाळी 8 वाजत्याच्या सुमारास ही आग लागली.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी- चिंचवडच्या हिंजवडी मध्ये होमा प्रिंटिंग प्रेस कंपनीच्या बसला आग लागली. बस ने समोरून अचानक पेट घेतला. चालकाला देखील आगीच्या झळा पोहोचल्याने आणि त्याच्या पायाला आग लागल्याने त्याने उडी घेतली. धावत्या बसचा वेग कमी झाला. पुढे काही अंतरावर जाऊन बस सिमेंटच्या ब्लॉकला धडकली. तोपर्यंत बसमधील इतर व्यक्तींनी खिडक्यातून उड्या मारल्या परंतु, पाठीमागे असलेल्या चार जणांना बाहेर पडता आलं नाही. आपत्कालीन दरवाजा उघडला गेला नाही. यात चारही जणांचा होरपळून जागीच मृत्यू झाला आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
या घटनेमध्ये सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. या सहा जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर चार जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. याचे हृद्यद्रावक फोटो देखील समोर आले आहेत. सदर घटनेमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.
बातमी अपडेट होत आहे.