Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 25 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट! १० तालुके दुष्काळग्रस्त; टँकरग्रस्त गावांची संख्या वाढण्याची शक्यता

पुणे जिल्ह्यातील १३ पैकी १० तालुके दुष्काळग्रस्त घोषित झाल्याने आगामी काळातील पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. यंदाच्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पिण्याचे पाणी, शेती तसेच जनावरांसाठी पाणी आणि चाऱ्याचे नियोजन करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 25, 2026 | 05:38 PM
पुणे जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट! १० तालुके दुष्काळग्रस्त; टँकरग्रस्त गावांची संख्या वाढण्याची शक्यता

पुणे जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट! १० तालुके दुष्काळग्रस्त; टँकरग्रस्त गावांची संख्या वाढण्याची शक्यता

Follow Us
Follow Us:
  • पुणे जिल्ह्यातील १३ पैकी १० तालुके दुष्काळग्रस्त घोषित
  • यंदा पाणीटंचाई वाढण्याची शक्यता
  • टँकरग्रस्त गावांची संख्या वाढण्याची शक्यता
पुणे : पुणे जिल्ह्यातील १३ पैकी १० तालुके दुष्काळग्रस्त घोषित झाल्याने आगामी काळातील पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात काही भागांत पावसाची मोठी तूट, जलस्रोतांवरील वाढता ताण आणि काही गावांमध्ये सुरू झालेला टँकरद्वारे पाणीपुरवठा यामुळे यंदा टंचाईची तीव्रता वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. मागील वर्षी जिल्ह्यातील १५० गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला होता. यंदाच्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पिण्याचे पाणी, शेती तसेच जनावरांसाठी पाणी आणि चाऱ्याचे नियोजन करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे.

सरासरीपेक्षा अधिक पाऊस; तरी दुष्काळाचे सावट

जून ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत पुणे जिल्ह्यात सरासरी ८२४.१२ मिलिमीटर पर्जन्यमान अपेक्षित होते. प्रत्यक्षात ८६९.७६ मिलिमीटर पाऊस नोंदविला गेला. म्हणजेच जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत २.४७ टक्के अधिक पर्जन्यमान झाले. मात्र, जिल्ह्याची एकूण पावसाची सरासरी समाधानकारक असली, तरी तालुकानिहाय पर्जन्यमानात मोठी तफावत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मावळमध्ये सरासरीच्या १९६.५२ टक्के, खेडमध्ये १५८.३७ टक्के, तर आंबेगावमध्ये १३६.३२ टक्के पाऊस झाला. त्याउलट बारामतीमध्ये सरासरीच्या केवळ ६३.३४ टक्के, इंदापूरमध्ये ६५.९१ टक्के आणि दौंडमध्ये ६७.४३ टक्के पर्जन्यमानाची नोंद झाली.

टँकरग्रस्त गावांची संख्या पुन्हा वाढण्याची शक्यता

पुणे जिल्ह्यातील मागील चार वर्षांची टँकरपुरवठ्याची आकडेवारी पाहिल्यास पाणीटंचाईची तीव्रता वर्षानुसार बदलत असल्याचे दिसून येते.

वर्ष टँकरद्वारे पाणीपुरवठा झालेली गावे
२०२२-२३ ३९
२०२३-२४ २०३
२०२४-२५  ९०
२०२५-२६

 

१५०
२०२३-२४ मध्ये तब्बल २०३ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला होता. त्यानंतर २०२४-२५ मध्ये ही संख्या ९० वर आली. मात्र, २०२५-२६ मध्ये पुन्हा १५० गावांना टँकरचा आधार घ्यावा लागला. मागील वर्षाच्या तुलनेत ही वाढ सुमारे ६६.७ टक्के आहे.

हे सुद्धा वाचा  : जमिनीचा वाद अन् हत्येची सुपारी! व्यावसायिकावर कटरने हल्ला; पुण्यातील घटनेनं खळबळ

पुरंदर, आंबेगाव, जुन्नर, खेडकडे विशेष लक्ष

२०२५-२६ मधील आकडेवारीनुसार पुरंदर तालुक्यातील ३३, आंबेगावमधील ३०, जुन्नरमधील २८ आणि खेडमधील १८ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला होता. त्यामुळे या तालुक्यांतील पाणीपुरवठा योजनांची सद्यस्थिती तपासणे आवश्यक आहे. विहिरींची पाणीपातळी, उपलब्ध जलस्रोत, नादुरुस्त पाणीपुरवठा योजना आणि पर्यायी जलस्रोतांची उपलब्धता यांचा आढावा घेऊन संभाव्य टंचाईग्रस्त गावांची यादी आधीच तयार करणे गरजेचे आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पुणे जिल्ह्यात किती तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले आहेत?

    Ans: पुणे जिल्ह्यातील १३ पैकी १० तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले आहेत. त्यामुळे आगामी काळात पिण्याचे पाणी, शेती आणि जनावरांसाठी पाण्याची व्यवस्था करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.

  • Que: पुणे जिल्ह्यात २०२६ च्या पावसाळ्यात किती पाऊस झाला?

    Ans: जून ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत जिल्ह्यात सरासरी ८२४.१२ मिलिमीटर पाऊस अपेक्षित होता. प्रत्यक्षात ८६९.७६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मात्र, तालुकानिहाय पावसात मोठी तफावत दिसून आली.

  • Que: पुणे जिल्ह्यात यंदा पाणीटंचाई वाढण्याची शक्यता का आहे?

    Ans: बारामती, इंदापूर आणि दौंड तालुक्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. जलस्रोतांवरील वाढता ताण आणि काही गावांमध्ये सुरू झालेला टँकरद्वारे पाणीपुरवठा यामुळे यंदा पाणीटंचाई तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Web Title: A water scarcity crisis is emerging in pune district nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2026 | 05:33 PM

Topics:  

  • maharashtra
  • pune news
  • Water Issue

संबंधित बातम्या

जमिनीचा वाद अन् हत्येची सुपारी! व्यावसायिकावर कटरने हल्ला; पुण्यातील घटनेनं खळबळ
1

जमिनीचा वाद अन् हत्येची सुपारी! व्यावसायिकावर कटरने हल्ला; पुण्यातील घटनेनं खळबळ

महापौर निवासस्थानी तिरंगा अन् भगवा ध्वज कायमस्वरूपी लावा; नगरसेवक सुनील पांडे यांची मागणी
2

महापौर निवासस्थानी तिरंगा अन् भगवा ध्वज कायमस्वरूपी लावा; नगरसेवक सुनील पांडे यांची मागणी

हिंगोलीत हिवाळ्यातच पाणीटंचाईची चाहूल; भूजल पातळीत 2.23 मीटरने झाली घट
3

हिंगोलीत हिवाळ्यातच पाणीटंचाईची चाहूल; भूजल पातळीत 2.23 मीटरने झाली घट

Navarashtra Special: जुनं पुणे, जुना रुबाब! वाड्यांमध्ये जिवंत आहे इतिहास; पाहा वाड्यांचा वारसा
4

Navarashtra Special: जुनं पुणे, जुना रुबाब! वाड्यांमध्ये जिवंत आहे इतिहास; पाहा वाड्यांचा वारसा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.