Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 16 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune ZP News: पुणे जिल्हा परिषदेत आता ७ स्वीकृत सदस्यांना मिळणार मानाचे स्थान

Pune Zilla Parishad : नव्या नियमानुसार, प्रत्येक जिल्हा परिषदेत किमान पाच किंवा एकूण सदस्यसंख्येच्या १० टक्क्यांपर्यंत स्वीकृत सदस्य नियुक्त करता येतील. पुणे जिल्हा परिषदेची सद्यस्थिती पाहता, ७३ लोकनियुक्त सदस्यांच्या बळावर येथे ७ नवीन स्वीकृत सदस्यांची वर्णी लागणार आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 16, 2026 | 11:15 AM
Pune Zilla Parishad

Pune Zilla Parishad

Follow Us
Follow Us:
  • पुणे जिल्हा परिषदेच्या कार्यप्रणालीत महत्त्वाचा बदल होणार
  • विविध क्षेत्रांतील विषयतज्ज्ञांना जिल्हा परिषदेचे कामकाज जवळून अनुभवण्याची आणि त्यात योगदान देण्याची संधी मिळणार
  • प्रत्येक जिल्हा परिषदेत किमान पाच किंवा एकूण सदस्यसंख्येच्या १० टक्क्यांपर्यंत स्वीकृत सदस्य नियुक्त  करता येतील
 

Pune Zilla Parishad:  पुणे जिल्हा परिषदेच्या कार्यप्रणालीत महत्त्वाचा बदल होणार असून, विविध क्षेत्रांतील अनुभवी तज्ज्ञांना आत्ता सभागृहात मानाचे स्थान मिळणार आहे. राज्य शासनाने स्वीकृत सदस्य नियुक्तीबाबतची नवीन अधिसूचना प्रसिद्ध केली असून, त्यानुसार पुणे जिल्हा परिषदेत सात स्वीकृत सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या प्रक्रियेअंतर्गत प्रशासनाने हरकती व सूचना मागविण्यास सुरुवात केली आहे.

अंतिम अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत खरात यांनी दिली. विधिमंडळाने जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये स्वीकृत सदस्यांची नियुक्ती करण्याच्या तरतुदीला पूर्वीच हिरवा कंदील दाखवला होता.

Maharashtra Rain Update: २० जुलैनंतर मान्सून धुमाकूळ घालणार? पुण्यासह आज ‘या’ ५ जिल्ह्यांना यलो अलर्ट

सभागृहाची बौद्धिक क्षमता अन् ताकद वाढणार

नवीन नियमावलीनुसार, आता वकील, डॉक्टर, सेवानिवृत्त प्राध्यापक, प्राचार्य आणि विविध क्षेत्रांतील विषयतज्ज्ञांना जिल्हा परिषदेचे कामकाज जवळून अनुभवण्याची आणि त्यात योगदान देण्याची संधी मिळणार आहे. मात्र, या तज्ज्ञांच्या पाठीवर संबंधित राजकीय पक्षाचा वरदहस्त किंवा पाठिंबा असणे अनिवार्य राहील.

नव्या नियमानुसार, प्रत्येक जिल्हा परिषदेत किमान पाच किंवा एकूण सदस्यसंख्येच्या १० टक्क्यांपर्यंत स्वीकृत सदस्य नियुक्त करता येतील. पुणे जिल्हा परिषदेची सद्यस्थिती पाहता, ७३ लोकनियुक्त सदस्यांच्या बळावर येथे ७ नवीन स्वीकृत सदस्यांची वर्णी लागणार आहे. परिणामी, सभागृहाची एकूण सदस्यसंख्या आता ८० वर पोहोचणार आहे. जिल्हा परिषदेसोबतच जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांचे वैभवही अशा स्वीकृत सदस्यांमुळे वाढणार आहे.

Pune Crime : संतापजनक! शिकवणीच्या नावाखाली अल्पवयीन

पडद्यामागील राजकीय गणिते अन् रस्सीखेच

तज्ज्ञांची नियुक्ती होणार असली, तरी या निमित्ताने जिल्हा परिषदेतील राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची चिन्हे आहेत. पुणे जिल्हा परिषदेच्या विद्यमान रचनेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ५१ सदस्य असल्याने साहजिकच स्वीकृत सदस्यांच्या कोट्यात राष्ट्रवादीचा वरचष्मा राहणार आहे.

राजकीय सूत्रांच्या अंदाजानुसार, राष्ट्रवादी काँग्रेसला तब्बल पाच जागा मिळण्याची शक्यता असून, उर्वरित दोन जागांवर भाजप आणि शिवसेनेच्या वाट्याला संधी येऊ शकते. मात्र, हा केवळ प्राथमिक अंदाज असून अंतिम चेंडू शासनाच्या नियमावलीवर आणि संबंधित पक्षांच्या अंतर्गत शिफारशीवरच अवलंबून असणार आहे. त्यामुळे आता ‘तज्ज्ञ’ म्हणून कोणाची वर्णी लागते आणि कोणत्या पक्षाचे पारडे जड राहते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

सभागृहातील नवे संख्याबळ एका दृष्टीक्षेपातः

विद्यमान निवडून आलेले सदस्य: ७३
नवे स्वीकृत सदस्य:०७
एकूण सदस्यसंख्या- ८०

 

 

Web Title: Pune zilla parishad co opted seven members appointment notification shrikant kharat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2026 | 11:15 AM

Topics:  

  • Maharashtra Government
  • Pune Politics
  • Pune Zilla Parishad

संबंधित बातम्या

महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय; शेतकऱ्यांना दिलासा, दापचरीत आंतरराष्ट्रीय कृषी बाजारासह अनेक महत्त्वाच्या घोषणांना मंजुरी
1

महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय; शेतकऱ्यांना दिलासा, दापचरीत आंतरराष्ट्रीय कृषी बाजारासह अनेक महत्त्वाच्या घोषणांना मंजुरी

‘लाडकी बहीण योजनेत 3515 कोटी रुपयांचा अपहार,’ संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, लवकरच कायदेशीर पावले उचलणार?
2

‘लाडकी बहीण योजनेत 3515 कोटी रुपयांचा अपहार,’ संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, लवकरच कायदेशीर पावले उचलणार?

अर्बन चॅलेंज फंडातून शहरांचा सर्जनशील विकास; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा आराखडा
3

अर्बन चॅलेंज फंडातून शहरांचा सर्जनशील विकास; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा आराखडा

‘वहिंनींचे सगळे हट्ट पुरवता, मग तुम्हाला लाडक्या बहिणीच नको झाल्यात का ?’ रोहिणी खडसेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
4

‘वहिंनींचे सगळे हट्ट पुरवता, मग तुम्हाला लाडक्या बहिणीच नको झाल्यात का ?’ रोहिणी खडसेंचा फडणवीसांवर हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.