Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Water Supply: पुणे शहरावर पाणीटंचाईचे सावट? खडकवासला प्रकल्पातील नियोजनात मोठा बदल

पुणे शहरात नोकरी निमित्ताने किवा शिक्षण या साठी मोठ्या प्रमाणावर जिल्ह्याबाहेरून, राज्याबाहेरुन लोकसंख्या आलेली आहे. धरणाची साठवणूक क्षमता तेवढीच आहे पाण्याच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 27, 2026 | 01:52 PM
Pune Water Supply 2026, Khadakwasla Dam Level, Pune Irrigation Department, Monsoon Forecast 2026,

Pune Water Supply 2026, Khadakwasla Dam Level, Pune Irrigation Department, Monsoon Forecast 2026,

Follow Us
Close
Follow Us:
  • हवामान खात्याने अल निनो आणि आयओडीच्या प्रभावामुळे यंदा मान्सून कमी राहण्याचा अंदाज
  • जिल्ह्यातील चार प्रमुख धरणांमधील पाण्याचे नियोजन करण्याचे प्रशासनाचे आदेश
  • पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देत धरणातील साठा अधिक काळ टिकवून ठेवण्याचा निर्णय
Pune Water Update: हवामान खात्याने अल निनो आणि आयओडीच्या प्रभावामुळे यंदा मान्सून कमी राहण्याचा अंदाज व्यक्त केल्याने राज्य शासनाने पिण्याच्या पाण्याच्या काटेकोर नियोजनाचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्यातील जलसंपदा व पाटबंधारे विभागाने अंमलबजावणी सुरू केली असून, यंदा प्रथमच धरणातील पाणीसाठा जूनऐवजी थेट ३१ ऑगस्टपर्यंत राखीव ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार प्रमुख धरणांमधील पाण्याचे नियोजन अधिक काटेकोरपणे केले जात आहे. वाढती लोकसंख्या, तसेच स्थलांतरित नागरिकांची वाढती संख्या लक्षात घेता शहरातील पिण्याच्या पाण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे उपलब्ध साठ्याचा योग्य वापर आणि दीर्घकालीन नियोजन आवश्यक बनले आहे.

Railway News : पुणे रेल्वे विभागाचा अनधिकृत विक्रेत्यांना दणका; सात हजारांहून अधिक प्रकरणे नोंद

पाटबंधारे विभागाचे अधिकारी फाळके यांनी दिलेल्या माहितीनुसार, धरणातील पाण्याचे वाटप करताना ठराविक प्राधान्यक्रम पाळला जात आहे. यामध्ये सर्वप्रथम पिण्याच्या पाण्याला प्राधान्य दिले जात असून, त्यानंतर औद्योगिक वापर, शेतीसाठी पाणी आणि नदीचा प्रवाह कायम ठेवण्यासाठी आवश्यक तेवढे पाणी सोडले जाते. यामुळे मर्यादित साठ्याचा योग्य वापर होऊन संभाव्य टंचाई टाळण्याचा प्रयत्न आहे.

पुणे जिल्ह्यातील प्रमुख धरणांवरील अवलंबित्व लक्षात घेता, पावसाचे प्रमाण घटल्यास धरणसाठ्यावर थेट परिणाम होऊ शकतो आणि पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देत धरणातील साठा अधिक काळ टिकवून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांनीही पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

स्थलांतरित लोकसंख्येमुळे पाण्याची मागणी वाढली

पुणे शहरात नोकरी निमित्ताने किवा शिक्षण या साठी मोठ्या प्रमाणावर जिल्ह्याबाहेरून, राज्याबाहेरुन लोकसंख्या आलेली आहे. धरणाची साठवणूक क्षमता तेवढीच आहे पाण्याच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे.

८ घरणातील पाणी 31 ऑगस्ट पर्यंत पुरेल अशा अनुषंगाने अंमलबजावणी सुरू केली आहे. या बाबत कॅबिनेट मंत्र्यांनी सूचना केल्याप्रमाणे काम करत आहोत.
फाळके, अभियंता, पाटबंधारे विभाग पुणे

पुणे महापालिकेचा 15669 कोटींचा अर्थसंकल्प मंजूर; 12 तासांची जोरदार चर्चा

पिक पद्धतीत बदल अपेक्षित

हवामानातील बदलांमुळे या वर्षी पाऊस कमी पडण्याची शकता वर्तवण्यात आली असल्यामुळे धरणात पाण्याची किती उपलब्धता राहील याबाबत शंका वर्तवण्यात आली आहे त्यामुळे जास्त पाण्याची आवश्यकता असणारी ऊसा सारखी पिके न घेता पीक पद्धतीत बदल करून कमी पाण्यावर येणारी पिके घेण्याचा सल्ला तज्ञांकडून देण्यात आला आहे.

 

Web Title: Pune water update dam reserves extended to august 31 amid el nio concerns

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2026 | 01:52 PM

Topics:  

  • Khadakwasla Dam
  • Pune water supply

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.