
अखेर सावंत परिवारातील दुरावा मिटला; पृथ्वीराज सावंत यांची सोशल मीडियावर पोस्ट
या पार्श्वभूमीवर तानाजीराव सावंत यांनी प्रा. शिवाजीराव सावंत यांच्या परिवारातील सदस्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी प्रेमाने आशीर्वाद दिल्याचा भावनिक क्षणही पाहायला मिळाला. या भेटीमुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना विराम मिळाला आहे. सावंत परिवारातील या घडामोडीकडे केवळ कौटुंबिक पातळीवरच नव्हे, तर राजकीय वर्तुळातूनही पाहिले जात आहे. मात्र, कुटुंबातील मतभेदांपेक्षा परस्परांचे संबंध आणि कौटुंबिक सलोखा कायम ठेवण्याला प्राधान्य दिल्याचे या घडामोडीतून स्पष्ट होत आहे.
हे सुद्धा वाचा : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोबाबत मोठी अपडेट; १७ स्थानकांवर सेवा सुरू होणार
कुटुंबाच्या एकजुटीला महत्त्व
सावंत परिवाराचा शिक्षण आणि सहकार क्षेत्रातील दीर्घकाळचा सहभाग लक्षात घेता, कुटुंबातील एकजुटीला विशेष महत्त्व आहे. गेल्या काही दिवसांतील दुराव्यामुळे विविध राजकीय चर्चांना उधाण आले होते. आता कौटुंबिक पातळीवर संवाद आणि सलोखा पुन्हा प्रस्थापित झाल्याने या चर्चांना वेगळे वळण मिळाले आहे.
‘आम्ही एकत्र होतो, एकत्र आहोत आणि सदैव एकत्र राहू,’ असा ठाम विश्वास व्यक्त करण्यात आला. सावंत परिवारातील ही जुळवाजुळव आगामी काळातील राजकीय आणि सामाजिक घडामोडींवर कितपत परिणाम करते, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.