
Ratnagiri News
सध्याच्या घडीला रत्नागिरी शहराला लागणा-या पाणीपुरवठ्चाची संपूर्ण मदार ही शीळ धरणावर अवलंबून आहे. शीळ धरणातून दररोज मोठ्या प्रमाणावर पाण्याचा उपसा करावा लागत असल्याने, दरमहा लाखो रुपयांचे वीजबिल भरण्यात पालिकेचा निधी खर्च होत आहे. याउलट, नव्याने उभारलेला पानवल धरणामध्ये पाण्याचा साठा उत्तम स्थितीत उपलब्ध असून हे पाणी नैसर्गिक उताराने (गुरुत्वाकर्षण तंत्रज्ञानाने) भेट शहरात आणणे सहज शक्य आहे.
दिवसातून ३ ते 4 लिटर पाणी पिल्याचे काय आहेत फायदे? जाणून घ्या चांगल्या आरोग्याचा रामबाण उपाय
यामुळे पालिकेचा विजेवर होणारा भलामोठा खर्च पूर्णपणे वाचू शकतो आणि प्रशासनावरील ताण कमी होऊ शकतो. परंतु, दुर्दैवाने नाचणे परिसरातील अवघ्या ९३०० मीटर लांबीची पाइपलाइन जोडण्याचे काम प्रशासकीय अनास्थेपोटी रखडलेले आहे.
दुसरीकडे, शहरासाठी लागणाऱ्या पाण्याचा महागडा उपसा शिळधरणातून केल्यामुळे महापालिकेच्या तिजोरीवर विजेच्या बिलाचा प्रचंड मोठा आर्थिक बोजा पडत आहे. निसर्गाने दिलेल्या वरदानाचा आणि उपलब्ध साधनसामग्रीचा पुरेपूर वापर न करता, सामान्य करदात्यांच्या पैशांची होणारी ही उधळपट्टी आता स्थानिक नागरिकांच्या तीव्र संतापाचे मुख्य कारण ठरत आहे.
Sunil Tatkare: नागरिकांच्या प्रश्नांवर दिरंगाई? सुनील तटकरे अधिकाऱ्यांवर भडकले; दिला थेट ‘हा’ इशारा
प्रशासकीय घोळामुळे वणवण करण्याची येणार वेळ
अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक बाब म्हणजे या १३०० मीटरच्या पाइपलाईनस्साठी लागणारे सुमारे २५० पाइप आधीच आणून ठेवले आहेत. सर्व तांत्रिक साहित्य जागेवर हजर असतानाही प्रत्यक्ष कामाची एक वीटही पुढे सरकलेली नाही. कंत्राटदाराच्या जुन्या कामाचे थकीत पैसे वेळेत न दिल्यामुळे त्याने नवीन काम सुरू करण्यास ठाम नकार दिला असल्याचे निष्पन्न झाले आहे. धरण तयार आहे, त्यात मुबलक पाणी साचले आहे आणि पाइपही रस्त्यावर पडून आहेत; मात्र केवळ थकीत बिलांच्या वादामुळे ही जोडणी थांबली आहे. परिणामी, निसर्गाची साथ असूनही प्रशासकीय घोळामुळे रत्नागिरीकरांच्या नशिबी पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ येणार आहे.