Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाटस हद्दीत अष्टविनायक मार्गावर भीषण अपघात; भरधाव कंटेनर थेट नर्सरीत घुसला अन्…

चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर रस्ता सोडून थेट पाटस हद्दीतील गार फाटा येथील लडकत यांच्या घरासमोरील नर्सरीत घुसला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र आर्थिक नुकसान झाले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 17, 2026 | 04:07 PM
पाटस हद्दीत अष्टविनायक मार्गावर भीषण अपघात; भरधाव कंटेनर थेट नर्सरीत घुसला अन्...

पाटस हद्दीत अष्टविनायक मार्गावर भीषण अपघात; भरधाव कंटेनर थेट नर्सरीत घुसला अन्...

Follow Us
Follow Us:

पाटस : पाटस-दौंड अष्टविनायक मार्गावर सोमवारी (दि. १७ ऑगस्ट) पहाटे साडेसहाच्या सुमारास भरधाव कंटेनरचा भीषण अपघात झाला आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर रस्ता सोडून थेट पाटस हद्दीतील गार फाटा येथील लडकत यांच्या घरासमोरील नर्सरीत घुसला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, नर्सरीतील झाडे, रोपे व साहित्याचे मोठे नुकसान झाल्याने लडकत कुटुंबाचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

दौंडच्या दिशेने पाटसकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरवरील चालकाचे गार फाटा परिसरात अचानक नियंत्रण सुटले. त्यानंतर कंटेनर रस्त्यालगत असलेल्या लडकत यांच्या घरासमोरील झाडे-फुलांच्या नर्सरीत घुसला. पहाटेच्या शांत वातावरणात कंटेनर आदळल्याचा मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ घबराट पसरली.

नागरिकांनी घराबाहेर येऊन पाहिले असता कंटेनर नर्सरीत घुसल्याचे दिसून आले. अपघातावेळी कंटेनरचा वेग मोठा असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, घरासमोरील करंजीचे झाड कंटेनरच्या मार्गात आल्याने त्याचा वेग काही प्रमाणात कमी झाला. त्यामुळे कंटेनर थेट घरात न घुसता नर्सरीच्या आवारातच थांबला. करंजीचे झाड नसते तर कंटेनर थेट घरात घुसून मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती, अशी भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.

या अपघातात नर्सरीमधील लहान-मोठी रोपे, फुलझाडे तसेच इतर साहित्याची मोठ्या प्रमाणावर मोडतोड झाली. अनेक दिवसांच्या मेहनतीने उभारलेली नर्सरी काही क्षणांत उद्ध्वस्त झाल्याने लडकत कुटुंबावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. या मार्गावरून सातत्याने भरधाव वाहतूक होत असल्याने भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

हे सुद्धा वाचा : दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, मागून कारही आदळली; रत्नागिरी-पावस मार्गावर विचित्र अपघात, २२ प्रवासी जखमी

वेगावर नियंत्रणाची मागणी

अष्टविनायक मार्गावरील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर भरधाव वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. मार्गावरील धोकादायक ठिकाणी स्पीड ब्रेकर बसविणे, सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे तसेच पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाने वेळीच उपाययोजना न केल्यास भविष्यात मोठा अनर्थ होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Web Title: A horrific accident has occurred on the ashtavinayak route within the patas limits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2026 | 04:07 PM

Topics:  

  • Accident News
  • maharashtra
  • Patas

संबंधित बातम्या

Navarashtra Impact: नवराष्ट्राच्या बातमीची दखल; शिवसैनिकांच्या दणक्यानंतर रामलीला गार्डनमध्ये आता रोज पोलिसांची गस्त
1

Navarashtra Impact: नवराष्ट्राच्या बातमीची दखल; शिवसैनिकांच्या दणक्यानंतर रामलीला गार्डनमध्ये आता रोज पोलिसांची गस्त

Wai Mahaganpati Ghat: महागणपती घाटावर पार्किंगचा ‘खासगी’ कारभार; वाहनांच्या रांगा, पालिकेकडे अधिकृत व्यवस्थेची मागणी
2

Wai Mahaganpati Ghat: महागणपती घाटावर पार्किंगचा ‘खासगी’ कारभार; वाहनांच्या रांगा, पालिकेकडे अधिकृत व्यवस्थेची मागणी

समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र सुरुच; गेल्या साडेतीन वर्षांत 633 अपघात, 572 जणांचा मृत्यू
3

समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र सुरुच; गेल्या साडेतीन वर्षांत 633 अपघात, 572 जणांचा मृत्यू

Hingoli Earthquake: गडगडाट अन् जमीन हादरली! हिंगोलीत दोन तासांत दोन भूकंपाचे धक्के; 4.5 तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये भीती
4

Hingoli Earthquake: गडगडाट अन् जमीन हादरली! हिंगोलीत दोन तासांत दोन भूकंपाचे धक्के; 4.5 तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये भीती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.