पुणे रेल्वेस्थानकाची सुरक्षा कडक; पाच लगेज स्कॅनर, प्रवाशांच्या तपासणीसाठी 19 मेटल डिटेक्टर (File Photo)
स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारासह छत्री गेट आणि ताडीवाला रोडच्या बाजूने प्रवाशांच्या येण्या-जाण्यासाठी स्वतंत्र मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. त्यामुळे गर्दीच्या वेळी होणारी कोंडी टाळण्यास आणि प्रवाशांची वाहतूक अधिक शिस्तबद्ध करण्यास मदत होणार आहे. छत्री गेट येथे फलाट क्रमांक एक ते सहावर जाणाऱ्या प्रवाशांसाठी स्वतंत्र प्रवेशमार्ग तयार करण्यात आला आहे. तसेच, स्थानकातून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांसाठी स्वतंत्र निर्गमन मार्गाची व्यवस्था केली आहे.
अनधिकृत प्रवेशमार्ग बंद
स्थानकातील सुरक्षा व्यवस्था प्रभावी करण्यासाठी सर्व अनधिकृत प्रवेशमार्ग बंद करण्यात आले आहेत. निर्धारित प्रवेशद्वारांमधूनच स्थानकात प्रवेश करणे आणि निश्चित केलेल्या मार्गानेच बाहेर पडणे बंधनकारक करण्यात आले आहे. सुरक्षा तपासणीच्या वेळी रेल्वे अधिकारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
सामानाचीही तपासणी
स्थानकात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांच्या सामानाची तपासणी करण्यासाठी पाच लगेज स्कॅनरची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय, प्रवाशांची तपासणी करण्यासाठी १९ डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर बसविण्यात आले आहेत. या उपाययोजनांमुळे संशयास्पद वस्तूंची तपासणी करणे आणि सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी घेणे अधिक सोयीचे होणार आहे. प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाने निश्चित केलेल्या प्रवेश आणि निर्गमन मार्गांचा वापर करून सुरक्षा तपासणीस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सुरक्षा व्यवस्थेचा तपशील
५ – लगेज स्कॅनर
१९ – डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर
३ ठिकाणे – मुख्य प्रवेशद्वार, छत्री गेट आणि ताडीवाला रोड
अनधिकृत प्रवेशमार्ग – सर्व बंद
फलाट – क्रमांक १ ते ६ साठी छत्री गेटवर स्वतंत्र प्रवेशमार्ग
1. पुणे रेल्वेस्थानकावरील सुरक्षा व्यवस्था का कडक करण्यात आली आहे?
वाढती प्रवासी गर्दी लक्षात घेऊन प्रवाशांची सुरक्षा आणि ये-जा अधिक शिस्तबद्ध करण्यासाठी सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यात आली आहे.
2. पुणे रेल्वेस्थानकावर किती लगेज स्कॅनर बसविण्यात आले आहेत?
सामानाच्या तपासणीसाठी पाच लगेज स्कॅनर बसविण्यात आले आहेत.
3. प्रवाशांच्या तपासणीसाठी किती मेटल डिटेक्टर आहेत?
प्रवाशांच्या सुरक्षा तपासणीसाठी १९ डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर बसविण्यात आले आहेत.






