Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pimpri Chinchwad : पिंपरी-चिंचवड शहरात पाणी संकट वाढणार; ‘या’ तारखेपासून १० टक्के पाणी कपात

पिंपरी-चिंचवड शहरात दिवसाआड पाणीपुरवठा सुरू असताना, आता राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाने १६ ऑक्टोबरपासून आणखी १० टक्के पाणीकपातीचा बडगा उगारला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 09, 2026 | 04:55 PM
पिंपरी-चिंचवड शहरात पाणी संकट वाढणार; 'या' तारखेपासून १० टक्के पाणी कपात

पिंपरी-चिंचवड शहरात पाणी संकट वाढणार; 'या' तारखेपासून १० टक्के पाणी कपात

Follow Us
Follow Us:
  • पिंपरी-चिंचवड शहरात पाणी संकट वाढणार
  • १६ ऑक्टोबरपासून १० टक्के पाणी कपात
  • पिंपरी-चिंचवडकरांच्या नशिबी पाण्याची वणवण
पिंपरी/विजया गिरमे :  पिंपरी- चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारी पवना आणि आंद्रा ही दोन्ही धरणे शंभर टक्के भरलेली असतानाही पिंपरी-चिंचवडकरांच्या नशिबी असलेली पाण्याची वणवण संपलेली नाही. आधीच गेल्या सात वर्षांपासून (२५ नोव्हेंबर २०१९ पासून) शहरात दिवसाआड पाणीपुरवठा सुरू असताना, आता राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाने १६ ऑक्टोबरपासून आणखी १० टक्के पाणीकपातीचा बडगा उगारला आहे. परिणामी, ऐन सणासुदीच्या काळात शहरातील दैनंदिन पाण्याची तूट १०५ एमएलडीवरून थेट १७२ एमएलडीवर पोहोचणार असून, नागरिकांचे पाण्याचे हाल आणखी वाढणार आहेत.

 

‘एल निनो’चा फटका आणि संभाव्य दुष्काळाचे सावट

राज्यातील विविध भागांमध्ये यंदा ‘एल निनो’च्या प्रभावामुळे पर्जन्यमानात मोठी घट झाली आहे. ऑक्टोबर महिन्यापासूनच वाढलेली उष्णता, भूगर्भातील विहिरी व कूपनलिकांची (बोअरवेल) खालावलेली पाणीपातळी आणि आगामी उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता, राज्य शासनाने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना पाणी जपून वापरण्याचे आदेश दिले आहेत. पुढील वर्षभराचे नियोजन करण्यासाठी जलसंपदा विभागाने पालिकांना अनिवार्य १० टक्के पाणीकपातीचे निर्देश दिले असून, याचे काटेकोर पालन न झाल्यास आणि भविष्यात टंचाई निर्माण झाल्यास महापालिका प्रशासनाला जबाबदार धरले जाईल, असा स्पष्ट इशाराही दिला आहे.

सध्याची स्थिती आणि कपातीनंतरचे वास्तव (प्रतिदिन आकडेवारी)

पिंपरी-चिंचवड शहराची एकूण दैनंदिन मागणी: ७७० एमएलडी
सध्या होणारा प्रत्यक्ष पुरवठा: ६६५ एमएलडी
पवना धरण: ५४० एमएलडी
आंद्रा धरण: ९५ एमएलडी
एमआयडीसी: ३० एमएलडी
सध्याची दैनंदिन तूट: १०५ एमएलडी
१० टक्के कपातीनंतर मिळणारे पाणी: ५९८ एमएलडी
कपातीनंतर होणारी एकूण तूट: १७२ एमएलडी

वाकडमधील ३४ सोसायट्यांना केवळ ५० टक्के पुरवठा; टँकर लॉबी गब्बर

पाण्याच्या तुटवड्याचा सर्वात मोठा फटका नव्याने विकसित झालेल्या उपनगरांना बसत आहे. वाकड परिसरातील २०० ते ५०० सदनिका असलेल्या तब्बल ३४ मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांना महापालिकेकडून सध्या केवळ ५० टक्केच पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे ऐन महागाईच्या काळात रहिवाशांना दररोज हजारो रुपये मोजून खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. भामा आसखेड प्रकल्पाचे पाणी शहरात प्रत्यक्ष येत नाही, तोपर्यंत या भागाला पूर्ण क्षमतेने पाणी देणे अशक्य असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

सात वर्षांपासून ‘दिवसाआड’चा फेरा कायम

शहरातील वाढत्या लोकसंख्येला पुरेशा दाबाने व समन्यायी पद्धतीने पाणी मिळावे, या नावाखाली २५ नोव्हेंबर २०१९ रोजी महापालिकेने दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय लागू केला होता. पुढील महिन्यात या तात्पुरत्या निर्णयाला तब्बल सात वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र, सात वर्षांनंतरही वितरण व्यवस्था सुधारण्यात पालिकेला अपयश आले असून, अपुऱ्या आणि कमी दाबाच्या पाण्याच्या तक्रारी शहरात कायम आहेत. आता १० टक्के कपातीची भर पडल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

“येत्या १६ ऑक्टोबरपासून १० टक्के पाणीकपात लागू करण्याबाबत राज्य सरकारचे स्पष्ट आदेश आहेत. त्यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेला अधिकृत पत्र पाठवले जाईल.”

हे सुद्धा वाचा : महाराष्ट्रातून पावसाची अखेर एक्झिट; पुढील तीन ते चार दिवसांत देशाच्या आणखी…

— किरण देशमुख, कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग. “शहरात मागणीच्या तुलनेत आधीच पाणी कमी मिळत आहे. १६ ऑक्टोबरपासून धरणातून जेवढा विसर्ग मिळेल, त्यानुसार शहरांतर्गत पाण्याचे पुनर्नियोजन केले जाईल.” — अजय सूर्यवंशी, सह शहर अभियंता, पाणीपुरवठा विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका

Web Title: A decision has been taken to implement water cuts in the city of pimpri chinchwad nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2026 | 04:55 PM

Topics:  

  • PCMC News
  • Pimpri Chinchwad
  • water news

संबंधित बातम्या

Ratnagiri: धरण उशाला अन् कोरड घशाला, रत्नागिरी पालिकेकडून नागरिकांना त्रास देण्याचे काम?
1

Ratnagiri: धरण उशाला अन् कोरड घशाला, रत्नागिरी पालिकेकडून नागरिकांना त्रास देण्याचे काम?

PCMC News: डॉक्टरांसाठी खूशखबर! वायसीएम रुग्णालयातील प्राध्यापक पदांची भरती; मुलाखतीपूर्वी कागदपत्र पडताळणी होणार
2

PCMC News: डॉक्टरांसाठी खूशखबर! वायसीएम रुग्णालयातील प्राध्यापक पदांची भरती; मुलाखतीपूर्वी कागदपत्र पडताळणी होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.