Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे राजापूर बसचा चालक मद्यपान करुन गाडी चालवत असल्याच्या तक्रारीने खळबळ

राजापूरकडे येणारे प्रवाशी साताऱ्यात अडकले, राजापूर डेपोच्या प्रशासनानेही हात झटकले, प्रवाश्यांनी व्यक्त केला संताप

  • By शुभांगी मेरे
Updated On: Mar 17, 2024 | 11:20 AM
पुणे राजापूर बसचा चालक मद्यपान करुन गाडी चालवत असल्याच्या तक्रारीने खळबळ
Follow Us
Close
Follow Us:

शनिवारी सकाळी पुणे स्थानकावरुन राजापूरसाठी निघालेल्या एसटीचा चालक मद्यपान करुन गाडी चालवत असल्याची तक्रार प्रवाशानी सातारा बस स्थानकात नोंदवली. पुणे राजापूर बस सातारा स्थानकातच उभी करुन ठेवल्याने राजापूरकडे येणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले आहेत. दरम्यान सातारा बस स्थानकाच्या प्रशासनाने पुढील प्रवासासाठी हात झटकल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सेवेसाठी असे ब्रीद मिरवणाऱ्या एस टी महामंडळाच्या सेवेची लक्तरे वेशीवर आली आहेत.

राजापूर बस डेपोची असणारी ही बस शनिवारी सकाळी ९ वाजता पुणे स्थानकातून राजापूरकडे निघाली. मात्र या बसचा चालक मद्यपानाच्या नशेत असल्याचे प्रवाशांच्या लक्षात आल्याने प्रवाशांनी सदर बस सातारा स्थानकात थांबवुन त्याबाबत तक्रार केली. मात्र सातारा स्थानकाच्या प्रशासनाने याबाबत हात वर केल्याने काही महिला प्रवाशांना अक्षरश: रडु कोसळले. त्यानंतर राजापूरकडे येणाऱ्या एका महिला प्रवाशाने आपल्या राजापूर येथील नातेवाईकांना याबाबत माहिती दिल्याने त्यानी राजापूर बस डेपोशी संपर्क साधला. मात्र राजापूर बस डेपोच्या प्रशासनानेही उडवाउडवीची उत्तरे दिल्याची माहिती राजापूर गुरव वाडी येथील नागरिक सचिन गुरव यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.

काही दिवसांपुर्वी संगमेश्वर बस डेपोचा चालक अशाच प्रकारे मद्यपान करुन गाडीत चालवत असल्याचे समोर आले होते. त्यानंतर त्याच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला असला. तरी आठवडाभरात रत्नागिरी जिल्ह्यात घडलेली ही दुसरी घटना आहे. त्यामुळे आता कोणत्या विश्वासार्हतेवर एस टी महामंडळाच्या बसने प्रवास करावा? आता महामंडळाला प्रवाशांच्या जीवाचे काहीच सोयर सुतक नाही का? असे प्रश्न प्रवाशांमधून उपस्थित करण्यात येत आहेत. राजापूर डेपोच्या प्रशासनानेही याबाबत हात झटकल्याने राजापूरला येणाऱ्या प्रवाशांचा प्रवास बिनभरोशी राहीला आहे.

Web Title: Pune rajapur bus drivers complaint that he was driving under the influence caused a sensation maharashtra government pune rajapur ratnagiri

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2024 | 11:20 AM

Topics:  

  • maharashtra
  • Maharashtra Government
  • Pune
  • Rajapur News Update
  • Ratnagiri News Update

संबंधित बातम्या

खुशखबर! Pune–Chhatrapati Sambhajinagar प्रवास होणार सुसाट; राज्य सरकारचा ‘हा’ प्रकल्प ठरणार गेमचेंजर
1

खुशखबर! Pune–Chhatrapati Sambhajinagar प्रवास होणार सुसाट; राज्य सरकारचा ‘हा’ प्रकल्प ठरणार गेमचेंजर

Navarashtra Special: लढाई शस्त्रांचीच नाही, पर्यावरण वाचविण्याचीही!
2

Navarashtra Special: लढाई शस्त्रांचीच नाही, पर्यावरण वाचविण्याचीही!

Maharashtra Politics: “शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी न दिल्यास…”;  राजू शेट्टींचा सरकारला निर्वाणीचा इशारा
3

Maharashtra Politics: “शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी न दिल्यास…”; राजू शेट्टींचा सरकारला निर्वाणीचा इशारा

Local Body Election: ‘या’ पालिकेचा नगराध्यक्ष महिला ठरवणार; अंतिम मतदार यादी प्रसिद्ध
4

Local Body Election: ‘या’ पालिकेचा नगराध्यक्ष महिला ठरवणार; अंतिम मतदार यादी प्रसिद्ध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.