Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 4 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Water: पुणेकरांना Diwali 2026 चे मोठे गिफ्ट; पाणी कपातीबाबत महापालिकेने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Pune Water News: महापालिकेने घेतलेल्या या निर्णयामुळे दिवाळीच्या काळात नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार असून पाण्याअभावी हाल होणार नाहीत, असा दावा महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 04, 2026 | 08:43 PM
Diwali 2026

Diwali 2026

Follow Us
Follow Us:
  • दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचा निर्णय 
  • नागरिकांना नियमित पाणीपुरवठा केला जाणार
  • प्रत्येक गुरुवारी केली जाणारी पाणीकपात दिवाळीनिमित्त रद्द
Pune Water News: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक गुरुवारी केली जाणारी पाणीकपात रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे (आज) गुरुवारी, ५ नोव्हेंबरला कोणतीही पाणीकपात होणार नसून नागरिकांना नियमित पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे.

धरणातील उपलब्ध पाणीसाठा आणि राज्यातील विविध भागांत निर्माण झालेली दुष्काळाची स्थिती लक्षात घेत महापालिकेने प्रत्येक गुरुवारी संपूर्ण शहरात पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या तीन आठवड्यांपासून त्याची अंमलबजावणीदेखील सुरू करण्यात आली आहे. दिवाळीच्या सणाला सुरुवात झाली आहे. सणासुदीच्या काळात पुणेकरांची पाण्याअभावी गैरसोय होऊ नये, यासाठी दिवाळीच्या काळात पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय पुणे महापालिकेने घेतला आहे.

Pune Water: विरोधात असताना आंदोलन, आता सत्तेत मौन; पुणेकरांवर एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचे संकट?

महापालिकेने घेतलेल्या या निर्णयामुळे दिवाळीच्या काळात नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार असून पाण्याअभावी हाल होणार नाहीत, असा दावा महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केला आहे. ‘दिवाळी सण तोंडावर असून, या पार्श्वभूमीवर घरांची स्वच्छता, फराळाची तयारी, पाहुण्यांची वर्दळ आणि इतर कारणांमुळे पाण्याची मागणी वाढते. अशा परिस्थितीत गुरुवारी संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद राहिल्यास नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता होती. त्यामुळे दिवाळीच्या काळात गुरुवारची पाणीकपात तात्पुरती रद्द करण्यात आली आहे,’ असे महापालिकेने म्हटले आहे.

पुणेकरांवर एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचे संकट?

विरोधी पक्षात असताना पाणी कपातीच्या विरोधात आंदोलन करणारे भाजपचे नेते, कार्यकर्ते सध्या पुण्याच्या पाणी कपातीच्या निर्णयावर गप्प बसले आहेत. जलसंपदा विभागाने शहराची गरज लक्षात न घेता, पाण्याचा कोटा कमी केला आहे. जनप्रतिनिधींनी पुणेकरांची बाजू न मांडल्याने आता एक दिवस आड पाणी पुरवठा शहराला होणार आहे.

Pune City Water Quota: पुण्याच्या पाणी कोट्याचा फैसला ‘वर्षा’वरच!; पालिकेची १८ टीएमसीची मागणी अन् नियोजन १३ टीएमसीचे

पाणी पुरवठ्यावरून जलसंपदा विभाग आणि पुणे महापालिका यांच्यात सातत्याने वाद निर्माण होत आहे. खडकवासला धरण साखळीतून पुणे शहराला किती टीएमसी पाण्याचा पुरवठा करावा, गरज किती, त्यापोटी महापालिकेकडून जलसंपदा विभागाला कोट्यवधी रुपयांची येणी बाकी असे अनेक मुद्द्यांवर वाद होत आहेत. राज्यात सध्या दुष्काळाची स्थिती आहे. खडकवासला धरण साखळीत पुरेसा जलसाठा असतानाही पुणेकरांवर पाणी कपातीचे संकट उभे राहिले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पुण्यात कोणत्या दिवशी पाणी कपात केली जात होती?

    Ans: पुण्यात दर आठवड्यात गुरुवारी पाणी कपात करण्यात येत होती.

  • Que: दिवाळीसाठी महापालिकेचा निर्णय काय?

    Ans: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक गुरुवारी केली जाणारी पाणीकपात रद्द करण्यात आली आहे.

Web Title: Pune mahapalika announced thursday water cut cancel for diwali 2026 tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2026 | 08:43 PM

Topics:  

  • Pune mahapalika
  • Pune water supply
  • water news

संबंधित बातम्या

Ratnagiri: एकीकडे दुष्काळाचं सावट, दुसरीकडे धरणांतून पाणीगळती! रत्नागिरीकरांनी पाणी प्यायचं कसं?
1

Ratnagiri: एकीकडे दुष्काळाचं सावट, दुसरीकडे धरणांतून पाणीगळती! रत्नागिरीकरांनी पाणी प्यायचं कसं?

Pune Water: विरोधात असताना आंदोलन, आता सत्तेत मौन; पुणेकरांवर एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचे संकट?
2

Pune Water: विरोधात असताना आंदोलन, आता सत्तेत मौन; पुणेकरांवर एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचे संकट?

Ratnagiri: रत्नागिरीकरांना मोठा दिलासा! पाणीपट्टीत दरवाढ नाही, नगर परिषदेचा महत्त्वाचा निर्णय
3

Ratnagiri: रत्नागिरीकरांना मोठा दिलासा! पाणीपट्टीत दरवाढ नाही, नगर परिषदेचा महत्त्वाचा निर्णय

सावधान! दोनदा चूक केली तर दंड, तिसऱ्यांदा थेट…; Pune शहरात पाणी वापराबाबत कठोर नियम
4

सावधान! दोनदा चूक केली तर दंड, तिसऱ्यांदा थेट…; Pune शहरात पाणी वापराबाबत कठोर नियम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.