Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 17 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चित्रा वाघ यांचा रोहित पवारांवर संताप; मुख्यमंत्री फडणवीसांवरील आरोपांवर दिलं सडेतोड उत्तर

Chitra Wagh on Rohit Pawar : रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर आमदार चित्रा वाघ यांनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. बिनबुडाचे आरोप केल्याचे म्हणत खडेबोल सुनावले आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 17, 2026 | 02:33 PM
Chita wagh on Rohit Pawar press confernce

Chita wagh on Rohit Pawar press confernce

Follow Us
Follow Us:
  • चित्रा वाघ यांचा रोहित पवारांवर घणाघात
  • रोहित पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
  • चित्रा वाघ यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर
Chitra Wagh on Rohit Pawar : आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले आहेत. यामुळे भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. यानंतर आता भाजप विधान परिषद आमदार चित्रा वाघ यांनी रोहित पवारांवर संताप व्यक्त केला असून डोकं ठिकाणावर आहे का? असा प्रश्न विचारत सडेतोड उत्तर दिले आहे.

चित्रा वाघ यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत रोहित पवार यांच्या आरोपांवर उत्तर दिले आहे. चित्रा वाघ म्हणाल्या, रोहित पवार, डोकं ठिकाणावर आहे का? पवार आडनाव बाजूला केलं तर तुमच्या स्वतःच्या कर्तृत्वावर तुमची ओळख काय आहे? जर आमच्या नेत्यांवर असे बिनबुडाचे आरोप केले तर खबरदार…घरातील राजकीय वर्चस्व सिद्ध करण्यासाठी मुख्यमंत्र्‍यांवर चिखलफेक करावी का?”

पुढे त्या म्हणाल्या,”विमानाचे पायलट आणि क्रू हे नेत्यांबरोबर फोटो काढतात, ही तर फार सामान्य गोष्ट आहे. स्वतः रोहित पवारांनी VSRच्या विमानातून प्रवास केल्याचे फोटो आणि व्हिडीओ आहेत. केवळ त्या आधारावर अजित पवारांचा अपघात रोहित पवारांनीच घडवून आणला, असं आम्ही म्हणू का? तुमच्या पक्षात तुम्हाला कोणी विचारत नाही, हे माहीत आहे आम्हाला. म्हणून मुख्यमंत्र्‍यांच्या एका फोटोवरून संशयाची राळ का उठवायची? तसेच संशय म्हणजे पुरावा नव्हे आणि सणसणाटी म्हणजे सत्य नसते.”

Rohit Pawar on Ajit Pawar Plane Crash Conspiracy: ‘तो’ मफलरवाला कोण? रोहित पवारांचा देवेंद्र फडणवीसांवर थेट निशाणा

पुढे त्या म्हणाल्या, “अजित पवारांच्या अपघाताचा निष्पक्ष तपास सुरू आहे आणि आम्हा सर्वांना त्या घटनेचे दुःख आहे. पण त्याचं राजकीय भांडवल नको आहे. एकीकडे विकासपुरूष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र प्रगतीकडे वाटचाल करतोय आणि दुसरीकडे त्यांच्यावर पुराव्यांशिवाय आरोप करणं हा राजकीय बेजबाबदारपणा आहे.”

रोहित पवार, आरोपांची उंची नव्हे, पुराव्यांची ताकद दाखवा! संशय म्हणजे सत्य नाही आणि राजकीय सनसनाटी म्हणजे पुरावा नाही! महाराष्ट्राला सत्य हवे, चिखलफेक नको! आरोपांना उत्तर तथ्यांनीच मिळेल — करारा जवाब मिलेगा ! #DevendraFadnavis #RohitPawar #Maharashtra #BJPMaharashtra https://t.co/t0gGcqzyaX — Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) November 16, 2026

Maharashtra Politics: शिंदे आणि ठाकरे पुन्हा एकत्र येणार? शिवसेना विलिनीकरणाच्या प्रस्तावाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

पुढे चित्रा वाघ यांनी रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले. त्या म्हणाल्या, “आडनाव हे वारशाने मिळतं, कर्तृत्वाने नाही. पुरावे असतील तर मांडा. नाहीतर आरोपांच्या आडून तुमचं सुरू असलेलं नीच राजकारण तात्काळ थांबवा. ही तुम्ही सूरू केलेली राजकीय चिखलफेक महाराष्ट्र कधीच विसरणार नाही. प्रत्येक आरोपाला तथ्यांच्या आणि लोकशाहीच्या चौकटीत करारा जबाब दिला जाईल. महायुतीवरील आमच्या सर्वोच्च नेतृत्वावरील आरोपांबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि त्यांचा पक्ष ठाम भूमिका मांडतील , याचा मला विश्वास आहे.”

💡

Frequently Asked Questions

  • Que: रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या अपघाताबाबत काय संशय व्यक्त केला?

    Ans: रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघातामागे घातपात असण्याचा संशय व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही आरोप केले.

  • Que: चित्रा वाघ यांनी रोहित पवारांना काय उत्तर दिले?

    Ans: चित्रा वाघ यांनी रोहित पवारांवर संताप व्यक्त करत, “डोकं ठिकाणावर आहे का?” असा सवाल केला. पुरावे नसताना मुख्यमंत्र्यांवर आरोप करणे हा राजकीय बेजबाबदारपणा असल्याचे त्यांनी म्हटले.

  • Que: चित्रा वाघ यांनी अजित पवार विमान अपघाताच्या तपासाबाबत काय म्हटले?

    Ans: अजित पवारांच्या विमान अपघाताचा निष्पक्ष तपास सुरू असून, घटनेचे राजकीय भांडवल करू नये, असे चित्रा वाघ यांनी म्हटले.

Web Title: Chitra wagh on rohit pawar press confernce ajit pawar plane crash cm devendra fadnavis nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2026 | 02:10 PM

Topics:  

  • ajit pawar plane crash
  • chitra wagh
  • CM Devendra Fadanvis
  • MLA Rohit Pawar

संबंधित बातम्या

Rohit Pawar : पुणे रिंग रोडला अजित पवारांचे नाव द्या; रोहित पवारांची मागणी
1

Rohit Pawar : पुणे रिंग रोडला अजित पवारांचे नाव द्या; रोहित पवारांची मागणी

Bharat Gogawale : अजितदादांच्या विमान अपघातावर रामदास कदमांचा संशय, भरत गोगवलेंच्या विधानाने राजकारणात रंगल्या चर्चा
2

Bharat Gogawale : अजितदादांच्या विमान अपघातावर रामदास कदमांचा संशय, भरत गोगवलेंच्या विधानाने राजकारणात रंगल्या चर्चा

Ajit Pawar Plane Crash : ‘अजित पवारांचा घातपात झाल्याचं मला वाटतं, एक दिवस बोलणार’; उमेश पाटलांचं मोठं वक्तव्य
3

Ajit Pawar Plane Crash : ‘अजित पवारांचा घातपात झाल्याचं मला वाटतं, एक दिवस बोलणार’; उमेश पाटलांचं मोठं वक्तव्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.