Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे रेल्वे स्थानकाचा आता विस्तार होणार; अनेक आवश्यक सोयी-सुविधाही लवकरच मिळणार

प्लॅटफॉर्म क्रमांक ९ व १० साठी १८ कोटी ३८ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या कामामध्ये ७५० मीटर लांबीचा व १२ मीटर रुंदीचा प्लॅटफॉर्म उभारण्याबरोबरच ४०० मीटर सीओपी, दोन स्वच्छतागृह ब्लॉक आणि १० पाणी स्टँड उभारले जाणार

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 10, 2026 | 11:37 AM
पुणे रेल्वे स्थानकाचा विस्तार होणार; अनेक आवश्यक सोयी-सुविधाही मिळणार

पुणे रेल्वे स्थानकाचा विस्तार होणार; अनेक आवश्यक सोयी-सुविधाही मिळणार

Follow Us
Follow Us:

पुणे / चंद्रकांत कांबळे : वाढत्या प्रवासी गर्दीचा विचार करून पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी नवीन सहा प्लॅटफॉर्म बनवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला होता. आता या कामाला गती येताना दिसत आहे. पीएच-५३ अंतर्गत एकूण ४४ कोटी ९ लाख रुपयांच्या विविध कामांना मंजुरी देण्यात आली. यामुळे पुणे स्टेशनवर नव्या आयलंड प्लॅटफॉर्मसह आवश्यक सोयी-सुविधा उभारणीच्या कामाला गती येताना दिसून येत आहे.

या योजनेत प्लॅटफॉर्म क्रमांक ७ व ८ साठी १० कोटी ३९ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या अंतर्गत ६५० मीटर लांबीचा व १० मीटर रुंदीचा आयलंड प्लॅटफॉर्म उभारण्यात येणार आहे. यामुळे या भागातील गाड्यांची हाताळणी अधिक सुलभ होणार आहे. तसेच प्लॅटफॉर्म क्रमांक ९ व १० साठी १८ कोटी ३८ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या कामामध्ये ७५० मीटर लांबीचा व १२ मीटर रुंदीचा प्लॅटफॉर्म उभारण्याबरोबरच ४०० मीटर सीओपी, दोन स्वच्छतागृह ब्लॉक आणि १० पाणी स्टँड उभारले जाणार आहेत. या सुविधांमुळे प्रवाशांना अधिक आरामदायी सेवा मिळणार आहे.

Pune Railway Station Security Alert: बापरे…!पुणे रेल्वे स्थानकांवर छुप्या कॅमेऱ्यांतून हेरगिरी? पुणे विभागात हाय अलर्ट

याशिवाय प्लॅटफॉर्म क्रमांक ११ व १२ साठी १५ कोटी ३२ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या अंतर्गत ६०० मीटर लांबीचा व १३ मीटर रुंदीचा प्लॅटफॉर्म,४०० मीटर सीओपी,दोन स्वच्छतागृह ब्लॉक आणि १० पाणी स्टँड उभारले जाणार आहेत.

कोणत्या प्लॅटफॉर्मसाठी किती पैसे मंजूर?

– प्लॅटफॉर्म क्र. ७ आणि ८ साठी – १० कोटी ३९ लाख रूपये मंजूर

– प्लॅटफॉर्म क्र. ९ आणि १० साठी १८ कोटी ३८ लाख रूपये मंजूर

– प्लॅटफॉर्म क्र. ११ आणि १२ साठी १५ कोटी ३२ लाख रूपये मंजूर

पुणे रेल्वे स्थानकाची एकूण क्षमता वाढणार

या नवीन सहा प्लॅटफॉर्मच्या कामांमुळे पुणे रेल्वे स्थानकाची एकूण क्षमता वाढणार असून, प्रवाशांची वाढती गर्दी हाताळणे अधिक सोपे होणार आहे. तसेच आधुनिक सुविधा उपलब्ध झाल्याने प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित व सोयीस्कर होणार आहे.

  • हेमंत कुमार बेहरा, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे पुणे

Web Title: Pune railway station is now set to be expanded

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2026 | 11:35 AM

Topics:  

  • pune news
  • Pune Railway Station News

संबंधित बातम्या

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा
1

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’
2

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
3

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

देशसेवेचा अभिमान, आधुनिक कौशल्यांची जोड! NCC कॅडेट्सना आता ड्रोन प्रशिक्षणासह सायबर सुरक्षेचे धडे
4

देशसेवेचा अभिमान, आधुनिक कौशल्यांची जोड! NCC कॅडेट्सना आता ड्रोन प्रशिक्षणासह सायबर सुरक्षेचे धडे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.