Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यनगरीत रंगणार ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’; ‘या’ घराण्यांची समृद्ध परंपरा अनुभवायला मिळणार

भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांनी आपल्या गुरु सवाई गंधर्वांच्या स्मरणार्थ सुरू केलेल्या या महोत्सवाने आजवर देश-विदेशातील तितकेच नामांकित कलाकार आणि रसिकांना जोडले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 24, 2025 | 08:43 PM
पुण्यनगरीत रंगणार ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’; ‘या’ घराण्यांची समृद्ध परंपरा अनुभवायला मिळणार
Follow Us
Follow Us:

पुण्यात होणार ७९वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव
१० ते १४ डिसेंबर या कालावधीत होणार ७९वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव 
पाच दिवस विविध घराण्यांची समृद्ध परंपरा अनुभवायला मिळणार

पुणे: जगप्रसिद्ध हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या परंपरेचा वारसा जपणारा ७९वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव यंदा १० ते १४ डिसेंबरदरम्यान पुण्यातील मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडासंकुल येथे भव्य उत्साहात पार पडणार आहे. आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत यावर्षीच्या महोत्सवातील कलाकारांची घोषणा करताना सांगितले की, यंदा निम्म्याहून अधिक कलाकार प्रथमच सवाईच्या मंचावर सादरीकरण करणार आहेत.

श्रीनिवास जोशी म्हणाले, भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांनी आपल्या गुरु सवाई गंधर्वांच्या स्मरणार्थ सुरू केलेल्या या महोत्सवाने आजवर देश-विदेशातील तितकेच नामांकित कलाकार आणि रसिकांना जोडले आहे. अनुभवी दिग्गजांसोबत अनेक नवे, आश्वासक कलाकारांना संधी देण्याचा आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे आणि यंदाही त्या दृष्टीने महोत्सवाची रचना करण्यात आली आहे.

लोकेश आनंद, डॉ. चेतना पाठक, जॉर्ज ब्रूक्स, इंद्रायुध मजुमदार, मेघरंजनी मेधी, डॉ. एल. शंकर यांसह अनेक कलावंत प्रथमच सवाईच्या रंगमंचावर सादरीकरण करणार आहेत. कल्याणी समूह हे यंदाच्या महोत्सवाचे मुख्य प्रस्तुतकर्ते असून किर्लोस्कर समूह, लोकमान्य सोसायटी, मगरपट्टा सिटी ग्रुप, पु.ना. गाडगीळ अ‍ॅण्ड सन्स, सुहाना, रांजेकर रिअल्टी आदी प्रायोजकांचे सहकार्य लाभले आहे.

७० व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला सुरुवात; ‘PMPML’ प्रवाशांच्या सेवेकरीता तयार, ‘या’ वेळेत देखील धावणार

पाच दिवस घराण्यांची समृद्ध परंपरेचा अनुभव

या महोत्सवात पाच दिवस विविध घराण्यांची समृद्ध परंपरा अनुभवायला मिळणार आहे. पहिल्या दिवशी लोकेश आनंद (शहनाई), डॉ. चेतना पाठक, रितेश–रजनीश मिश्रा, पं. शुभेंद्र–सास्किया राव आणि पं. उल्हास कशाळकर सादरीकरण करतील. दुसऱ्या दिवशी हृषिकेश बडवे, इंद्रायुध मजुमदार, पद्मा देशपांडे आणि जॉर्ज ब्रूक्स–पं. कृष्णमोहन भट मंच गाजवतील. तिसऱ्या दिवशी सत्य सोलंकी, श्रीनिवास जोशी, उस्ताद शुजात हुसैन खान आणि डॉ. अश्विनी मिडे-देशपांडे सादर करतील. चौथ्या दिवशी सिद्धार्थ बेलमण्णू, अनुराधा कुबेर, पं. रूपक कुलकर्णी, डॉ. भरत बलवल्ली, कला रामनाथ–जयंती कुमरेश आणि मेघरंजनी मेधी रंग भरतील. शेवटी पं. उपेंद्र भट आणि ‘अध्ये’ सामूहिक गायन होणार आहे.

Web Title: 71 th sawai gandhrva bhimsen event started 10 to 14 december pune marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 24, 2025 | 08:43 PM

Topics:  

  • Entertainment News
  • Pune
  • pune news

संबंधित बातम्या

MPSC विद्यार्थ्यांचे ‘या’ तारखेपासून पुण्यात बेमुदत धरणे आंदोलन; रोहित पवार आणि विश्वजीत कदमही सहभागी होणार
1

MPSC विद्यार्थ्यांचे ‘या’ तारखेपासून पुण्यात बेमुदत धरणे आंदोलन; रोहित पवार आणि विश्वजीत कदमही सहभागी होणार

‘श्रीमंतां’चा थाटच न्यारा! ढोल-ताशांचा गजर, ‘मोरया’चा जयघोष अन्…; ‘दगडूशेठ’ बाप्पांची वैभवशाली सांगता मिरवणूक
2

‘श्रीमंतां’चा थाटच न्यारा! ढोल-ताशांचा गजर, ‘मोरया’चा जयघोष अन्…; ‘दगडूशेठ’ बाप्पांची वैभवशाली सांगता मिरवणूक

Mushtaq Khan: ‘श्रीमंतांच्या लग्नात वेटरचं काम करतील पण…’मुश्ताकच्या अंतिम दर्शनाबाबत रझा मुरादने व्यक्त केली खंत
3

Mushtaq Khan: ‘श्रीमंतांच्या लग्नात वेटरचं काम करतील पण…’मुश्ताकच्या अंतिम दर्शनाबाबत रझा मुरादने व्यक्त केली खंत

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल
4

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.