Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 19 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भरमसाट मजुरीदराला लगाम, ओतूरमध्ये कांदा लागवडीसाठी नवे दर निश्चित; नियम मोडल्यास…

जुन्नर तालुक्यातील ओतूर परिसरात कांदा लागवडीचा हंगाम जोरात सुरू असताना गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेल्या मजुरीदरांच्या प्रश्नावर अखेर तोडगा निघाला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 19, 2026 | 05:34 PM
भरमसाट मजुरीदराला लगाम, ओतूरमध्ये कांदा लागवडीसाठी नवे दर निश्चित; नियम मोडल्यास...

भरमसाट मजुरीदराला लगाम, ओतूरमध्ये कांदा लागवडीसाठी नवे दर निश्चित; नियम मोडल्यास...

Follow Us
Follow Us:
  • भरमसाट मजुरीदराला लगाम
  • ओतूरमध्ये कांदा लागवडीसाठी नवे दर निश्चित
  • नियम मोडल्यास होणार कारवाई
ओतूर/मनोहर हिंगणे : जुन्नर तालुक्यातील ओतूर परिसरात कांदा लागवडीचा हंगाम जोरात सुरू असताना गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेल्या मजुरीदरांच्या प्रश्नावर अखेर तोडगा निघाला आहे. शेतकरी, मजूर आणि मजूर वाहतूक करणाऱ्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत बुधवारी (दि. १८) बनकर फाटा येथे पार पडलेल्या बैठकीत कांदा लागवडीसाठी पुरुष मजुरांना ८०० रुपये, महिला मजुरांना ७०० रुपये, तर खुरपणीच्या कामासाठी ५०० रुपये रोजंदारी निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे ऐरणीवर आलेल्या मजुरीच्या वादावर तूर्तास पडदा पडला असला, तरी या प्रक्रियेत काही मजुरांची नाराजी आणि अंमलबजावणीच्या मुद्द्यावरून परिसरात सतर्कता पाहायला मिळत आहे.

 

जुन्नर तालुक्यातील ओतूर, डिंगोरे, बल्लाळवाडी, उदापूर आदी भागांत कांदा लागवडीची कामे वेगाने सुरू आहेत. मात्र, मागील महिनाभरात बनकर फाटा येथील मजूर अड्ड्यावर महिला मजुरांची रोजंदारी ७०० रुपयांवरून थेट १२०० रुपयांपर्यंत, तर पुरुष मजुरांची मजुरी ८०० रुपयांवरून १२०० ते १३०० रुपयांपर्यंत पोहोचली होती. आधीच दुष्काळी परिस्थिती, शेतीमालाला मिळणारा कवडीमोल बाजारभाव आणि खते, बियाणे, औषधे व मशागतीच्या वाढलेल्या किमतींमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले होते. त्यात मजूर पुरवणाऱ्या एजंटांचा वाढता हस्तक्षेप आणि भरमसाट मजुरीदरामुळे उत्पादन खर्च आवाक्याबाहेर जात असल्याने कांदा पिकाला बाजारभावाची शाश्वती नसताना लागवडीचा खर्च कसा पेलवायचा, असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला होता.

या आर्थिक संकटातून मार्ग काढण्यासाठी आणि मजुरीदरांवर नियंत्रण आणण्यासाठी बुधवारी बनकर फाटा येथे शेतकऱ्यांनी मोठी भूमिका घेत एकत्र येऊन मजुरीदर निश्चित करण्याचा निर्णय घेतला. या बैठकीसाठी शेतकऱ्यांनी शेतीची कामे सोडून मोठ्या संख्येने हजेरी लावली, तर दुसरीकडे हजारो मजूरही बनकर फाटा येथे जमा झाले होते. बैठकीत दुष्काळी परिस्थिती, वाढती महागाई आणि शेतकऱ्यांची हतबलता यावर सखोल चर्चा झाली. त्यानंतर सर्वांच्या सहमतीने व सामंजस्याने पुरुषांना ८०० रुपये, महिलांना ७०० रुपये आणि खुरपणीसाठी ५०० रुपये रोजंदारी देण्याचे ठरवण्यात आले. मजुरांनी हा निर्णय मान्य केला असला, तरी काही मजुरांनी या दराबाबत नाराजीही व्यक्त केली.
​

नियम मोडल्यास दंडाची तरतूद

निश्चित केलेल्या मजुरीदरापेक्षा अधिक मजुरी देणाऱ्या शेतकऱ्याला ५ हजार रुपये दंड, तर मजुरांची वाहतूक करणाऱ्या वाहनचालकाने नियम मोडल्यास १० हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी लवकरच शेतकऱ्यांची स्वतंत्र समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच सर्व शेतकरी बांधवांनी ठरलेल्या दरानेच मजुरी द्यावी आणि मजूर बांधवांनीही या निर्णयाला सहकार्य करावे, असा ठराव व आवाहन करण्यात आले आहे. अंमलबजावणीत एकवाक्यता राहावी, यासाठी गुरुवारी (दि. १९) सकाळी बनकर फाटा येथे शेतकरी पुन्हा एकत्र आले होते.

हे सुद्धा वाचा : सातबारा, फेरफारसाठी नागरिकांचे हेलपाटे; इंदापूर तहसीलदारांच्या कारभाराविरोधात होणार सर्वपक्षीय आंदोलन

यावेळी मजुरीदराच्या प्रश्नावरून काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते; मात्र ओतूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे, पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवून शांततेचे आवाहन केले. पोलिसांच्या उपस्थितीत शांततेच्या मार्गाने चर्चा होऊन सामंजस्याने निर्णय घेणे शक्य झाले. शेतकरी आणि मजूर हे शेतीव्यवस्थेतील एकमेकांना पूरक घटक असून, शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती आणि मजुरांच्या श्रमाचा सन्मान या दोन्ही बाबी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे आपापसातील प्रश्न चर्चेतून व परस्पर सामंजस्याने सोडवून परिसरात शांतता राखावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: कांदा लागवडीसाठी नवीन मजुरीदर किती निश्चित करण्यात आला?

    Ans: कांदा लागवडीसाठी पुरुष मजुरांना ८०० रुपये, महिला मजुरांना ७०० रुपये, तर खुरपणीसाठी ५०० रुपये रोजंदारी निश्चित करण्यात आली आहे.

  • Que: ठरलेल्या दरापेक्षा अधिक मजुरी दिल्यास काय कारवाई होणार?

    Ans: ठरलेल्या दरापेक्षा अधिक मजुरी देणाऱ्या शेतकऱ्याला ५ हजार रुपये दंड, तर नियम मोडून मजुरांची वाहतूक करणाऱ्या वाहनचालकाला १० हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

  • Que: मजुरीदराच्या निर्णयाची अंमलबजावणी कशी होणार?

    Ans: दरांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शेतकऱ्यांची स्वतंत्र समिती स्थापन करण्यात येणार आहे. तसेच शेतकरी आणि मजुरांनी ठरलेल्या दरांचे पालन करून परस्पर सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: A solution regarding labor rates for onion planting has been reached in otur nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2026 | 05:34 PM

Topics:  

  • Farmers
  • onion

संबंधित बातम्या

Dharashiv News: १५५ कामांची पडताळणी होऊनही संशय कायम! ‘नाम फाउंडेशन’च्या कामांवर योजनेचा निधी खर्च केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप
1

Dharashiv News: १५५ कामांची पडताळणी होऊनही संशय कायम! ‘नाम फाउंडेशन’च्या कामांवर योजनेचा निधी खर्च केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप

Sugarcane Price Protest: ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! प्रतिटन ४ हजार रुपये पहिली उचल, हेक्टरी १ लाख दुष्काळी मदतीची मागणी
2

Sugarcane Price Protest: ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! प्रतिटन ४ हजार रुपये पहिली उचल, हेक्टरी १ लाख दुष्काळी मदतीची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.