
Pune RTO, Vehicle Registration, Pune News, Auto News,Pune MH 12 RTO News, MH 12 ZZ Series Ending,
याबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. भविष्यात पुण्यासाठी ‘MH-60’ ही नवी मालिका लागू होण्याची शक्यता आहे. मात्र, पुण्याची जुनी ओळख असलेली ‘MH-12’ मालिका कायम ठेवण्यासाठी ‘A-1’ किंवा ‘1-A’ अशा पर्यायी मालिकेचा विचार सुरू असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा सुरू असून, या पर्यायाला मंजुरी मिळण्याची शक्यता असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.
दरम्यान, सध्या दुचाकींसाठी ‘ZY’, तर चारचाकी वाहनांसाठी ‘ZW’ ही मालिका सुरू आहे. ‘ZZ’ मालिका संपल्यानंतर दोन इंग्रजी अक्षरांवर आधारित सध्याची पद्धत पुढे सुरू ठेवता येणार नाही. दुचाकींची सध्याची मालिका काही दिवसांत, तर चारचाकींची मालिका सुमारे दोन महिन्यांत संपणार असल्याने आता पुणे आरटीओला वाहन क्रमांकासाठी नवीन पद्धत निश्चित करावी लागणार आहे.
पहिला पर्याय – तीन अक्षरांची मालिका
यात पहिला पर्याय हा नंबरप्लेटचा क्रमांक MH-12-AAA 1234 अशा स्वरूपाचा असू शकतो. मात्र, या पद्धतीमुळे नंबरप्लेटवरील अक्षरे आणि अंकांची एकूण लांबी वाढेल.
दुसरा पर्याय – अल्फान्यूमेरिक नंबर
दुसऱ्या पर्यायात आरटीओने अक्षरे आणि अंक यांच्या मिश्रणाची अल्फान्यूमेरिक मालिका सुचवली आहे. याबाबतचा प्रस्ताव राज्याच्या परिवहन विभागाकडे पाठवण्यात आला आहे.
वरील पर्यायांचा तांत्रिक आणि प्रशासकीय पातळीवर विचार झाल्यास लवकरच पुण्याच्या वाहन क्रमांक मालिकेत लवकरच मोठा दिसू शकतात.
पुण्याची ओळख जपण्याचे प्रयत्न, MH-61 ला विरोध
‘ZZ’ अंक संपल्याच्या बातमीनंतर, पुण्याला ‘MH-61’ हा नवीन आरटीओ कोड दिला जाऊ शकतो, अशी चर्चा सुरू होती. मात्र, पुणेकर आणि लोकप्रतिनिधींनी याला विरोध केला. कारण ‘MH-12’ ही केवळ एक नंबर प्लेट नसून, पुणेकरांच्या सांस्कृतिक ओळखीशी संबंधित बाब आहे.
विषयाचे गांभीर्य लक्षात घेता, पुणे खासदार आणि केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री, मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री, नितीन गडकरी यांची थेट भेट घेतली. त्यांनी पुण्यातील वाहनांसाठी ‘MH-12’ हा कोड कायम ठेवण्याची मागणी केली, जी गडकरींनी मान्य केली.