Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोरवाडी ग्रेडसेपरेटरमध्ये कंटेनर अडकला, 9 तास वाहतुकीचा खोळंबा; नागरिकांमध्ये संताप

निगडी-दापोडी मार्गावरील 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर' ग्रेडसेपरेटरमध्ये मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास एक अवजड कंटेनर अडकल्याने वाहतुकीचा मोठा खेळखंडोबा झाला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 24, 2026 | 06:30 PM
मोरवाडी ग्रेडसेपरेटरमध्ये कंटेनर अडकला, 9 तास वाहतुकीचा खोळंबा; नागरिकांमध्ये संताप

मोरवाडी ग्रेडसेपरेटरमध्ये कंटेनर अडकला, 9 तास वाहतुकीचा खोळंबा; नागरिकांमध्ये संताप

Follow Us
Close
Follow Us:
  • मोरवाडी ग्रेडसेपरेटरमध्ये कंटेनर अडकला
  • 9 तास वाहतुकीचा खोळंबा
  • नागरिकांमध्ये संताप
पिंपरी : निगडी-दापोडी मार्गावरील ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ ग्रेडसेपरेटरमध्ये मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास एक अवजड कंटेनर अडकल्याने वाहतुकीचा मोठा खेळखंडोबा झाला. तब्बल ९ तासांच्या प्रयत्नांनंतर सायंकाळी साडेचार वाजता कंटेनर बाहेर काढण्यात यश आले, तोपर्यंत प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला आहे.

 

नेमकी घटना काय?

मंगळवारी पहाटे ५:०० वाजता मोरवाडी परिसरातील ग्रेडसेपरेटरमध्ये (निगडी ते दापोडी लेन) कंटेनरची उंची मर्यादेपेक्षा जास्त असल्याने तो पुलाखालील भागात अडकला. ग्रेडसेपरेटरमधील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. पर्यायी सेवा रस्त्यावरही वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने सकाळच्या वेळी कामावर जाणारे कामगार आणि विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली होती.

प्रशासकीय कारवाई

वाहतूक पोलिसांनी आणि प्रशासनाने कंटेनर बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले. अखेर कंटेनरच्या चाकांमधील हवा कमी करून आणि क्रेनचा वापर करून तो खेचून बाहेर काढण्यात आला. सायंकाळी तीन नंतर या मार्गावरील वाहतूक हळूहळू पूर्वपदावर आली.

वारंवार होणाऱ्या अपघातांची कारणे

या घटनेमुळे ग्रेडसेपरेटरमधील नियोजनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे

उंचीचे उल्लंघन : या मार्गावर केवळ ४.५ मीटर उंचीपर्यंतच्या वाहनांना परवानगी आहे, मात्र चालक त्याकडे दुर्लक्ष करतात.

सूचना फलकांचा अभाव : अनेक ठिकाणी स्पष्ट दिशादर्शक फलक आणि ‘हाइट रिस्ट्रिक्टर’ (उंची रोखणारे खांब) नसल्याने मोठे कंटेनर चुकून ग्रेडसेपरेटरमध्ये शिरतात.

मेट्रो कामाचा अडथळा : शहरात सुरू असलेल्या मेट्रो आणि रस्त्यांच्या कामांमुळे बॅरिकेडिंग केले आहे, ज्यामुळे वाहनचालकांचा गोंधळ उडत आहे.

हे सुद्धा वाचा : नीरातील ब्रिटिशकालीन पूल पाडण्याचे आदेश, ग्रामस्थांचा संताप; ऐतिहासिक वारसा वाचविण्याची मागणी

भरधाव कार कोसळली कालव्यात

छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील चांगतपुरी गावात एक अपघात झाल्याचे समोर आले आहे. यात चालकाचा ताबा सुटल्याने कार उजव्या कालव्यात कोसळलीय दरम्यान या भीषण अपघातात करचालक बचावला आहे. तर कारमधील पती-पत्नी बुडाले असून अद्याप ते बेपत्ता असल्याची माहिती आहे. सोमवारच्या रात्री अकरा ते साडे अकरा वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात घडला आहे. चांगतपुरी गावाजवळील कालव्याच्या पुलालगत चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने कार कालव्यात गेली. दरम्यान, चालकाने कारबाहेर उडी मारली. कालव्याला पाणी असल्यामुळे कारमधील पती-पत्नी असे दोघे कारसह पाण्यात बुडाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरा जेसीबीने कार पाण्याबाहेर काढण्यात आली. रात्री उशिरापर्यंत पाण्यात बेपत्ता झालेल्या दोघांचा शोध अद्याप सुरू होता. तर वाचवण्यासाठी गेलेला गावातील एक तरुणही बेपत्ता आहे. त्यामुळे आता एकूण तिन जणांचा शोध सुरु आहे.

Web Title: A container got stuck in the morwadi grade separator causing a major traffic jam

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 06:27 PM

Topics:  

  • Pimpri
  • Traffic News
  • Traffic Police

संबंधित बातम्या

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना वाहतूक विभागाचा दणका; आता ‘ई-कुंडली’ आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षात
1

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना वाहतूक विभागाचा दणका; आता ‘ई-कुंडली’ आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.