Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

साक्षात सूर्यनारायणाला ‘प्रभामंडळा’चा रिंगण; Dive घाटात विठ्ठलाच्या मूर्तीवर ‘प्रभामंडळ’, पहा अद्भुत क्षण

पालखीसोहळ्यात विठ्ठलाच्या मूर्तीच्या वरच हे प्रभामंडळ दिसल्याने अनेक भाविकांनी त्याला आध्यात्मिक अर्थही जोडला. अध्यात्मात देव किंवा पवित्र व्यक्तीच्या भोवती दिसणाऱ्या तेजोवलयालाही प्रभामंडळ असे संबोधले जाते.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 11, 2026 | 07:23 PM
साक्षात सूर्यनारायणाला ‘प्रभामंडळा’चा रिंगण; Dive घाटात विठ्ठलाच्या मूर्तीवर ‘प्रभामंडळ’, पहा अद्भुत क्षण
Follow Us
Follow Us:

संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुण्यातून सासवडच्या दिशेने मार्गस्थ
हिरवाईने नटलेल्या घाटात पाहायला मिळाले दिंडीचे नेत्रदीपक दृश्य
विठ्ठलाच्या मूर्तीच्या वर दिसलेल्या या प्रभामंडळाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल

सुनयना सोनवणे / पुणे: संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुण्यातून सासवडच्या दिशेने मार्गस्थ झाल्यानंतर दिवे घाट परिसर पुन्हा एकदा लाखो वारकरी आणि छायाचित्रकारांनी गजबजून गेला. पावसामुळे हिरवाईने नटलेल्या घाटातील दिंडीचे नेत्रदीपक दृश्य टिपण्यासाठी अनेक छायाचित्रकार दिवे घाटात तासन्‌तास प्रतीक्षा करत होते. याच वेळी विठ्ठलाच्या भव्य मूर्तीच्या अगदी वर सूर्याभोवती तयार झालेल्या प्रकाशाच्या वर्तुळाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

दिवे घाटात विठ्ठलाच्या मूर्तीच्या वर दिसलेल्या या प्रभामंडळाचे फोटो आणि व्हिडिओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. अनेक वारकरी, छायाचित्रकार आणि नागरिकांनी हा दुर्मिळ क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. त्यामुळे पालखीतील दिंडींच्या देखण्या छायाचित्रांसोबतच हे प्रभामंडळही यंदाच्या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले.

Pune News: आषाढी वारीत वारकऱ्यांसाठी आधार हाऊसिंग फायनान्सचा अनोखा उपक्रम; 100 विश्रांती कक्षांची सुविधा

हे दृश्य पाहून अनेकांनी ते इंद्रधनुष्य, इंद्रवज्र किंवा अन्य नैसर्गिक घटना असल्याची चर्चा केली. मात्र हवामानशास्त्राच्या भाषेत या घटनेला ‘प्रभामंडळ’ किंवा ‘खळे’ असे म्हटले जाते. सूर्याभोवती असे वर्तुळ दिसणे तुलनेने दुर्मिळ मानले जाते.

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, आकाशात सुमारे २० हजार फूट उंचीवर तयार होणाऱ्या ‘सिरस’ या अतिथंड ढगांमध्ये बर्फाचे सूक्ष्म स्फटिक असतात. या स्फटिकांमधून सूर्यप्रकाश विशिष्ट कोनातून जाताना त्याचे अपवर्तन (रिफ्रॅक्शन) होते आणि सूर्याभोवती गोलाकार प्रकाशाचे वर्तुळ तयार होते. या वर्तुळाच्या आतील बाजूस फिकट लाल, तर बाहेरील बाजूस निळसर किंवा पांढरट रंगाची छटा दिसते. काहीवेळा त्यामध्ये इंद्रधनुष्यासारखे रंगही उमटतात.

पालखीसोहळ्यात विठ्ठलाच्या मूर्तीच्या वरच हे प्रभामंडळ दिसल्याने अनेक भाविकांनी त्याला आध्यात्मिक अर्थही जोडला. अध्यात्मात देव किंवा पवित्र व्यक्तीच्या भोवती दिसणाऱ्या तेजोवलयालाही प्रभामंडळ असे संबोधले जाते. त्यामुळे दिवे घाटातील हा निसर्ग आणि भक्तीचा अनोखा संगम यंदाच्या पालखी सोहळ्यात विशेष आकर्षण ठरला.

लाखो पाऊले पुण्यात विसावली! शनिवारवाडा ते लक्ष्मी रोड; अवघी पुण्यनगरी झाली ‘वारकरीमय’

अवघी पुण्यनगरी झाली ‘वारकरीमय’

आषाढी वारीनिमित्त संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यासाठी पुण्यात दाखल झालेल्या लाखो वारकऱ्यांमुळे पुणे शहरातील प्रमुख बाजारपेठा आणि पर्यटनस्थळे गजबजून गेली होती शनिवारवाडा, लालमहाल परिसर, लक्ष्मी रोड, तुळशीबाग, कसबा पेठ, मंडई तसेच शनिवार पेठ परिसरात दिवसभर वारकऱ्यांची मोठी वर्दळ पाहायला मिळाली. शहरातील ऐतिहासिक वास्तू आणि धार्मिक स्थळांना भेट देतानाच अनेक वारकऱ्यांनी खरेदीचाही आनंद लुटला.

Web Title: A halo appeared around idol of lord vitthal palkhi saint dnyaneshwar mauli passing dive ghat saswad ashadhi wari 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2026 | 07:13 PM

Topics:  

  • Ashadhi Wari 2026
  • Dive Ghat
  • Dnyaneshwar Maharaj Palkhi
  • Saswad

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.