Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Water Supply: शहरी विकास निधीतून पुण्याला 1,290 कोटींची मंजुरी

Pune Water Supply: पुणे शहरात पावसाळ्यात उद्भवणाऱ्या पाणी साचणे आणि पूरस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 400 कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे.

  • By anuradha sagar
Updated On: May 12, 2026 | 05:04 PM
Pune News, Water Supply, Flood Control, Central Government

Pune News, Water Supply, Flood Control, Central Government

Follow Us
Follow Us:
  • २०० एमएलडी (MLD) क्षमतेचा नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प
  • शहरातील ३३५ पूरग्रस्त ठिकाणांवर (Chronic Flooding Spots) उपाययोजना
  • पावसाळी जलनिस्सारण व्यवस्था सक्षम केल्यामुळे नागरिकांचे हाल थांबतील आणि मालमत्तेचे नुकसान टळणार
Pune Water Supply: केंद्र सरकारच्या शहरी विकास निधी योजनेअंतर्गत पुणे शहराला मोठा दिलासा मिळाला आहे. पुणे महापालिकेच्या दोन महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी एकूण 1,290 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ‘अर्बन चॅलेंज फंड’ अंतर्गत केंद्रीय गृह आणि नागरी कल्याण मंत्रालयाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय समितीच्या पहिल्या बैठकीत या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.

मंजूर निधीमध्ये 12 जीबीएस बाधित गावांसाठी 890 कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना आणि पुणे शहरातील पूरनियंत्रण तसेच पावसाळी जलनिस्सारण व्यवस्था मजबूत करण्यासाठी 400 कोटी रुपयांच्या प्रकल्पाचा समावेश आहे. या दोन्ही योजनांमुळे शहरातील मूलभूत नागरी सुविधांना बळकटी मिळणार असून नागरिकांना अधिक चांगल्या सेवा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

पुणे-दौंड डेमोच्या चाकांना अचानक आग, प्रवाशांमध्ये घबराट; पाटस रेल्वे स्थानकात काय घडलं?

पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जीबीएस बाधित 12 गावांमध्ये आधुनिक जलव्यवस्था उभारण्यात येणार आहे. यासाठी 200 एमएलडी क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प उभारला जाणार आहे. तसेच 71 किलोमीटर लांबीची मुख्य पाइपलाइन, 390 किलोमीटर वितरण नेटवर्क आणि आधुनिक स्मार्ट मीटरिंग प्रणाली विकसित केली जाणार आहे.

या योजनेद्वारे 2052 पर्यंत सुमारे 7.78 लाख नागरिकांना शुद्ध आणि नियमित पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. अनेक वर्षांपासून पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या गावांना या प्रकल्पामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

पायाभूत प्रकल्पांना गती

पुणे शहरात पावसाळ्यात उद्भवणाऱ्या पाणी साचणे आणि पूरस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 400 कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे. या निधीतून शहरातील 335 पूरग्रस्त ठिकाणी जलनिस्सारण व्यवस्था सक्षम केली जाणार असून पूरनियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. त्यामुळे पावसाळ्यातील जलभरावाची समस्या कमी होण्यास मदत होईल. महापालिका प्रशासनाच्या मते, शहरात नागरी सुविधांचे शंभर टक्के उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विविध विकासकामांना प्राधान्य दिले जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे शहराच्या विकासावर विशेष लक्ष दिल्याने विविध पायाभूत प्रकल्पांना गती मिळत आहे.

Pune Ring Road Project: १४,२०० कोटींचा मेगा प्रोजेक्ट

लवकरच कामांना सुरूवात

या प्रकल्पांसाठी महापालिका आयुक्त नवल किशोर राम आणि अतिरिक्त आयुक्त पवनित कौर यांनी सातत्याने पाठपुरावा केला. प्रशासनाच्या मते, पुण्याला अधिक सक्षम, शाश्वत आणि भविष्योन्मुख शहर बनविण्याच्या दिशेने ही मंजुरी महत्त्वपूर्ण पाऊल मानली जात आहे. लवकरच या दोन्ही प्रकल्पांच्या प्रत्यक्ष कामांना सुरुवात होण्याची शक्यता आहे.

 

Web Title: Pune water supply pune gets 1290 crore boost from central govt for water supply

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2026 | 05:04 PM

Topics:  

  • pune news
  • Water supply

संबंधित बातम्या

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल
1

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन
2

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा
3

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; ‘हे’ महत्त्वाचे रस्ते राहणार बंद
4

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; ‘हे’ महत्त्वाचे रस्ते राहणार बंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.