Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Water Supply: पुण्याला सम आणि विषम तारखांनुसार होणार पाणीपुरवठा; नवे वेळापत्रक जाहीर

ससे गाव परिसरातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी सम आणि विषम दोन्ही तारखांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. तसेच वारजे माळवाडी, कर्वेनगर पाट, रामनगर, शिवणे, उत्तमनगर आणि लगतच्या परिसरांमध्ये पाणीपुरवठ्याच्या वेळा पूर्ववत राहतील. मात्र या भागांनाही आता एक दिवसाआडच पाणी मिळणार आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 15, 2026 | 11:31 AM
पुणे विभागातील धरणांमध्ये केवळ 14 टक्के पाणीसाठा

पुणे विभागातील धरणांमध्ये केवळ 14 टक्के पाणीसाठा

Follow Us
Follow Us:
  • शहरात आजपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय
  • शहरातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर सम आणि विषम तारखांनुसार पाणीपुरवठा केला जाणार
  • नागरिकांना पाण्याची नासाडी टाळण्याचे, पिण्याच्या पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आणि आवश्यक तेवढेच पाणी वापरण्याचे आवाहन
 

Pune Water Supply News:  जून महिन्याचे १५ दिवस झाले असतानाही राज्यातील अनेक भागांमध्ये अजूनही पावसाची प्रतिक्षा सुरू आहे. काही भागांमध्ये मान्सूनपुर्व पावसाने हजेरी लावली असली तरी बहुतांश भागात अद्यापही पावसाचे नामोनिशान नाही. पुण्यातही काहीशी अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहेत. खडकवासला धरण साखळीतील पाणीसाठा वेगाने कमी होत असल्याने पुणे महापालिकेने शहरात आजपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. धरणांमध्ये सध्या केवळ पाच टीएमसी पाणी शिल्लक आहे. त्यामुळे महापालिकेने हा निर्णय घेण्यात आला असून नागरिकांनी पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करावा, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.

पुणे महानगरपालिकेने शहरातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर सम आणि विषम तारखांनुसार पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यामुसार महापालिकेकडून नवे वेळापत्रकही लागू केले आहे. सम आणि विषम तारखांनुसार आजपासून शहरात दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर नियोजनबद्ध पद्धतीने करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महापालिकेच्या नव्या नियोजनानुसार, सम तारखेला काही विशिष्ट भागांना पाणीपुरवठा केला जाईल, तर विषम तारखेला इतर भागांना पाणीपुरवठा केला जाणार आहे. आपटे रोड, भांडारकर रोड, प्रभात रोड, शिवाजीनगर, एरंडवणे, बोपोडी, बाणेर, औंध, बालेवाडी, खडकी, वारजे, कर्वेनगर, शिवणे, उत्तमनगर यांसह अनेक भागांवर या निर्णयाचा परिणाम होणार आहे. काही परिसरांसाठी पाणीपुरवठ्याच्या वेळाही निश्चित करण्यात आल्या असून नागरिकांनी त्यानुसार पाण्याचे नियोजन करायचे आहे.

ससे गावात टँकरने पाणीपुरवठा

ससे गाव परिसरातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी सम आणि विषम दोन्ही तारखांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. तसेच वारजे माळवाडी, कर्वेनगर पाट, रामनगर, शिवणे, उत्तमनगर आणि लगतच्या परिसरांमध्ये पाणीपुरवठ्याच्या वेळा पूर्ववत राहतील. मात्र या भागांनाही आता एक दिवसाआडच पाणी मिळणार आहे.

महापालिकेने नागरिकांना पाण्याची नासाडी टाळण्याचे, पिण्याच्या पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आणि आवश्यक तेवढेच पाणी वापरण्याचे आवाहन केले आहे.

पुण्यात पाणी कपात; ‘सम’ आणि ‘विषम’ तारखेनुसार पाणीपुरवठा

सम तारखेला पाणीपुरवठा होणारे भाग

आपटे रस्ता, भांडारकर रस्ता, प्रभात रस्ता, विधी महाविद्यालय रस्ता, पुलाची वाडी, शिवाजीनगर गावठाण, डेक्कन जिमखाना परिसर, मनपा भवन, अमर सोसायटी, कांचन गल्ली, भोंडे कॉलनी, खिलारेवाडी, भालेकर चाळ, रजपूत वीटभट्टी, एरंडवणे गावठाण, बोपोडी, चिखलवाडी, एनसीएल परिसर, अभिमानश्री सोसायटी, चव्हाणनगर, बाणेर रस्ता (उजवी बाजू), माऊली पेट्रोल पंपापर्यंतचा परिसर, औंध गाव, प्रिझम सोसायटी, इंदिरा वसाहत, कस्तुरबा वसाहत, भोसले नगर, अशोकनगर, रेंज हिल, खैरेवाडी, संपूर्ण बालेवाडी व गावठाण, मोहननगर, दत्तवाडी, मंगळवार पेठ, नाना पेठ, भवानी पेठ, पुणे स्टेशन परिसर, सोमवार पेठ पोलीस वसाहत, ससून रुग्णालय, बी.टी. कवडे रस्ता (दोन्ही बाजू), भीमनगर, घोरपडीचा काही भाग, भारत फोर्जलगतचा परिसर, जांभूळकर मळा, सेंट पॅट्रिक टाउन, शेवकरवस्ती, होलेमळा, लक्ष्मीनगर तसेच घोरपडीतील तारादत्त कॉलनी, डोबरवाडी, ज्ञानेश्वर पार्क, निगडेनगर आणि ढोलेवस्ती.

विषम तारखेला पाणीपुरवठा होणारे भाग

एरंडवणा, बावधन खुर्द, बावधन बुद्रूक, संतोषनगर, दत्तनगर, आंबेगाव खुर्द, सिद्धार्थनगर, चैत्रबन-पद्मावती परिसर, तळजाई वसाहत, चव्हाणनगर, संभाजीनगर, शंकर महाराज वसाहत, पापळ वस्ती, गणपतनगर, अप्पर पंपिंग स्टेशन मागील परिसर, बी-३७ मागील भाग, प्रसन्न सोसायटी, धर्मवीर पार्क, चिंतामणीनगर (भाग १, २ आणि ३), बकुळनगर, शिवतेजनगर, खडकेवस्ती, सद्गुरुनगर, ओंकारनगर, शक्ती बंगला, गायकवाड वस्ती, नॉर्थ मेन रोड परिसर, भाग्योदयनगर, शिवनेरी नगर आणि साईबाबा नगर.

महापालिकेने नागरिकांना पाणी साठवून ठेवण्याबरोबरच अनावश्यक पाण्याचा वापर टाळण्याचे आवाहन केले आहे. पाणीपुरवठ्याच्या वेळा आणि इतर बदलांबाबत संबंधित क्षेत्रीय कार्यालयांकडून माहिती घेण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

 

 

Web Title: Pune water supply even odd dates timetable active for pune water supply

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2026 | 11:31 AM

Topics:  

  • pune news
  • Pune water supply
  • Water Crisis

संबंधित बातम्या

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल
1

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन
2

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा
3

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; ‘हे’ महत्त्वाचे रस्ते राहणार बंद
4

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; ‘हे’ महत्त्वाचे रस्ते राहणार बंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.