Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पानटपरीवाल्याकडून 300 रुपये हप्ता, सिगारेटची पाकीटेही घेतली; खराडीतील पोलीस तडकाफडकी निलंबित

पानटपरीचालकाकडून ३०० रुपयांचा हप्ता घेतल्याप्रकरणी पुण्यातील खराडी पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्याला तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. पोलिस शिपाई आकाश मुळे असे निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 03, 2026 | 04:25 PM
पानटपरीवाल्याकडून 300 रुपये हप्ता, सिगारेटची पाकीटेही घेतली; खराडीतील पोलीस तडकाफडकी निलंबित

पानटपरीवाल्याकडून 300 रुपये हप्ता, सिगारेटची पाकीटेही घेतली; खराडीतील पोलीस तडकाफडकी निलंबित

Follow Us
Follow Us:
  • पानटपरीवाल्याकडून ३०० रुपये हप्ता
  • सिगारेटची पाकीटेही घेतली
  • खराडीतील पोलीस तडकाफडकी निलंबित
पुणे : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पानटपरीचालकाकडून ३०० रुपयांचा हप्ता घेतल्याप्रकरणी पुण्यातील खराडी पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्याला तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. ५०० रुपयांची मागणी करून चालकाकडून ३०० रुपये घेऊन नंतर २०० रुपये द्यावे असे सांगण्यात आल्याचेही चौकशीनंतर समोर आले आहे. पोलिस शिपाई आकाश मुळे असे निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. पानटपरीचालकाकडून पैसे घेतल्यामुळे मोठी खडबळ उडाली आहे. यामुळे पोलिस दलाची प्रतिमा मलिन झाल्याचे निरीक्षण निलंबन आदेशात नोंदविण्यात आले आहे.

पोलिस शिपाई आकाश मुळे हे खराडी पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. त्यांना रात्रपाळी ड्युटी होती. तेव्हा त्यांना अनधिकृत आस्थापनांवर पानटपरी तसेच स्टॉल यांच्यावर रात्री दहा ते पहाटे पाचपर्यंत सुरू असल्यास कारवाई करण्याची जबाबदारी दिली होती. यादरम्यान झेन्सॉर रस्त्यावरील स्मोक शॉप उघडे असताना आकाश मुळे हे त्याठिकाणी सव्वा बाराच्या सुमारास तेथे गेले. त्यांनी संबंधित पानटपरीचालकाला सिगारेट विकताना पकडले. त्यांच्याकडील सर्व सिगारेट पिशवीत घालून संबंधित टपरी चालकाला घेऊन ते येत असताना वाटेतच आकाश मुळे यांनी त्यांना सुरुवातीला ५०० रुपये महिना द्यावा लागेल, असे सांगितले. तसेच, आता किती देऊ शकतो अशी विचारणा देखील केली. त्यावरून चालकाने त्यांना ३०० रुपये देतो आणि नंतर २०० रुपये, देतो असे सांगितले. तेव्हा आकाश मुळे यांनी ३०० रुपये घेऊन चालकाला सोडून दिले.

हे सुद्धा वाचा : पुरंदर विमानतळाच्या जागेत बदल करताना कोणते निकष लावले? मुंबई उच्च न्यायालयाचे सरकारला स्पष्टीकरण देण्याचे निर्देश

महिला अधिकाऱ्यांकडून कारवाई

दरम्यान, रात्रगस्तीवरील महिला पोलिस अधिकाऱ्यांना हा प्रकार समजल्यानंतर त्यांनी याबाबत पानटपरी चालकाला बोलवून त्याचा जबाब नोंदवला. तेव्हा त्याने सर्व घटना सांगितली. त्यानंतर त्यांनी हा प्रकार वरिष्ठांच्या कानावर घातला. परिमंडळ सातचे पोलिस उपायुक्त अबिनाश कुमार यांनी तडकाफडकी पोलिस शिपाई आकाश मुळे यांना पोलिस खात्यातून निलंबित केले आहे.

हे सुद्धा वाचा : पुण्यात डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना मारहाण; टिळक रस्त्यावर हल्ला

Web Title: A police employee from kharadi has been summarily suspended

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2026 | 04:25 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • pune news
  • Pune Police

संबंधित बातम्या

राज्यपालांच्या हस्ते ‘वनार्टी’च्या सेवादूत प्रकल्पाचा शुभारंभ; 36 जिल्ह्यांत 72 सेवादूतांची नियुक्ती
1

राज्यपालांच्या हस्ते ‘वनार्टी’च्या सेवादूत प्रकल्पाचा शुभारंभ; 36 जिल्ह्यांत 72 सेवादूतांची नियुक्ती

दिल्लीला गेला अन् जाळ्यात अडकला; समृद्धीवरील कार लूटप्रकरणाच्या सूत्रधारासह पाच जण जेरबंद
2

दिल्लीला गेला अन् जाळ्यात अडकला; समृद्धीवरील कार लूटप्रकरणाच्या सूत्रधारासह पाच जण जेरबंद

पुण्यात डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना मारहाण; टिळक रस्त्यावर हल्ला
3

पुण्यात डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना मारहाण; टिळक रस्त्यावर हल्ला

जमिनीच्या वादातून मुलं झाली हैवान, रस्त्यावरच जन्मदात्या वडिलांना केली बेदम मारहाण; पुण्यातील घटनेचा Video Viral
4

जमिनीच्या वादातून मुलं झाली हैवान, रस्त्यावरच जन्मदात्या वडिलांना केली बेदम मारहाण; पुण्यातील घटनेचा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.