Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मान्सूनचे आगमन मात्र पुणे अजूनही तहानलेलेच! ऐन पावसाळ्यात तब्बल 1,300 टँकरने होतोय पाणीपुरवठा

महापालिका स्वतः सर्व ठिकाणी टँकर पुरवठा करत नाही. त्यामुळे खासगी टँकरवाले आणि ठेकेदार जास्त दराने पाणी पुरवून आर्थिक फायदा घेत आहेत. याचा फटका नागरिकांना आर्थिकदृष्ट्या बसत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 03, 2025 | 07:04 PM
मान्सूनचे आगमन मात्र पुणे अजूनही तहानलेलेच! ऐन पावसाळ्यात तब्बल 1,300 टँकरने होतोय पाणीपुरवठा
Follow Us
Close
Follow Us:

पुणे : मे आणि जून महिन्यांमध्ये समाधानकारक पावसामुळे खडकवासला धरण साखळीतील जलसाठा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे पुणेकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही अंशी सुटल्याचे चित्र दिसत असले तरी प्रत्यक्षात शहरात दररोज सरासरी 1300 टँकर फेऱ्या होत असल्याने महापालिकेचा नियमित पाणीपुरवठा अपुरा ठरत असल्याचे वास्तव समोर आले आहे. धरणांत पाणी असूनही टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू राहणे, हे महापालिकेच्या पाणी व्यवस्थापनातील अपयशाचे लक्षण आहे. समान पाणीपुरवठा योजना त्वरित पूर्ण होण्याची गरज आहे. अन्यथा पावसाळ्यापर्यंत साठा असूनही उपनगरांतील नागरिकांना टँकरचा खर्च, गैरसोय आणि पाण्याची असुरक्षितता भोगावी लागणार आहे.

मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे मागणी कमी झाली, तर जूनमध्ये धरण भरले तरीही 39 हजारांहून अधिक टँकरच्या फेऱ्या झाल्या. गेल्या वर्षी याच तारखेला एकूण साठा फक्त 4.35 टीएमसी होता. म्हणजेच यंदा जवळपास चारपट अधिक जलसाठा उपलब्ध आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील चार धरणांत यंदा लक्षणीय साठा झाला आहे.

Pune Breaking: पुण्यात कोसळधार; खडकवासल्यातून पाण्याचा विसर्ग वाढवला, सध्याची स्थिती काय?

समान पाणीपुरवठा योजना अद्याप अपूर्ण

पुणे महापालिकेच्या वतीने शहरात समान पाणीपुरवठा योजना राबवली जात आहे. या योजनेतून संपूर्ण शहरात नियमित आणि समान प्रमाणात पाणी मिळावे, हा उद्देश आहे. मात्र या योजनेचे काम अद्याप पूर्ण न झाल्यामुळे अनेक उपनगरे व नवविकसित भागांमध्ये नागरिकांना अजूनही टँकरवरच अवलंबून राहावे लागत आहे.

टँकर माफियांचा दबदबा कायम

महापालिका स्वतः सर्व ठिकाणी टँकर पुरवठा करत नाही. त्यामुळे खासगी टँकरवाले आणि ठेकेदार जास्त दराने पाणी पुरवून आर्थिक फायदा घेत आहेत. याचा फटका नागरिकांना आर्थिकदृष्ट्या बसत आहे. गृहनिर्माण सोसायट्यांचे मेंटेनन्स शुल्क वाढले असून, टँकरसाठी वेगळा खर्च करावा लागत आहे. यावरु अनेक ठिकाणी सदस्य आणि बिल्डरमध्ये वादाचे प्रसंग घडत आहेत.

टँकर फेऱ्यांचे आकडे (महिन्यानुसार) 

महिना मनपा टँकर ठेकेदार टँकर चलन टँकर एकूण फेऱ्या
एप्रिल 3,216 38,859 5,761 47,836
मे 2,846 36,868 5,106 44,763
जून 2,661 32,700 4,033 39,267

खडकवासला धरण साखळीतील साठा :2 जुलै 2025 रोजीची साठा

  • खडकवासला : 1.28 टीएमसी (65% भरलेले)
  • पानशेत : 5.47 टीएमसी
  • वरसगाव : 7.46 टीएमसी
  • टेमघर : 1.54 टीएमसी
  • एकूण साठा : 15.74 टीएमसी

Web Title: 1300 tankers watersupply to punekar people after monsoon started early in this year khadakwasla dam

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2025 | 07:04 PM

Topics:  

  • Khadakwasla Dam
  • Pune
  • Pune Water News

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका
1

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका

Gautami Patil : रिक्षाचालक अपघात प्रकरणी गौतमी पाटीलला होणार अटक? रक्ताचे नमुने फॉरेन्सिकला पाठवले, CCTV फुटेजमध्ये काय?
2

Gautami Patil : रिक्षाचालक अपघात प्रकरणी गौतमी पाटीलला होणार अटक? रक्ताचे नमुने फॉरेन्सिकला पाठवले, CCTV फुटेजमध्ये काय?

Gautami Patil: तरूणाईला घायाळ करणाऱ्या गौतमीला अटक होणार? ‘या’ प्रकरणात अडचणी वाढणार
3

Gautami Patil: तरूणाईला घायाळ करणाऱ्या गौतमीला अटक होणार? ‘या’ प्रकरणात अडचणी वाढणार

Pune Crime: गुंड निलेश घायवळच्या संपत्तीची चौकशी सुरू ! भारतात येताच निलेश घायवळला बेड्या
4

Pune Crime: गुंड निलेश घायवळच्या संपत्तीची चौकशी सुरू ! भारतात येताच निलेश घायवळला बेड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.